Sunday, January 2, 2011

थर्टी फर्स्ट ब्राईट अन जगण्याची फाईट ...!!!


31st ची हि नाईट
दिसते एकदम ब्राईट
पण नाही दिसत कुणाला
चाललेली जगण्याची फाईट

हवी कुणाला दारू
अन कुणाला बोटी
तर कुणाला भुलवी
फक्त एक रोटी

व्हिस्की अन रम
विसरवी काहींचा गम
कुठे सुखाची झोप
करून मणभर श्रम

नववर्षाची हि संपेल रात
बाटल्या हि ओसंड्तील अमाप
काही पडतील नशेत उद्या
कुठे उष्ट्यावर हि पडतील उड्या

नको असावा असा विरोधाभास
नको घडो कधी कुणाला उपास..

-- स्नेहल

No comments:

Post a Comment