Friday, December 17, 2010

काळोख्या त्या रात्री...!!! २६/११ च्या सर्व शहिदांना आणि जीव गमावलेल्या निष्पाप जीवांना सलाम...!!!


काळोख्या त्या रात्री बंदुकीचे बार उडत होते

अनेक निष्पाप जीव त्यात तडफडत होते

त्या जीवांमध्ये होते काही शूर वीर देखील

जे आपल्या धरणी मातेसाठी धडपडत होते


रात्रीने त्या आयुष्यांना हि अंधकारात लोटले होते

दूर देशीचे ते क्रूर दानव मारण्यासाठीच पेटले होते

आलेल्या संकटात जाती धर्म दूर सरला होता

आपल्या माणसांसाठी माणुसकी हाच एक धर्म उरला होता


नेहमी निष्क्रिय म्हणवणाऱ्या जवानांनी अशी क्रिया केली होती

जीव गमावून आज त्यांनी स्वताचीच उत्तरक्रिया मांडली होती

अंधारी ती रात्र सरली होती गर्द काळोख हि हटला होता

मुंबई च्या आसमंतात आसवांचा मेघ मात्र दाटला होता


करकरे साळसकर कामटे असे बरेच जवान गमावले होते

त्या शहिदांच्या बलिदानाने मुंबईने स्वातंत्र्य कमावले होते

त्या शहिदांना सलाम केले थरथरणारया हातानी, अश्रुपूर्ण डोळ्यांनी

व्यर्थ नाही जाऊ देणार तुमचे बलिदान निश्चय केला हजारोनी ..!!!


--- स्नेहल

No comments:

Post a Comment