मनात होत खूप काही
मिळाले मात्र काही नाही
एक दिवस होत सगळ
आज हाती हि काही नाही
वाटता वाटता प्रेम वाटल
थोड परत द्याव हे कुणा वाटल नाही
वाटल घडेल खूप काही
पण अस होईल कधी वाटल नाही
देता देता देत गेलो
घेता घेता सगळ राहिलं
नाती सावरता सावरता
आज सगळच निसटून गेलं..
-- स्नेहल
No comments:
Post a Comment