सूड..!!
षंढ षंढ समजुनी,, अन्याय अति शोषूनी
थंड थंड मन प्रचंड,, उठू दे आता पेटुनी
कुंड कुंड गेले भरुनी,, आप्ताच्या त्या रक्तानी
मुंड मुंड भूतांचे,, दिसती धरती अस्मानी
बंड बंड आता करुनी,, धोका तो पत्करुनी
भांड भांड भांडूनी,, शांतता आणा कुठूनी
चंड चंड चंडीकेला,, चित्ती मनी स्मरूनी
खंड खंड खांडोळी,, करा दुष्मनाची अस्त्रांनी
दंड दंड थोपटुनी,, निघा घरटी सोडूनी
खिंड खिंड लढवुनी,, परता सूड घेवूनी
-- स्नेहल
No comments:
Post a Comment