Thursday, December 30, 2010

थर्टी फर्स्ट...!!!


थर्टी फर्स्ट...!!

नववर्षाची चाहूल आता सगळी कडे लागलेली दिसते... काहींचा थर्टी फर्स्ट कसा साजरा करायचा आणि किती दारू प्यायची ह्याची हि अगदी फुल प्लान्निंग केली आहे... नववर्षाचा एवढाच काय तो संकल्प...!! आणि आता तर corporates मध्ये आणि जवळपास सगळीकडेच १ जानेवारी म्हणजे अघोषित सुट्टी झाली आहे.. ते हि बरोबरच आहे म्हणा.. मागच्या वर्षी ह्या लोकांनी दारूच इतकी पिलेली असते कि नवीन वर्ष आले तरी तिची झिंग काही उतरत नाही... वर्ष बदलतात पण थर्टी फर्स्ट साजरा करण्याची रीत मात्र बदलत नाही.. होळी आणि थर्टी फर्स्ट म्हणजे खास दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा दिवस.. काहींचा तर्र व्ह्याचा दिवस तर काहींसाठी दारू पिण्याची सुरुवात करण्याचा एक उत्कृष्ट आणि "शुभ" दिवस... पण दारू मात्र पिलीच पाहिजे नाहीतर थर्टी फर्स्ट ची काय मजा हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न.. मनोरंजन नसले तरी चालेल पण दारू मात्र हवी.. आणि जास्त झाली आणि व्यक्ती झिंगु लागली कि तसे हि बाकीच्यांचे मनोरंजन होतेच कि..??

मी आधी ज्या ऑफिस मध्ये होतो तेव्हा नेहमी पार्टी ला जाणं व्हायचं.. आता माझ्यावर काही कधी दारू पिण्याचे संस्कार झालेले नाही.. त्यामुळे मी दारू पिण तर दूर.., त्याच्या वासापासून हि लांब पळतो .. पिणार्यांच्या त्या पार्टीमध्ये मला म्हणजे तुछ्ह समजल जायचं.. कारण एकतर त्यांच्या इतक मला दारूच "ज्ञान" हि नव्हत आणि त्यांच्याप्रमाणे मला काही "चढत" नव्हत आणि घरी पण मी शुद्धीत पोहोचत होतो.. जो धुंदीत एकमेकांना कसेबसे सांभाळत घरी जातो तो खरा आणि सच्चा मित्र हि त्यांनी केलेली मित्राची (?) व्याख्या असायची.. पण त्यांच्या प्रलोभनाला ना मी कधी बळी पडलो ना हि मी त्यांच्या हिणवण्याने कधी दुखी झालो.. अगदी नुकते कोलेज मधून निघालेली ती छोटी पोर अशी घरी गेल्यावर ह्यांचे पालक काय म्हणत असतील ह्याचा मला नेहमी विचार यायचा.. काहींची तर ऑफिस समोरच्या बियर बार वर उधारी असायची.. सकाळी आम्ही काही पुरातन काळातले मुलं चहा पिऊन ऑफिसला जायचो तर हे पठ्ठे सकाळी सकाळी थोडी बियर घेऊन मीटिंगला बसायचे.. म्हणजे ह्यांचा प्रत्येक दिवस म्हणजे थर्टी फर्स्टच असायचा..

मित्रानो तुमच्या पैकी काही थर्टी फर्स्ट साजरे करणार असाल.. प्रत्येकाची तर्हा तशी वेगळी असते.. नेमकी कशी करणार हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जरा सांभाळून साजरा करा.. तुम्ही विचारलं आमच विचारतोस,, तू कसा साजरा करणार.. पण एक तर दारू पिणार्यांच्या लिस्टमध्ये मी नसतो त्यामुळे पार्टी आणि ती हि थर्टी फर्स्ट ची मला दुसर्या प्रमाणे साजराच करता येत नाही.. आणि ३१ डिसेंबर ला माझ्या मम्मीचा वाढदिवस असतो.. त्यामुळे बाकी दुनिया जरी दारूच्या नशेत झिंगत असली तरी मी मात्र माझ्या मम्मीच्या प्रेमाच्या नशेत असतो...

