मी असेन थंड
पण मन आहे तप्त
मी असेन निरस
पण मनात इच्छा सुप्त
मी असेन शांत
पण मनात आहे आवेग
मी असेन बंड
पण मनात आहे उद्वेग
मी असेन कठोर
पण मन आहे कोमल
मी असेन दुष्ट
पण मन आहे निर्मळ
मी असेन उद्विग्न
पण मन आहे स्पष्ट
मी असेन वाईट
पण मन आहे मस्त
मी असेन मर्त्य
पण मन आहे जिवंत
मी नसेन हयात
पण मन असेल तुम्हासवे सदैव..!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment