आयुष्याच्या प्रत्येक क्षणी कुणी न कुणी भेटत जात..
कुणी निघून जात तर कुणी आपलंस होत जात..
क्षणाच्या भेटीने नात जुळल्यासारख वाटत..
भेट कधी संपू च नये अस वाटत राहत..
एखाद नात दूर असूनही जपले जाते..
अंतर असूनही त्यात जवळीक असते..
मला हि असंच कुणी भेटलं..
दूर असूनही जवळच भासलं..
सौंदर्यावर हि नजर हि भाळली..
नुसत बोलण्यानेच मनाची तार जुळली..
मैलो न मैलो च अंतर मनाने क्षणात कापले..
बोलण्यातूनच भेट झाल्यासारखे वाटले..
गोड स्वभाव.. गर्वाचा अभाव...
लाघवी बोलण्याने घेतला काळजाचा ठाव..
तिच्या सवे वेळ कसा जातो कळत नाही..
ती नसली तर काय कराव हे हि आता कळत नाही..
दूर असूनही, ओळख नसूनही तिने हि मैत्री जपली..
अशी छान मला एक मैत्रीण भेटली..
अशी छान मला एक मैत्रीण भेटली..!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment