चारोळ्या...!!!
वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध
नियतिने क्षणात घडवला
ताटकळलेल्या मनासाठी
एक सुंदर जीव मढवला..!!
समुद्राच्या लाटे पेक्षा
भावनेची लाट मोठी
प्रेमाच्या तुझ्या भरतीने
आली दु:खाला ओहोटी..!
रूप तिचे बघून शब्द हि लाजले
कवितेच्या रुपात आपोआप सजले
सौंदर्याने शब्द असे काही भिजले
धुंदीत आपसूकच सुरात गुंफले..!!
शब्दा विना भावनेचा
भाव तुला कळावा
मनातील प्रेमभाव हा
तू नजरेतून ओळखावा..
नसलीस तू इथे कि मला नाही करमत
तुझ्याशिवाय माझ मन कुठे च नाही रमत
नको ना ग जात जाऊस मला अस सोडून
तुझ्या विना जगत असतो मी जीव हरवून..!
म्हणशील तू पण मी बोलणार नाही
मनातील गुपित खोलणार नाही
हे निशब्द प्रेम असंच सुरु राहील
जग बदलेल पण मी बदलणार नाही...!!!!
-- स्नेहल
Sundar
ReplyDelete