Tuesday, February 22, 2011

सहजच...

हाताची घडी गालावर बोट
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल

सांजवेळी चाले
वेदनांची रेलचेल
मनातुनी वाहे
आठवणी भळभळ....
--स्नेहल

काळाने करता घाव
मनाची होई तळमळ
आठवांच्या खपल्या उडती
अन जखम वाही भळभळ
--स्नेहल

हाताची घडी गालावर बोट
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल

पावसात भिजण्याचा
फक्त बहाणा असतो
खरा उद्देश तर
अश्रू लपवण्याचा असतो
--स्नेहल

प्रेमाची कक्षा
इतकी रुंद असावी
कुठे हि असलं तरी
मन त्यातच सामवावी...
--स्नेहल


परीस शोधण्यापेक्षा सखी
मी प्रेमाचं सोनच शोधतो
बाह्य स्पर्शाशिवाय ते
शुद्ध अन प्रिय भासत
--स्नेहल



Thursday, February 10, 2011

मधुशालेचा राजा..!!


शालेत न जाऊन बी आवडे आपल्याला मधुशाला,,
आपल सगलं ऐकता तिथे काय बी बोला

रोज ठरवतो आपण दारूच्या नादी लागायचं नाय,,
लेका त्या वाटेला तर मुलि जायचंच नाय

रातीला येताना "जिवाभावाचा" तो गुत्ता दिसतो,,
मन म्हणत नाही पण साला हा पाय लगेच वलतो

गुत्त्यात मग मनापासून एक "प्रोमिष" घेतो,,
एकच पेग पिऊ हे मनापासून फिक्श ठरवतो

दर पेगला साला एक "प्रोमिष" घेतच रहतो,,
अन बाटली संपली तरी बी साला मी मांगतच राहतो

थाटात मंग आपुन भायेर पडतो,,
ताठ मानेने वाकडी तिरपी घरची वाट पकडतो

स्वतःला मंग मी समजाया लागतो राजा,,
रस्त्यात बगायचा मंग आपला गाजावाजा

अरे लोक बी आपल्या बाजूने जात नाय
बायांची तर ह्यो राजाकडे बगायची बी हिम्मत नाय

पण घरी येताच साली हि बायको करते दंगा,,,
ह्या राजावर साली उगारते हि डंडा..?

राजाचा करतीस का अपमान,,
मंग आपण हि विसरतो आपल भान

बायको खाई मंग जोरदार फटके,,
पोर तर भीतीने आधीच घराबाहेर सटके

अरे राजा हाये असा थोडी हरणार,,
मान हरवला पण ऐट थोडी सोडणार

आपल्याला कुणाची गरज न्ह्याय,,
गुत्त्यावर आपल बी एक "खात" हाय

बायको पोर गेले दोग बी उडत काय फरक पडत नाय,,
लेका आपल्याला त काय दारू सोडायची नाय,,
...............मधुशालेचा आपणच राजा हाय

--स्नेहल

Wednesday, February 9, 2011

माझ्या मना...!!!


माझ्या मना समजून घे रे,, ह्या व्यथा वेदना
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा

रेतीचे ते घर स्वप्नांचे,, एका वादळाने गेले उडून
आनंदाचा तो संसार,, सारे गेले आज तुटून
माझ्या मना विसरून जा रे,, त्या क्षणाच्या खुणा
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा

प्रीतच होती अशी रुसलेली,, तू उराशी पक्की जपलेली
हसुनी ती तर निघून गेली,, तू का अश्रु सवे बिलगती
माझ्या मना सोडून दे रे,, त्या प्रीतीच्या भावना
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा

ती होती श्वास ती होती प्राण,, प्रेमात गुंतलेलो विसरून भान
विसरुनी मजसी गेली निघून,, गोड हास्य मजपाशी सोडून
माझ्या मना खर सांगू का रे,, ती अजुनी आठवे मला
विसरणे तिला आहे कठीण,, सावरू कसा स्वताला

माझ्या मना सांग ना रे,, खरच नाही येणार का ती पुन्हा..??
अश्रूना आवरण्या झाले,, आता कठीण मला....

अश्रूना आवरण्या झाले,, आता कठीण मला....

--स्नेहल

खेळ असा हा मोडलेला.....


खेळ असा हा मोडलेला,, दोन घडीतच विस्कटलेला
खेळ असा हा मोडलेला...........

नियतीचा हा छंद निराळा,, दोन जीवांना करून वेगळा
अश्रुना देऊन या माथी,, देव असा का रुसलेला
खेळ असा हा मोडलेला (२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला.............

सारे जण हे मज विचारी,, दूर ती जावून का बसली
शब्द हरवले प्रीत हि रुसली,, भाव असा हा हरवलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला............

प्राण नको अन नको हे जीवन,, बंध तुटता तिळतिळ तुटले मन
स्पंदनानी केले बंड,, श्वास असा हा घुसमटलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला.........

विरहाचे हे क्षण निखारी,, कारुण्याने मन तुज पुकारी
काळीज हे पण ठसठसलेलं,, तुजवीण मी हा बावरलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला........
खेळ असा हा मोडलेला.............................

--स्नेहल

आदर्श....


"आदर्श" म्हणवता म्हणवता चांगलेच "आदर्श" घडवले
"आदर्श" शब्दाचे इतके वाभाडे कुणी कधीच नाही काढले
कुणाचा "आदर्श" घेण्याची हि आता भीती वाटतेय
कुणासमोर आदर्श म्हणवायची तर खूपच लाज वाटतेय

कल (माडी), आज बंगला आणि गाडी आहे
घोटाळ्यांच्या मोहिमेत ह्यांची तर आघाडी आहे
कलम लावून हि ह्यांना काही फरक पडत नाही
डोळे अन दाढी ह्यांची कधी पांढरी पडत नाही

घोटाळ्यांचा राजा ,, भ्रष्टाचाराचा शेहेनशहा
CBI ची याला भीती नाही,, कारण सोबत आहे गॉगलवाला (DMK)
सरकार मध्ये होता आज त्यांचाच पाहुणा झालाय
२ जी राजाचा थाट काही कमी नाही झालाय

"वाटले" तर खूप ह्यांनी,, पण आता ह्यांचीच "वाट" लागलीय
पैश्याची "वाट" शोधता आता CBI ची "वाट" दिसू लागलीय
स्व कर्माचे "आदर्श" फळ ह्यांच्या "वाटी" आलय,
आपल्याच कर्माची (मतदान) फळ अस "वाटू" लागलय

--स्नेहल

प्रितीच फुलपाखरू..!!


प्रीतीच्या फुलपाखरू
हळूच अवतरत
निरस जीवनात
रंगत भरत...

प्रितीच फुलपाखरू
भुरकन हि उडत
भावनेचा खेळ
मनसोक्त खेळत...

प्रितीच फुलपाखरू
हास्य फुलवत
कधी विरहात
अश्रुनी ओलावत...

---स्नेहल

चारोळ्या..!!

तुज विसरण
मुळी शक्यच नाही
मनावर तुजवीण
कुणाच राज्य नाही...
--स्नेहल

प्यार वोह नहीं की करके छोड़ दिया
प्यार वोह नहीं जो छू के निकल लिया
प्यार तो नाम है खुशियाँ और त्याग का
ये नहीं की एकदूसरे को पा लिया तो हो गया...
--स्नेहल

दु:खाचे ढग सारून
सुखाचा वर्षाव होईल
जीवनाच्या आसमंतात
हर्षाचा पाऊस होईल..
--स्नेहल

सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित..:)
--स्नेहल

दोन जीवांचा खेळ
नियतीने क्षणात जिंकला
राजा राणीच्या सुखात
विरहाचा एक्का सोडला...
--स्नेहल

