नववर्ष...!!!
गत वर्षाची सरली रात
नव वर्षाची झाली प्रभात
जुन्या आठवणी घेऊन सोबत
पुन्हा नव्याने करा सुरुवात
झाले गेले विसरून जावे
नव वर्षी नवे बंध जुळावे
सुखाचे झुले अंगणी झुलावे
नाते असेच वृद्धींगत व्हावे
दु:खाला नसावा कुठे सहारा
वेदनेला जीवनात थारा नसावा
नात्याची गुंफून वेली व्हावी
त्यावर प्रेमाची कळी खुलावी
संकल्प नसावा फक्त वर्षापुरता
विरून जो जाई वर्ष सरता सरता
नसावा संकल्प नुसता स्वार्थाचा
करा संकल्प मैत्री अन प्रेमाचा
गत वर्षाला पुन्हा आठवावे
नव वर्षाला नमन करावे
हर क्षण तुमचा आनंदाने जावे
हे नव वर्ष तुम्हाला सुखात जावे
--- स्नेहल
No comments:
Post a Comment