चारोळ्या..!!!
मैत्री आपली दोन दिसाची
नात जुळलं वर्षाचं
ऋणानुबंध हा कायम टिकावा
सुत जुळाव हर्षाच ..!!
एकच आशा
इच्छापूर्ती करणारी
दुखाच्या अंधारात
सुख शोधणारी..
माणूस असल्याची किम्मत
नसते पैसा नसते संपत्ती
असते संस्कारा ची कमाई
आणि चारित्र्याची श्रीमंती..!! मैत्रीच्या वाटेवर,, भेटी कुणी न कुणी
काही जाती निघून,, काही बसती मनी..
वर्षा मागे वर्ष,, असेच लोटत जातात
मैत्रीच्या वाटेवर आपले,, असेच भेटत जातात..!!-- स्नेहल
No comments:
Post a Comment