शिवाजीच्या नावाचं चैतन्य आज हि तरुणात सळसळत
व्यसनाच्या धुंदीत ह्याचं प्रेम नको त्या गोष्टीवर फळफळत
आजचे हे मावळे बघून आपल्यालाच मळमळत...
महाराजां प्रमाणे आजचे मावळे, तलवार हि बाळगतात
मात्र द्वेष करता करत हे रक्ताची नाती हि विसरतात
महाराजांनी शत्रूचा नायनाट केला हे मात्र आपल्यांचीच कत्तल चालवतात..
महाराजांच्या जयंतीला ह्याचं हि रक्त पेटून उठत
दारू च्या नशेत मग ह्यांना हि मोठ स्फुरण चढत
मग त्या स्फुरणात थोडी अजून दारू पिण होत..
महाराज पर-स्त्री ला देखील मातेप्रमाणे वागवत होते
आजच्या मावळ्यांनी तर घराच्या अब्रूला हि नागवल होते
पर-स्त्री साठी ह्यांनी मातेला हि घरा बाहेर घालवलं होते
महाराज तुम्ही जे स्वप्न पाहीले स्वराज्यासाठी
तुमच्या मावळ्यांनी जे बलिदान दिले तुमच्यासाठी
ते ह्या जगात आता मिळण मुश्कील आहे
तुमच्या मावळ्या पैकी थोडेच आता शिल्लक आहेत
बाकी सगळेच संस्कारांनी कफल्लक आहेत..
तुम्ही याल परत पण आमचीच खाली होईल शरमेने मान
कारण आम्हीच घालवली तुमच्या स्वराज्याची शान
आम्हीच घालवली तुमच्या स्वराज्याची शान..!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment