Sunday, January 2, 2011

चारोळ्या..!!!


सर्वस्व घेऊन प्रिया
प्रीत मागू नको रे
प्राण हि तुझी अमानत
प्रेम मागू नको रे..!!
-- स्नेहल

बघुनी तुला सखे ग
काही सुचेना कशात
मन वेडावले असे हे
जीव गुंतला तुझ्यात..!!
-- स्नेहल

हास्य माझ्या मनीचे
तुझ्या मुखी उमलावे
अश्रू तुझ्या नयनीचे
माझ्यात सामवावे...!!
-- स्नेहल


प्रेम भाव संवेदना संस्कार
ह्याच मूर्तिमंत तू रूप आहेस
धन्य आहे मी प्रिये
कि तू माझी मैत्रीण आहेस..!!
--
स्नेहल

नाज असे मला जीच्यावारी
जमिनीवर आली ती हुस्न परी
माझ्या मनावर तिचेच राज्य
जीव जडला ह्या सुंदरी वरी...!
--स्नेहल

No comments:

Post a Comment