मंद झुळूक सवे येतो
रातराणी चा सुगंध
वेड्या मनाला मग छळतो
तुझ्या आठवांचा छंद
छंद हा दुष्ट
करे पार वेडापिसा
मनाला हि प्रश्न
क्षण जाईल तरी कसा..?
तुझ्याविना क्षणाला
विरहाची किनार
गुलाबी रातीला
कशी यावी तरी बहार..?
रातीने केला एक प्रश्न उभा
उत्तर शोधण्यात उगवली प्रभा
प्रश्न हि असा येई अवकाळी
अन पुसे, हरवली रे कुठे तुझी सोनकळी..?
--स्नेहल
No comments:
Post a Comment