Monday, January 17, 2011

जीवनातली मिठास..!!


नात्यात रस असावा
त्याला प्रेमाचा स्वाद असावा
असा स्वादिष्ट ऋणानुबंध
आपण हि मनी जपावा...

एकमेकांनी मिळून हा
स्वाद चाखत राहावा
आयुष्यातला हा आस्वाद
असाच कायम रहावा...

अळणी क्षण आले काही
करू त्यावर मैत्रीचा शिडकावा
जीवनाच्या पानावर वाढलेला
भावनेचा पक्वान्न असावा...

--स्नेहल

No comments:

Post a Comment