काळ्याभोर आकाशात
चांदण्यांनी केली गर्दी
ऐकव तुझ्या चारोळ्या
जमले सारे दर्दी...!!!
--स्नेहल
तुझ वेगळेपणच
मनाला भावते
लाखांमध्ये हि मला
तेच खुणावते..!!
--स्नेहल
सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित...!!
--स्नेहल
तिच्या हास्याच्या
दोन घटका
करती दु:खातून
तात्काळ सुटका..!!
--स्नेहल
ह्या दुष्टांच्या पापांनी
झालाय देश हि भग्न
घोटाळ्यात झालाय
जो तो मग्न...!!
--स्नेहल
ह्यांच्या घोटाळ्यांचा
पडे जनतेला भुर्दंड
जनाची ह्यांना ना लाज
मन हि ह्यांचे षंढ...!!
--स्नेहल
राजकारणी...??
ह्यांची ना कोणती जात
ह्याचं ना कोणत कुळ
काय कोणास ठाऊक
कुठून उपटल हे मूळ..?
--स्नेहल
तुज विण होई
ना कशाचा हर्ष
हर क्षण घेऊन येई
तुझी आठवण प्रकर्ष
--स्नेहल
क्षणाप्रमाणे मुखवटे बदलत गेलो
होतो एक, मी दुसराच बनत गेलो
वेगवेगळ्या मुखवट्यांच्या जगात
मी स्वतःला हि विसरत गेलो
--स्नेहल
नियती ने वापरले
दुष्ट हत्यारांचे भांडार
दणकट प्रीतीला हि
पडले विरहाचे खिंडार
--स्नेहल
No comments:
Post a Comment