आणि संकल्पाच म्हणाल तर नववर्षाचा मी कधीच संकल्प करत नाही.. कारण माझा आयुष्याचा संकल्प फक्त एकच आहे कुणाला दुखवू नये आणि हिणवू नये आणि आपल्याला फायदा होवो अथवा ना हो पण दुसर्यांना मदत करत राहावी.. बाकी जे घडायचे ते घडतच असते.. सर्वांनी थर्टी फर्स्ट खूप मस्त साजरा करावा.. पार्टी करावी.. नाचावं... गावं.. फक्त दारू पण जरा सांभाळूनच घ्यावी.. आणि ह्या वर्षासोबतच द्वेष.. हेवा.. तिरस्कार हे सारे मागे सारून नवीन वर्ष सोबत नात्यांची हि नवी सुरुवात करावी..

तुम्हा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हा सर्वाना आनंदात आणि सुखात जाव आणि आपली मैत्री आणि प्रेम हि असच वृद्धिंगत होत रहाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना...


(आणि ह्या लेखासाठी हा फोटो ह्याच करता आहे कि ज्यांना "थोडी" चालते त्यांच्यासोबत तर मी जाऊ शकत नाही पण ह्या (फक्त) फोटो ने साथ तर देऊ शकतो.. आणि जे माझ्या सारखेच "पुरातन" काळातले आहेत त्यांनी फक्त लेख वाचावा..आपण नंतर पार्टी करूच...)

-- स्नेहल

Wednesday, December 29, 2010

काही चारोळ्या...


अती सुंदर ती परी अनामिक
रात राणी गत जशी सुवासिक
चंद्रा हून हि अति ती सुंदर
नाद लावी तिचे रूप मनोहर..!!
-- स्नेहल


हास्य माझ्या मनीचे
तुझ्या मुखी उमलावे
अश्रू तुझ्या नयनीचे
माझ्यात सामवावे...!!
-- स्नेहल

नसतेस समोर तू जेव्हा
हृदय स्तब्ध झाल्यागत वाटत
अन बघताच तुला क्षणात
उर फुटेस्तोवर धडधडायला लागत..!!
-- स्नेहल

असती हजार आपले
येई न कुणी कामी
बरे असेच एकटे
आशा न ठरे कुचकामी..!!

--स्नेहल

मृत्यू समयी असती सोबत
काय एक ती कफनी
आयुष्याची किंमत समजे
मोजून अश्रू आले किती लोचनी...!!
-- स्नेहल

मी असा एकटा..!!!


आयुष्याच्या खडतर वाटेवरती
ठेचकाळत हेलकावत कन्हती
मी चाललो..मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

खाच खळगे अवती भवती
साथीला नसे कुणी सोबती
अश्रू ना केले साथी.. उडवत धूळ न माती
मी चाललो.. मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

आप्तस्वकीय होते खूप.. पण होते नावापुरती
वेळ नसे तो कोणा.. दुख वाटण्यासाठी
आप्ता करिता तिष्ठत.. एकटे जीवन कंठीत
मी चाललो.. मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

मन ओलावले हे आतून पण अश्रू गेले सुकून
भावना ना कुणी जाणी..असेल का माझ कोणी
प्रेमाच्या शोधासाठी.. वणवण आली हि माथी
मी चाललो.. मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

सरतील हे पण दिन.. आशा आहे हि वेडी
अडकून ह्या आशेवरती.. जगण्याला थोडी गोडी
मार्ग हा अति अवघड.. थांबण्या अशी परवड
मी चाललो.. मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

आयुष्याच्या खडतर वाटेवरती
ठेचकाळत हेलकावत कन्हती
मी चाललो..मी चाललो
मी चाललो.. एकटा चाललो

एकटा चाललो.. एकटा चाललो.......

-- स्नेहल

Tuesday, December 28, 2010

शिवबाच स्वराज्य..!!


अन्याया विरुध्द पेटली.. मराठ्यांची तोफ धडधडली
हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली


शत्रू होता तो क्रूर.. पण मराठा अति शूर

माजवला होता हाहाकार.. पण शिवबा तो अति थोर

संधीचा शोध घेऊन अन.. गनिमी कावा साधून

मोजक्या लोकांस घेउनी हाती.. हर एक लढाई लढली
हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली

दुष्टानी मांडला उच्छाद.. सत्तेचा होता अति उन्माद

प्रजा होती भोळीभाळी.. राज्य होते अति आल्हाद

रयत झाली होती रडवेली.. शिवबाची वीज कडकडली
हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली

शत्रू होता तो लबाड.. आई बहिणींची करी आबाळ
लज्जा गेले विसरुनी.. नेई माउली ना उचलुनी
जेव्हा मायमाउली तळमळली.. शिवबाची तलवार सळसळली
हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली


शत्रू जरी मुसलमान.... सर्व धर्माचा करी तो मान
शत्रुत्व नव्हते धर्माचे.. शिवबा होता अति महान
ख्याती देशोदेशी पसरली.. शत्रूची छाती धडधडली

हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली


अन्याया विरुध्द पेटली.. मराठ्यांची तोफ धडधडली

हिंदवी स्वराज्याची पताका मोठ्या दिमाखात फडकवली


-- स्नेहल

Monday, December 27, 2010

माझ्या नवीन चारोळ्या..!!


कधी वेदनेत ओघळे
कधी आनंदात तरळे
शब्दा वीण दाखवी
अश्रू भाव निराळे..!!
-- स्नेहल

शब्दांना नाही जमलं
ते नजरेने लगेच हेरलं
हृदयात प्रेमाचं बीज
नुसत्या इशारयानेच पेरलं..!!
-- स्नेहल

सोनेरी वेशात
सोनकळी फुलली
मनाच्या कप्प्यात
कायमची ठसली..!!
-- स्नेहल

परी सारखं रूप असे
ललना अशी हि सुंदर दिसे
विसावे हि नजर जेव्हा
नयनी तिचीच प्रतिमा दिसे..!!
-- स्नेहल



Sunday, December 26, 2010

अलविदा..!!!


आहे जिवंत मी म्हणून कुणास खरच का काही फायदा नाही
ह्या उपेक्षिलेल्या जगण्याचा उरलेला काहीच का अर्थ नाही

अपेक्षेच्या ओझ्याखाली दबतोय मी हे कुणी ओळखलेच नाही
मी आहे तरी कोण आणि कसा हे कुणी पारखलेच नाही

पण जाणार आहे सोडून सार आता हे पक्क ठरवलंय मी
शांततेच्या शोधात आता अस्तित्वालाच नष्ट करणार मी

जाईन मी सर्व दु:ख,, सारे लोकं सोडून जेव्हा
रडेल का कुणी बघेन मी वरून तेव्हा

जाणार मित्रानो मी माझी आठवण हि काढू नका
ह्या शापित जीवासाठी तुम्ही अश्रू हि गाळू नका

रक्ताच्या नात्याची लोकं पण मनाला भोकं होती त्यांच्या
आता पुसणार माझा कलंक खानदानावर होता जो त्यांच्या

सर्वाना चटका लावून निघून जाईन मी असा
ज्यांनी दुर्लक्षिले तेच चघळतील माझ्या मृत्यूची कथा


अस्तित्वात केले नाही पण मेल्यावर करतील सारे विधी
ज्यांनी केले जीवाला शांत पूजा करतील आत्म्याच्या शांतीसाठी

चर्चा होईल मृत्यूची माझ्या,, श्राद्ध होतील तिथीची
जिवंतपणी हेळसांड करून वाट बघतील कावळ्याची

दुर्लक्षिलेला हा जीव आता करतो विनवणी देवाची
दगडाचा जन्म दे देवा पण नको साथ ह्या माणसाची

अलविदा मित्रानो.. बघा निघालो मी सोडून सर्व
कदाचित राहील मी जिवंत तुमच्या तरी मनात सदैव...

-- स्नेहल

Thursday, December 23, 2010

कुछ हिंदी पंक्तियाँ..!!


