Friday, February 4, 2011

माझ्या मनीचा पाऊस..!!

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

ती सांजवेळ,, ढगांनी हि साधला मेळ
वीजेच ते कडकडण,, हृदयाचं अति फडफडण
पानांची सळसळ,, मनाची तळमळ
सार कस अचानक दाटून आल होत..,,
पावसाप्रमाणे प्रेम माझ हि ताटकळलं होत
आजही तो क्षण तसाच आठवतोय....

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

भिजलेल ते तन,, सैरभैर झालेलं मन
अवघडलेले शब्द,, दोघे अति स्तब्ध
प्रीतीचा बहार,, ढगांचा प्रहार
सार काही अति सहज मिळून आल होत..,,
पावसाप्रमाणे मन माझ हि अवघडल होत
आज हि तो भाव मनी जागतोय...

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

मातीचा सुंगध,, प्रीतीचा गंध
अंतरीची इच्छा,, दोहोंची स्वेच्छा
प्रीतीची साद,, प्रेमाचा प्रतिसाद
सार काही अवचित घडून गेल होत..,,
प्रेमच ते फुल आज हळूच उमलल होत
आज हि तोच क्षण मनोमन जगतोय...

आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..

--स्नेहल

No comments:

Post a Comment