आज भोंग्यांची भणभण झाली बंद
अन देहाची सुरु झाली किणकिण
काल प्रकाशिले होते ज्यांनी सारयांना
आज त्या घरात जळे मेणबत्ती मिणमिण
आज हि ते भोंगे दिसती सारे
जुने दिवस पुन्हा आठवती
घरदार खिसे अन मन सारे रिते
साथ द्यायला भोंगेच उरती तिथे
साथ सोडून गेले सारे पण
बिच्चारे भोंगे मात्र राहिले टिकून
आम्ही तरी घातला हैदोस रडून
त्यांना तर कुणी वाली हि नसेन
गिरणी कामगार म्हणून जगलो सारे
जीवनाचे उरले तेच सार
काल होतो राजे जिथले, आज
त्याच गिरणीखाली पिसून गेलो पार
-- स्नेहल
अन देहाची सुरु झाली किणकिण
काल प्रकाशिले होते ज्यांनी सारयांना
आज त्या घरात जळे मेणबत्ती मिणमिण
आज हि ते भोंगे दिसती सारे
जुने दिवस पुन्हा आठवती
घरदार खिसे अन मन सारे रिते
साथ द्यायला भोंगेच उरती तिथे
साथ सोडून गेले सारे पण
बिच्चारे भोंगे मात्र राहिले टिकून
आम्ही तरी घातला हैदोस रडून
त्यांना तर कुणी वाली हि नसेन
गिरणी कामगार म्हणून जगलो सारे
जीवनाचे उरले तेच सार
काल होतो राजे जिथले, आज
त्याच गिरणीखाली पिसून गेलो पार
-- स्नेहल
No comments:
Post a Comment