मनात असते ते सांगता येत नाही
स्वप्नात दिसते ते बोलता येत नाही..
कित्ती गोष्टी जीवनात असतात
ज्या कराव्या वाटतात पण करता येत नाही..
नंतर करू म्हणत जीवन सरून जाते
मनात आठवणी ठेऊन शरीर हि मरून जाते..
हा जन्म पुन्हा नाही हे जरी समजत असते
तरी ह्या जन्मात हवे ते कधीही मिळत नसते..
बालपणीच्या आशा तारुण्यात मावळतात
तारुण्याच्या इच्छा वार्धक्यापर्यंत डावलतात..
वार्धक्या सोबत मृत्यूचे वेध लागतात
पुढील जन्माच्या आशेवर पुन्हा स्वप्नच सोबत राहतात..
पूर्ण जीवन हे आशेवरच जगले जाते
मरणा नंतर हि आशाच कायम राहते..
मृत्यू नंतर जीवन असूच शकत नाही
जे जिवंतपणी मिळाले नाही ते नंतर कधी हि मिळूच शकत नाही..
म्हणूनच.., जे वाटते ते सगळे करावे..
स्वत सुखी राहून दुसऱ्यांना हि सुख द्यावे..
नाहीतर असे निरर्थक जीवनच का जगावे..??
नाहीतर असे निरर्थक जीवनच का जगावे..??
-- स्नेहल
No comments:
Post a Comment