नियतीने जुळवले
नियतीने खेळवले
अन आज नियतीने
मनसोक्त रडवले !!
--स्नेहल

मोडलेला डाव आज
मला रडवत नाही
तो सावरण्याचा प्रयत्न
मी अजूनही सोडत नाही..
--स्नेहल

प्रेम मागून हि मिळत नाही
कळून हि काही वळत नाही
वेडा मजनू म्हणते ती पण
वेड प्रेम काही तिला कळत नाही...
--स्नेहल

दगड टाकूनच
तरंग उठतात
प्रेम केल्यावरच
भावना कळतात
--स्नेहल

आज मी तिच्याकडे
मागणार आहे प्रेम
बघू तिच्याहि भावना
आहेत का सेम....:):)
--स्नेहल

जीवनच कोर झालय
मोह तरी कसला करू
जगणच झालय मुश्कील
वेगळ अजून काय मरू....
--स्नेहल

भाव तिचेच झळकती
माझ्या ह्या मुखातून
तिचाच आवाज येई
ह्या हृदयाच्या स्पंदनातून...:)
--स्नेहल

मजेशीर चारोळ्या... आभार मित्र मंडळी..!


अरविंद मोरे-:
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास

मी-:
नको भेटूस बाबा
राहा तुझ्या घरी
श्वास बंद पडल्यावर
येईन तुझ्या दारी...:)
--स्नेहल


संतोष -:
गाव सोडतेय म्हणे,
असं ऐकलंय तर खरं........
जाण्यापुर्वी विकुन जातेय,
तीनेच बांधलेली घरं.......

स्नेहल-:
जाऊ दे तिला लवकर
तेच आहे बर..
विकता विकता एक दिवस
विकेल तुझीच घर..:):):)

संतोष -:
अरे
माझं घर तिनं विकावं,
हीच तर माझी आशा होती......
तीच्या वेड्या प्रेमात तर,
माझी ही दुर्दशा होती......


स्नेहल -:
वेड्यांशी प्रेम करून
असच काहीस होत
विकल सार जात अन
इथच घोड पेंड खात....:)

संतोष -:
तीला वेडं कसं म्हणु रे,
मीच गाढव असेल ना.....
न वाचता मन तीचे,
प्रीत केली खुप मीच ना....


स्नेहल-:
तिने मनसोक्त लाथाडायच
अन गाढव तू का व्हायचं..?
जिला तुझ्या प्रेमाची किंमत नाय
त्या गाढवीला गुळाची चव काय..:):)

संतोष-:
अरे
तीने लाथाडले तरी माझी,
प्रीत थोडीच संपणार आहे....
एकदिवस तीच माझी,
प्रीत पाहुन रडणार आहे...

स्नेहल-:
प्रीत पाहून ती
रडणार आहे पण
मगरीच्या आसुने
थोडी कुणी भुलणार आहे..??


बायकांचं अस असत
स्वताचा स्वभाव दाखवायचा
लाजरा अन बुजरा
आणि मुठ उघडली कि
आत सापडतो नवरा.......:):)

--स्नेहल

जन्मोजन्मी तूच तू भेटावी
साथ कायम तुझीच लाभावी
फक्त...
कडकलक्ष्मी म्हणून न होता
तू भाग्यलक्ष्मी म्हणून भेटावी...:):)
--स्नेहल



Saturday, February 5, 2011

सहज सुचलेलं..!

काळ्याभोर आकाशात
चांदण्यांनी केली गर्दी
ऐकव तुझ्या चारोळ्या
जमले सारे दर्दी...!!!
--स्नेहल

तुझ वेगळेपणच
मनाला भावते
लाखांमध्ये हि मला
तेच खुणावते..!!
--स्नेहल

सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित...!!
--स्नेहल

तिच्या हास्याच्या
दोन घटका
करती दु:खातून
तात्काळ सुटका..!!
--स्नेहल

ह्या दुष्टांच्या पापांनी
झालाय देश हि भग्न
घोटाळ्यात झालाय
जो तो मग्न...!!
--स्नेहल

ह्यांच्या घोटाळ्यांचा
पडे जनतेला भुर्दंड
जनाची ह्यांना ना लाज
मन हि ह्यांचे षंढ...!!
--स्नेहल

राजकारणी...??
ह्यांची ना कोणती जात
ह्याचं ना कोणत कुळ
काय कोणास ठाऊक
कुठून उपटल हे मूळ..?
--स्नेहल

तुज विण होई
ना कशाचा हर्ष
हर क्षण घेऊन येई
तुझी आठवण प्रकर्ष
--स्नेहल

क्षणाप्रमाणे मुखवटे बदलत गेलो
होतो एक, मी दुसराच बनत गेलो
वेगवेगळ्या मुखवट्यांच्या जगात
मी स्वतःला हि विसरत गेलो
--स्नेहल


नियती ने वापरले
दुष्ट हत्यारांचे भांडार
दणकट प्रीतीला हि
पडले विरहाचे खिंडार
--स्नेहल

Friday, February 4, 2011

माझ्या मनीचा पाऊस..!!

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

ती सांजवेळ,, ढगांनी हि साधला मेळ
वीजेच ते कडकडण,, हृदयाचं अति फडफडण
पानांची सळसळ,, मनाची तळमळ
सार कस अचानक दाटून आल होत..,,
पावसाप्रमाणे प्रेम माझ हि ताटकळलं होत
आजही तो क्षण तसाच आठवतोय....

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

भिजलेल ते तन,, सैरभैर झालेलं मन
अवघडलेले शब्द,, दोघे अति स्तब्ध
प्रीतीचा बहार,, ढगांचा प्रहार
सार काही अति सहज मिळून आल होत..,,
पावसाप्रमाणे मन माझ हि अवघडल होत
आज हि तो भाव मनी जागतोय...

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

मातीचा सुंगध,, प्रीतीचा गंध
अंतरीची इच्छा,, दोहोंची स्वेच्छा
प्रीतीची साद,, प्रेमाचा प्रतिसाद
सार काही अवचित घडून गेल होत..,,
प्रेमच ते फुल आज हळूच उमलल होत
आज हि तोच क्षण मनोमन जगतोय...

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

--स्नेहल

Wednesday, February 2, 2011

चारोळ्या मराठी अन हिंदी...!!

खरच कुणीतरी असलंच पाहिजे
दु:खात अश्रू पुसायला..
आनंदात हसू आवरायला..
--स्नेहल

चाहे आये कितने भी दुःख..
चाहे कितने भी रहो परेशान..
हसी रखना जुबान पे कायम..
खुदा खुद करेगा सुखों का इंतजाम...
--स्नेहल

गेले ते दिन अन सरले ते क्षण
आज उसवल्या गत वाटे हे मन
जिवापेक्षा जास्त जीव लावून हि
आज ठिगळ जोडत बसले हे मन..!!
--स्नेहल

तुझ्या हृदयातले प्रेम
नजरेतून काय दिसले
लाजून पापणी आड
ते हळूच जाऊन लपले..!!
--स्नेहल

शब्दांना नाही जमलं
ते नजरेने लगेच हेरलं
हृदयात प्रेमाचं बीज
नुसत्या इशारयानेच पेरलं...!!!
--स्नेहल

हास्य माझ्या मनीचे
तुझ्या मुखी उमलावे
अश्रू तुझ्या नयनीचे
माझ्यात सामवावे...!!
--स्नेहल

जिंदगी लगती हसीं है पण जीना इसे मुश्किल है
हर डगर पे खड़ी मुसीबत लगती यहाँ... हरपल है
डर डर के दिल ना कभी तू ऐसे परेशान हो
हिम्मत कर,, कोशिश कर.. फिर मंजिल को पास देख यु हैरान हो...!!
--स्नेहल

बघुनी तुला सखे
काही सुचेना कशात
मन वेडावले असे हे
जीव गुंतला तुझ्यात..!!
-- स्नेहल

प्रेम भाव संवेदना संस्कार
ह्याच मूर्तिमंत तू रूप आहेस
धन्य आहे मी प्रिये
कि तू माझी मैत्रीण आहेस..!!
--स्नेहल

सांजवेळी च्या क्षणी आतून
आठवणी जाती हळूच डोकावून
डोळे हि मग वाट शोधती
अश्रुना लोटण्या पापण्यांच्या टोकावरून..!!
-- स्नेहल

आठवणी चा हा असा प्रताप
अश्रूंच्या उद्रेकात भिजली वाट
ह्या वाटेवर वाहिले वेदनेचे पाट
मन बुडाले त्या जुन्या क्षणात..!!
--स्नेहल

भाव तुझा भक्ती तुझी
प्रेमाची हि सक्ती तुझी
लक्षलक्ष मनांमध्ये फक्त
वाटे आसक्ती तुझी..!!
--स्नेहल

तिला ऐकूच येत नाही
माझ्या प्रेमाची साद
माझे शब्द हि तरसतात
ऐकण्यासाठी तिची दाद...:(
--स्नेहल

प्रीत होती साक्षीला पण
शब्द चुकले त्या घडीला
मन दुखले अनवधानाने अन
अश्रू आले मज नयनीला
-- स्नेहल

सांजवेळी अशी अनामिक
दाटे हुरहूर आज मनी
शंका कुशंका वेग घेती
घटे ना काही अनहोनी..
-- स्नेहल

अंधारया रातीला
दु:खाची असे किनार
उजेडाच्या शोधात
सुख झाले बेजार...!
--स्नेहल

लक्ष लक्ष विनवुनी
लक्ष देई कुणी
लक्षात हि येईना
लक्ष्य का गेले चुकुनी...?
-- स्नेहल

मज नयनीचे हे अश्रू
तुझ्या वेदनेने आहे झरते
तुझी वेदनाच वाहून द्यावी
अशी भावना तव असते.
--स्नेहल

वलय तुझ्या प्रीतीचे
मज भोवती असे गुंफले
कोशात ह्या सुखाच्या
मन आनंदाने गुंतले...!
--स्नेहल

सारे दिसती रोज इथे पण
तू का नसे कुणीकडे
तरसुनी गेला जीव आता हा
सादेला तरी प्रतिसाद मिळे...
-- स्नेहल

सुख अन आनंद
दिसे ते सर्वत्र
नशीबच माझे करंटे
घडे सारे अभद्र
-- स्नेहल

लाख बार मनाके भी वो ना माने
दिल की हालत वो बेदर्द ना जाने
तोड़ जाता है ये दिल हर बार पर
चाहत का जूनून वो क्या जाने...?
-- स्नेहल

तू म्हणायची,
अरे प्रेम करतोस मग
तसे सांगत का नाहीस
आज ओरडून सांगतो
पण तू दिसतच नाहीस...
--स्नेहल

सोनकळी माझी
मनात वसते
हृदयातून बोलून
श्वासात हसते...:)
--स्नेहल

माझा वावर नेहमी
तुझ्या हृदयातच असतो
माझ्या गावचा पत्ता हि,
मी तुझ मनच सांगतो...:)
--स्नेहल

वीज कडाडली.. मेघ हि गडगडले
ह्या झंझावातात शब्द हि अवघडले
ओढीने तुझ्या अश्रू हि खळखळले..
पावसा सवे मनसोक्त बरसले..!

--स्नेहल

शब्द...!!!

शब्द आपुलकी शब्द तिरस्कार
शब्द जाणीव शब्द सोपस्कार
शब्द पिडा शब्द संस्कार
शब्द स्वीकार शब्द नकार..!!

शब्द बोल शब्द अलंकार
शब्द गीत शब्द झंकार
शब्द राग शब्द हुंकार
शब्द स्तुती शब्द आभार..!!

शब्दा शब्दा चा वेगळा प्रकार
काही देती अबोल शांतता काही घोर अंधकार..!!

--स्नेहल