आजच्या ह्या जगात....
हृदय आहे पण त्यात प्रेम नाही
मन आहे पण त्यात भावना नाही
वेदना देण आहे पण विचारांची संवेदना नाही
दुखावन आहे पण दु:ख विचारण नाही
बोलण आहे पण त्यात भाव नाही
छान दिसन आहे पण छान वागण नाही
प्रेमाची अपेक्षा आहे पण प्रेम देण्याची इच्छा नाही
पैश्याची श्रीमंती आहे पण चारित्र्याची संपन्नता नाही
फक्त जन्म माणसाचा आहे पण त्यात माणुसकी नाही
जगण आहे पण त्या जगण्याला अर्थ नाही
माणूस आहे पण माणूस म्हणायला सार्थ नाही..!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment