आयुष्य जगण फार सोप्प आहे
पण आयुष्याची व्याख्या करणं मोठ कठीण आहे..
आलेला दिवस मावळणे हे बघण खूप छान आहे
पण दिवसात किती जण दुखावले ह्याच कुणाला भान आहे..??
बाकीच्यांचा करावा तिरस्कार स्वतःला हवा मात्र मान आहे..
माणूस म्हणून काय कर्तव्य आहे ह्याची कुणाला जाण आहे..??
स्वार्थ.. द्वेष.. लोभ.. मत्सर सगळ आहे
पण माणुसकीचा च मोठा दुष्काळ आहे
माया जमवून मोक्षाच्या प्रतीक्षेत जगण हेच अंतिम ध्येय आहे
पण प्रेमाच्या मायेची झोळी मात्र आज हि प्रेमाच्याच प्रतीक्षेत आहे
हेच आयुष्य असेल तर ह्यात जगण्याचा अंश तो काय
आणि अश्या जगलेल्या आयुष्याचा सारांश तो काय..??
-- स्नेहल
No comments:
Post a Comment