ऐ सूरज एक एहसान कर
न ऐसे इन्हें परेशान कर
तु भी लुफ्त उठा इस खूबसूरती का
इन्हें मिलने का पूरा अरमान कर..
-- स्नेहल

और कुछ सोचने की वैसे तो जरुरत नहीं
ज्यादा बाते करने की आदत तो हमें भी नहीं
आपकी खूबसूरती के कायल तो सभी है यहाँ पे
और कुछ बयां करने की जरुरत नहीं..!!
-- स्नेहल


खुशियों का रोज़ त्यौहार हो
हसी की हमेशा बौछार हो
आप उतरे सीढिया दुखो की
सुखो की हमेशा भरमार हो..!!
--स्नेहल

जरो को आज बड़ा सुकून आया
जब आपका चेहरा यूँ नजर आया
यूँ देखते तो आपको रोज़ ही है
पर आजका रूप दिल को बड़ा भाया..!!
-- स्नेहल

नीले आसमान पे
लिखा दिल का फसाना
माना आप ही हो
जिसने किया हमें दीवाना..!!
-- स्नेहल

ये चेहरा जो सबसे प्यारा है
सोचना भी इसका बड़ा न्यारा है
दोस्ती खास है इसकी हमारे लिए
ये दोस्त बड़ा हसीं और बड़ा प्यारा है..!!
-- स्नेहल

Monday, December 20, 2010

चारोळ्या..!!!


मैत्री आपली दोन दिसाची
नात जुळलं वर्षाचं
ऋणानुबंध हा कायम टिकावा
सुत जुळाव हर्षाच ..!!

एकच आशा
इच्छापूर्ती करणारी
दुखाच्या अंधारात
सुख शोधणारी..

माणूस असल्याची किम्मत
नसते पैसा नसते संपत्ती
असते संस्कारा ची कमाई
आणि चारित्र्याची श्रीमंती..!!


मैत्रीच्या वाटेवर,, भेटी कुणी न कुणी
काही जाती निघून,, काही बसती मनी..
वर्षा मागे वर्ष,, असेच लोटत जातात
मैत्रीच्या वाटेवर आपले,, असेच भेटत जातात..!!


-- स्नेहल

Saturday, December 18, 2010

माझ घर..!!


नात्यांच्या भिंती असाव्या
संस्काराच्या सीमा असाव्या

आशीर्वादाच छत असाव

अस माझ घर असाव

अस माझ घर असाव...


खिडकीतून वाहोत सुखाचे वारे

दारातून येवोत प्रेमाचे सारे

जाताना सुखद आठवणी घेऊन जाव

अस माझ घर असाव

अस माझ घर असाव...


येणारे सारे तृप्त व्हावे

जाताना सुख घेऊन जावे

सर्वांनी पुन्हा फिरून याव
अस माझ घर असाव
अस माझ घर असाव...


-- स्नेहल

माझ्या लाडक्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली..!!


ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी
स्मरते क्षणोक्षणी का,, ती संपलेली कहाणी

तू मला दिलेले,, जे जीवनी संस्कार
दुख सोसुनी तू ,, दिली सुखाची चादर
ऋणी तुझा ग मी,, कशी फिटतील ती देणी
ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी

रोजची रात्र येई,, उद्विग्न तारकांची
रवी रोजचा देई,, तिरीप वेदनांची
संपली तुझ्या कंठीची,, मधु रसाळ गाणी
ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी

जनमानसात राहतो मी,, सारयासवे हसून
कंठीतो शांत रात्र मी,, तुज मानसी वसवून
रडतो उशीत मी का,, नयनी येई पाणी
राहिलो एकला मी,, कुशीत घेईल का कोणी
आता कुशीत घेईल का कोणी.....????


-- स्नेहल





मनी तुझीच आस
स्वप्नी तुझाच भास
चित्ती राही सदैव
सदगुरु तुझाच आभास..!!

सदगुरु च्या पायी
सारेच होई दंग
ह्या जीवनाचा अर्थ
कळे सदगुरुच्या संग..!!

प्रत्येक क्षणी असावी
सदगुरु तुझी जाणीव
पोटात घे काही
राहिली भक्तीत उणीव..!!
-- स्नेहल


स्वामी मम नको सावली.. नका करू माझी इच्छा पुरी..
तुमची आठवण रोज करेल.. इच्छा माझी ती अधुरी..

तुमच्या आठवणी मनात ठेवुनी.. भक्तीत तुमच्या लीन राहुनी..
निष्पाप भावना मनी ठेवुनी.. अपेक्षांना आवर घालूनी..
...
तुमच्या वाटेवर मी चालुनी जीवनाचे सार शिकू दे..
स्वामी मी उन्हात राहून मीच आपल्याला सावली देऊ दे..!!

