Sunday, December 26, 2010

अलविदा..!!!


आहे जिवंत मी म्हणून कुणास खरच का काही फायदा नाही
ह्या उपेक्षिलेल्या जगण्याचा उरलेला काहीच का अर्थ नाही

अपेक्षेच्या ओझ्याखाली दबतोय मी हे कुणी ओळखलेच नाही
मी आहे तरी कोण आणि कसा हे कुणी पारखलेच नाही

पण जाणार आहे सोडून सार आता हे पक्क ठरवलंय मी
शांततेच्या शोधात आता अस्तित्वालाच नष्ट करणार मी

जाईन मी सर्व दु:ख,, सारे लोकं सोडून जेव्हा
रडेल का कुणी बघेन मी वरून तेव्हा

जाणार मित्रानो मी माझी आठवण हि काढू नका
ह्या शापित जीवासाठी तुम्ही अश्रू हि गाळू नका

रक्ताच्या नात्याची लोकं पण मनाला भोकं होती त्यांच्या
आता पुसणार माझा कलंक खानदानावर होता जो त्यांच्या

सर्वाना चटका लावून निघून जाईन मी असा
ज्यांनी दुर्लक्षिले तेच चघळतील माझ्या मृत्यूची कथा


अस्तित्वात केले नाही पण मेल्यावर करतील सारे विधी
ज्यांनी केले जीवाला शांत पूजा करतील आत्म्याच्या शांतीसाठी

चर्चा होईल मृत्यूची माझ्या,, श्राद्ध होतील तिथीची
जिवंतपणी हेळसांड करून वाट बघतील कावळ्याची

दुर्लक्षिलेला हा जीव आता करतो विनवणी देवाची
दगडाचा जन्म दे देवा पण नको साथ ह्या माणसाची

अलविदा मित्रानो.. बघा निघालो मी सोडून सर्व
कदाचित राहील मी जिवंत तुमच्या तरी मनात सदैव...

-- स्नेहल

No comments:

Post a Comment