Sunday, January 23, 2011

अंबामाई...!!


अंबा माई च्या कृपेने ,, होई साऱ्यांचा उद्धार
आई तुझ्याच ह्या भक्तीने,, होती दुख सारे ते पार

संसारी होतो रममाण,, झाले होते तुझ विस्मरण
चूकभूल माफ कर आता ,, आलो तुला मी शरण

संकटांचा होई फुत्कार,, आई दाखव तू चमत्कार
हिम्मत देऊन मजसी,, तू दूर कर अंध:कार

आई अखंड दे वरदान,, तुला भेटाया लांबून
आले हे लेकरू तुझ्याच,, पायी घालाया लोटांगण

अंबा माई च्या कपाळी,, कुंकू शोभून दिसतो लाल
हिरवा चुडा,, पानाचा विडा अन सोन्याच दागिन

रूप तुझे भासे अति छान,, विसरलो मी देह भान
आई भक्तीत तुझ्याच लीन,, मी होऊन झालो बेभान

आई आई ,, घे मला जवळ
जानी ना कोणी ,, ह्या जीवाची तळमळ

तुझ्या भेटीची होती ओढ,, ह्या जीवाला घे कवेत
सोडून सारे आई,, मी आलो तुझ्याच कुशीत

--स्नेहल

No comments:

Post a Comment