Monday, January 31, 2011
गणतंत्र ,, प्रजासत्ताक,, गणराज्य,, रिपब्लिक डे कि २६ जानेवारी...??
देशाचे बिघडले ताळतंत्र
कामी येई ना काही मंत्र
अन थाटात मनवतील आता
पुन्हा देशाचा हा गणतंत्र
खाण्यास नसे दोन घास
जल हि ना मिळे पिण्यास
करून प्रजेकडे डोळेझाक
मनवतील असा हा प्रजासत्ताक
देश अखंड अन अविभाज्य
खूप प्रांत आणि खूप राज्य
दु:खाचे जरी असेल अधिराज्य
मनवायचा मात्र गणराज्य
सुट्टीच्या दिनाची तर मजाच न्यारी
नुसत झेंडे फडकावून तर यायचे घरी
देश प्रेम दाखवण्याची हि मोठी मजबुरी
मनवतील असा हा २६ जानेवारी
सत्तेची नशा अन स्विस चा पैसा
हेच राजकारणच ब्रीदवाक्य आहे
भ्रष्टाचार बोकाळला सगळी कडे
मनवायचा आहे मात्र रिपब्लिक डे
झेंडा फडकवायचा तेवढा आवेश
देशभक्तीचा नसे कुठे हि लवलेश
ह्या दिनाचे नाव असतील अनेक
पण ह्यादिवशी तरी जगा होवून एक..!
--- स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment