Wednesday, January 19, 2011
साकड़..!!
देवाच्या पाया वर घालू चला साकड
भोन्दुंच्या नावाने जमली सारी माकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड
हा बळी,, तो बळी,, नराचा बळी
प्राण झाले स्वस्त ह्या भोंदून मूळी-2
अंगारा,, शेंदूर,, फासला दगडावरी
देव झाला दुर्मिळ ह्या दगडामूळी -2
अश्या प्रथांच्या पाठीत घालू चला लाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड
वर्गणी,, देणगी,, मागती सारी
देवाच्या उरावर जमली खूळी -2
अडकला देव हि देवळा मधी
लुटारू च्या ताब्यात त्याची चावी-2
अश्या तुरुंगाला चला करू सारे वाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड
हा दादा,, हा बाबा,, अन हा बापू
भोंदू ची जमली जमात खूप -2
स्वताला म्हणवती हे देवाची रूप
आशीर्वादासाठी मोजती पैसे खूप -2
कथा सर्व आहे रे ह्या सारया भाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड
भोन्दुंच्या नावाने जमली सारी माकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड..
देवाची ची साथ रे, तर कोण करेल वाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड..
-- स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment