माझ्या ग प्रिये,, ऐक ना जरा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
मान्य आहे मला,, झाला उशीर जरा
होणार नाही ना,, अशी चूक पुन्हा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
पकडतो कान मी,, का काढू उठाबशा
विनवतो तुला,, जवळ ये जरा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
रात वाटे सुनी,, चंद्र वाटे सुना
गुलाबी रात हि,, करती खाणाखुणा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
मंद झुळूक हि,, बोलवी तुला
थंडी गोड हि,, आता सोड अबोला
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
आणिला गजरा,, माळीतो तुला
बघ अंगणी हा,, रातराणी चा सडा
सोड हा रुसवा,, हट्ट नाही बरा
रात हि खुलली,, प्रीत झंकारली
प्रेमाची धुंदी,, मनी संचारली
सोडूनी रुसवा,, अंगी शहारली
माझ्या ग प्रिये,, ऐक ना जरा
तुझ प्रेम हे,, वेड लावी जीवा
-- स्नेहल
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
मान्य आहे मला,, झाला उशीर जरा
होणार नाही ना,, अशी चूक पुन्हा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
पकडतो कान मी,, का काढू उठाबशा
विनवतो तुला,, जवळ ये जरा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
रात वाटे सुनी,, चंद्र वाटे सुना
गुलाबी रात हि,, करती खाणाखुणा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
मंद झुळूक हि,, बोलवी तुला
थंडी गोड हि,, आता सोड अबोला
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा
आणिला गजरा,, माळीतो तुला
बघ अंगणी हा,, रातराणी चा सडा
सोड हा रुसवा,, हट्ट नाही बरा
रात हि खुलली,, प्रीत झंकारली
प्रेमाची धुंदी,, मनी संचारली
सोडूनी रुसवा,, अंगी शहारली
माझ्या ग प्रिये,, ऐक ना जरा
तुझ प्रेम हे,, वेड लावी जीवा
-- स्नेहल
No comments:
Post a Comment