Friday, July 1, 2011
आयुष्याची झाली माती..!!
आयुष्याची झाली माती,, भरकटली हि नाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
दुभंगले हे मन अन चित्त,, आपल्यांच्या पाती
भरडून गेले सारे जेव्हा,, फिरली नियतीची जाती
दोन क्षणाचे असे सोबती,, दोन क्षणाची प्रीती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
पेटलेला विरहाचा वणवा,, सर्वस्व गेले सती
विझला जेव्हा, झाली होती,, राख रांगोळी अति
दुख उरले जीवनी आता ,, झाली सुखांची क्षति
उरली काही आशा नाही,, उरली काही हाती
सुचेना आता काही अन,, भ्रष्ट झाली मति
गोठलेल्या आसवातून,, बरसून येई प्रीती
आठवणींच्या विळख्यात,, स्पंदन हि सोडी छाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
आयुष्याची झाली माती,, भरकटली हि नाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
--स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment