क्षण कधी आनंदाचा असतो
तर कधी आसवांचा असतो..
कधी स्वत:साठी जगण्याचा असतो
कधी दुसरयासाठी हसण्याचा असतो..
कधी भावना आवरण्याचा असतो
कधी आठवणीत हरवण्याचा असतो..
कधी सुखात रमण्याचा असतो
कधी दुखात रडण्याचा असतो..
क्षण हि क्षणाला बदलत असतो
जीवनाची भाषा शिकवत असतो..!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment