Wednesday, January 19, 2011

राजा अन राणी..!!


संसाराच्या खेळा मधली
प्यादी उडाली दूर आकाशी
राजा राणी सवे उरली आता
अबोल शब्द अन अबोल प्रीती

राजा होता अति हुशार
संसाराचा ओढी भार
राणी होती जोडीला
भाग्याला तिचा हि उभार

सांजवेळी, राजा अन राणी
आठवती ती प्रेमकहाणी
प्रेमाचे ते क्षण सारे अन
लाडाची ती गोड गार्हाणी

आयुष्याच्या संध्याकाळी
करती दोन्ही हाच विचार
श्वास तुटता ह्या देहाचा
सरणावर हि देऊ आधार

-- स्नेहल

No comments:

Post a Comment