!! श्री स्वामी समर्थ !!

-- स्नेहल

चारोळ्या...!!!


वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध
नियतिने क्षणात घडवला
ताटकळलेल्या मनासाठी
एक सुंदर जीव मढवला..!!
समुद्राच्या लाटे पेक्षा
भावनेची लाट मोठी
प्रेमाच्या तुझ्या भरतीने
आली दु:खाला ओहोटी..!
रूप तिचे बघून शब्द हि लाजले
कवितेच्या रुपात आपोआप सजले
सौंदर्याने शब्द असे काही भिजले
धुंदीत आपसूकच सुरात गुंफले..!!
शब्दा विना भावनेचा
भाव तुला कळावा
मनातील प्रेमभाव हा
तू नजरेतून ओळखावा..
नसलीस तू इथे कि मला नाही करमत
तुझ्याशिवाय माझ मन कुठे च नाही रमत
नको ना ग जात जाऊस मला अस सोडून
तुझ्या विना जगत असतो मी जीव हरवून..!
म्हणशील तू पण मी बोलणार नाही
मनातील गुपित खोलणार नाही
हे निशब्द प्रेम असंच सुरु राहील
जग बदलेल पण मी बदलणार नाही...!!!!
-- स्नेहल

काही निवडक चारोळ्या..!!


गोड बोलले म्हणजे प्रेम होत नाही
छान म्हंटले म्हणजे जीव जडत नाही
पण गोड म्हणून होणाऱ्या प्रेमाचा
छान गोडवा जीवनातून कधी जात नाही 

आहे मी प्रेमात अस मी कधी म्हंटल
आवडते मला कुणी हे मी कधी म्हंटल
पण नाहीच आहे कुणी माझ आपल
हे हि मी कधी नाकारलं..:)

तू आहेस म्हणून मी आहे
दुखी जीवनात आनद आहे
जरी असेल आपल्यात दुरावा
जीवनात माझ्या तुझाच गोडवा

बघून तूला जीव प्रेमात पडला
प्रेमाचा छंद तुझ्या मूळे जडला
आनंदाशी मिलाप तुझ्या मूळे घडला
जीवनाला रंग तुझ्या मूळे चढला..

आठवणीने जीव व्याकूळला
दुराव्याने हा कळवळला
आज हा चेहरा हि झाकोळला
तुझ्या विना जीव तळमळला

सगळ जवळ असून आज
काही हरवल्यासारख वाटत
तुझ्या विना हे सार जग
हिरमुसल्या सारख वाटत

तुझ्या विना झाले
जीवन सुने सुने
सारे जवळ असून
वाटे उणे उणे 


-- स्नेहल

Friday, December 17, 2010

मन हे धावे तुझ्याकडे...!!!


अथांग ह्या पाण्या सवे... मन हे धावे तुझ्या कडे

अल्लड ह्या वारया सवे.. मन हे धावे तुझ्या कडे


तुझ्या सोबती... माझ्या मनाचे

अलगद अवचित... जुळले नाते

गेलीस तू ग कुणी कडे... मन हे धावे तुझ्या कडे

चंचल ह्या हवे सवे... मन हे धावे तुझ्या कडे


विरहातुनी ह्या... आठवनीनचा

तो उमाळा... त्या क्षणांचा

विरून गेले कुणीकडे.. मन हे धावे तुझ्या कडे

फुलातल्या गंधा सवे.. मन हे धावे तुझ्या कडे


आपली भेट.. ती जवळीक

माझ्या साठी.. खुदकन हसन

रुसलीस का ग तू तिकडे.. मन हे धावे तुझ्या कडे

हसण्याच्या त्या शोधा सवे.. मन हे धावे तुझ्या कडे


तुझा दुरावा.. असा शहारा

वेड्या मनाला.. तुझा सहारा

अश्रू साठले डोळ्यांच्या कडे... मन हे धावे तुझ्या कडे

अश्रूच्या ह्या फुला सवे... मन हे धावे तुझ्या कडे


ह्या जीवाला.. ह्या मनाला

समजून उमजून .. तोडून दुरावा

येशील कधी तू माझ्या कडे.. मन हे धावे तुझ्या कडे

आठवणीच्या बंधा सवे.. मन हे धावे तुझ्या कडे



अथांग ह्या पाण्या सवे.. मन हे धावे तुझ्या कडे

अल्लड ह्या वारया सवे.. मन हे धावे तुझ्या कडे 


--स्नेहल

नमन आदिशक्तीला ..!!


