कवी नसून कधीतरी कवी बनून मी कवितेला आपलं समजल..
मनात आल आणि प्रत्यक्षात अनुभवलं ते फक्त शब्दात उतरवल..
शब्दांची गुंफण.. लयीची ठेवण ह्या गोष्टी माझ्या पासून दूर होत्या
फक्त भावनेचा आदर होता आणि प्रेमाचा माझ्या शब्दांना सूर होता
मी व्यक्त केला सुखातला आनंद.. दुखातील वेदना..
हृदयातील प्रेम.. मनातील भावना..
माणसातील माणुसकी.. नात्यांची बांधिलकी..
त्यागाची श्रेष्ठता.. निष्ठेची अखंडता..
श्रद्धेची कास.. विश्वासाचा ध्यास..
आदराची गरज.. आपुलकीची समज..
संस्कारांची सिद्धता.. संवेदनांची तत्परता ..
शब्दांशी खेळताना.. ओळीने मांडताना नकळत कविता घडून गेली
कधी आनंदाने खुलवून गेली तर कधी अश्रुनी भिजवून गेली..!!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment