Thursday, December 30, 2010

थर्टी फर्स्ट...!!!


थर्टी फर्स्ट...!!

नववर्षाची चाहूल आता सगळी कडे लागलेली दिसते... काहींचा थर्टी फर्स्ट कसा साजरा करायचा आणि किती दारू प्यायची ह्याची हि अगदी फुल प्लान्निंग केली आहे... नववर्षाचा एवढाच काय तो संकल्प...!! आणि आता तर corporates मध्ये आणि जवळपास सगळीकडेच १ जानेवारी म्हणजे अघोषित सुट्टी झाली आहे.. ते हि बरोबरच आहे म्हणा.. मागच्या वर्षी ह्या लोकांनी दारूच इतकी पिलेली असते कि नवीन वर्ष आले तरी तिची झिंग काही उतरत नाही... वर्ष बदलतात पण थर्टी फर्स्ट साजरा करण्याची रीत मात्र बदलत नाही.. होळी आणि थर्टी फर्स्ट म्हणजे खास दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा दिवस.. काहींचा तर्र व्ह्याचा दिवस तर काहींसाठी दारू पिण्याची सुरुवात करण्याचा एक उत्कृष्ट आणि "शुभ" दिवस... पण दारू मात्र पिलीच पाहिजे नाहीतर थर्टी फर्स्ट ची काय मजा हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न.. मनोरंजन नसले तरी चालेल पण दारू मात्र हवी.. आणि जास्त झाली आणि व्यक्ती झिंगु लागली कि तसे हि बाकीच्यांचे मनोरंजन होतेच कि..??

मी आधी ज्या ऑफिस मध्ये होतो तेव्हा नेहमी पार्टी ला जाणं व्हायचं.. आता माझ्यावर काही कधी दारू पिण्याचे संस्कार झालेले नाही.. त्यामुळे मी दारू पिण तर दूर.., त्याच्या वासापासून हि लांब पळतो .. पिणार्यांच्या त्या पार्टीमध्ये मला म्हणजे तुछ्ह समजल जायचं.. कारण एकतर त्यांच्या इतक मला दारूच "ज्ञान" हि नव्हत आणि त्यांच्याप्रमाणे मला काही "चढत" नव्हत आणि घरी पण मी शुद्धीत पोहोचत होतो.. जो धुंदीत एकमेकांना कसेबसे सांभाळत घरी जातो तो खरा आणि सच्चा मित्र हि त्यांनी केलेली मित्राची (?) व्याख्या असायची.. पण त्यांच्या प्रलोभनाला ना मी कधी बळी पडलो ना हि मी त्यांच्या हिणवण्याने कधी दुखी झालो.. अगदी नुकते कोलेज मधून निघालेली ती छोटी पोर अशी घरी गेल्यावर ह्यांचे पालक काय म्हणत असतील ह्याचा मला नेहमी विचार यायचा.. काहींची तर ऑफिस समोरच्या बियर बार वर उधारी असायची.. सकाळी आम्ही काही पुरातन काळातले मुलं चहा पिऊन ऑफिसला जायचो तर हे पठ्ठे सकाळी सकाळी थोडी बियर घेऊन मीटिंगला बसायचे.. म्हणजे ह्यांचा प्रत्येक दिवस म्हणजे थर्टी फर्स्टच असायचा..

मित्रानो तुमच्या पैकी काही थर्टी फर्स्ट साजरे करणार असाल.. प्रत्येकाची तर्हा तशी वेगळी असते.. नेमकी कशी करणार हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जरा सांभाळून साजरा करा.. तुम्ही विचारलं आमच विचारतोस,, तू कसा साजरा करणार.. पण एक तर दारू पिणार्यांच्या लिस्टमध्ये मी नसतो त्यामुळे पार्टी आणि ती हि थर्टी फर्स्ट ची मला दुसर्या प्रमाणे साजराच करता येत नाही.. आणि ३१ डिसेंबर ला माझ्या मम्मीचा वाढदिवस असतो.. त्यामुळे बाकी दुनिया जरी दारूच्या नशेत झिंगत असली तरी मी मात्र माझ्या मम्मीच्या प्रेमाच्या नशेत असतो...

आणि संकल्पाच म्हणाल तर नववर्षाचा मी कधीच संकल्प करत नाही.. कारण माझा आयुष्याचा संकल्प फक्त एकच आहे कुणाला दुखवू नये आणि हिणवू नये आणि आपल्याला फायदा होवो अथवा ना हो पण दुसर्यांना मदत करत राहावी.. बाकी जे घडायचे ते घडतच असते.. सर्वांनी थर्टी फर्स्ट खूप मस्त साजरा करावा.. पार्टी करावी.. नाचावं... गावं.. फक्त दारू पण जरा सांभाळूनच घ्यावी.. आणि ह्या वर्षासोबतच द्वेष.. हेवा.. तिरस्कार हे सारे मागे सारून नवीन वर्ष सोबत नात्यांची हि नवी सुरुवात करावी..

तुम्हा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हा सर्वाना आनंदात आणि सुखात जाव आणि आपली मैत्री आणि प्रेम हि असच वृद्धिंगत होत रहाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना...


(आणि ह्या लेखासाठी हा फोटो ह्याच करता आहे कि ज्यांना "थोडी" चालते त्यांच्यासोबत तर मी जाऊ शकत नाही पण ह्या (फक्त) फोटो ने साथ तर देऊ शकतो.. आणि जे माझ्या सारखेच "पुरातन" काळातले आहेत त्यांनी फक्त लेख वाचावा..आपण नंतर पार्टी करूच...)

-- स्नेहल

No comments:

Post a Comment