फितूर..!
श्वास कोंडला तुझ्या विना
थांबले हृदयाचे हि स्पंदन
प्राण च रुसला, आता
देवा तूच दे आलिंगन..
प्रेमात बुडुनी आकंठ
आज तूची घोटला कंठ
अश्रू नि तरी करावा
आता किती तो आकांत..
ठाण मांडले मृत्यूने
कवेत घेण्या तो अति आतुर
ज्याला आपल मानले
तो मात्र आज झाला फितूर..
--स्नेहल
No comments:
Post a Comment