अगाध महिमा तुझी... तू आदिशक्ती

मनी स्वप्नी जगीस्थळी... तूझीच शक्ती


धन्य करी ते... तुझे रूप तेजस्वी

भक्तीत होती लीन... सारे थोर तपस्वी


भक्त लेकरावरी... तुझीच दृष्टी

ममतेने भरलेली... हि तुझीच सृष्टी


मनापासुनी करती... जी तुझीच भक्ती

त्या सर्वावर असते... तुझी कृपादृष्टी


प्रेमाने भरलेली... तुझीच काया

जगती सर्वांवर... तुझी अगाध माया


हे आदीशक्ती... आई भवानी माता

तुझ्या विना स्मरावे कोणाला आता


दुख सारुनी दूर... कर सुखी भक्तांना

आई म्हणती सारे... कवेत घे लेकरांना


-- स्नेहल

आठवणी...




सांजवेळी निवांत क्षणी मावळत्या सूर्याला न्याहाळताना
आठवली ती सारी माणस जी सोडून गेली ह्या जीवनाला

भावनेच्या आवेशात अश्रूंच्या आवेगात चित्ती त्यांना स्मरताना
आठवतात ते सारे दिवस होते जवळ ते असताना

मावळत्या सूर्याप्रमाणे हि लोक हि सारी मावळत गेली
सूर्य तर पुन्हा उगवला पण ती लोक कधीच नाही दिसली

आज सगळ असून त्यांची उणीव खूप भासते
सर्व जवळ असून हि मन त्यांच्यासाठी तरसते

न होती कसली अपेक्षा होती फक्त त्यांच्या प्रेमाची आस
ते इतक दिल कि त्या प्रेमाचा आज हि होतो क्षणोक्षणी भास

आठवून त्यांना आज अश्रूना हि मोकळी मिळते वाट
ते चेहरे आठवून मनी रोज येते आकांताची लाट

नसेल का आली त्यांना थोडीपण आमची कीव
कसा सोडून दिला असेल त्यांनी आम्हाशिवाय तो जीव

कळवळूनी हाक मारुनी वाटते त्या सर्वाना परत बोलवावे
देवा कृपा करून आम्हासाठी त्या जीवाना पुन्हा इथे हलवावे

-- स्नेहल

काळोख्या त्या रात्री...!!! २६/११ च्या सर्व शहिदांना आणि जीव गमावलेल्या निष्पाप जीवांना सलाम...!!!


काळोख्या त्या रात्री बंदुकीचे बार उडत होते

अनेक निष्पाप जीव त्यात तडफडत होते

त्या जीवांमध्ये होते काही शूर वीर देखील

जे आपल्या धरणी मातेसाठी धडपडत होते


रात्रीने त्या आयुष्यांना हि अंधकारात लोटले होते

दूर देशीचे ते क्रूर दानव मारण्यासाठीच पेटले होते

आलेल्या संकटात जाती धर्म दूर सरला होता

आपल्या माणसांसाठी माणुसकी हाच एक धर्म उरला होता


नेहमी निष्क्रिय म्हणवणाऱ्या जवानांनी अशी क्रिया केली होती

जीव गमावून आज त्यांनी स्वताचीच उत्तरक्रिया मांडली होती

अंधारी ती रात्र सरली होती गर्द काळोख हि हटला होता

मुंबई च्या आसमंतात आसवांचा मेघ मात्र दाटला होता


करकरे साळसकर कामटे असे बरेच जवान गमावले होते

त्या शहिदांच्या बलिदानाने मुंबईने स्वातंत्र्य कमावले होते

त्या शहिदांना सलाम केले थरथरणारया हातानी, अश्रुपूर्ण डोळ्यांनी

व्यर्थ नाही जाऊ देणार तुमचे बलिदान निश्चय केला हजारोनी ..!!!


--- स्नेहल