सगळ काही करायचं सगळ काही मिळवायचं
आयुष्याच्या ध्येयपूर्तीसाठी आपल्यांना मात्र विसरायचं
नाही मानायची का नाती गोती, घेतला जन्म ज्यांच्यापोटी
दोन क्षण हि नाहीत का त्यांचा भेटीच्या काकूळतीसाठी
...
सारे सुख लोळण घेत असेल पायाशी
पण बायको आणि बाळ घरी बसले प्रेमाचे उपाशी
भरमसाठ पैसा पण प्रेमाची झोळी असेल फाटकी
जग सारे आहे मुठीत पण रिकामी प्रेमाची घरटी
दोन क्षण विसाव्याला आईची कुशी समोर असून
पण दोन पैश्यासमोर तीची किंमत जरा कमीच जाते वाटून
सर्व सुख मिळतील पण आई बाप परत कुठे मिळतील
आणि सुख हि तर सारी त्यांच्याच आशीर्वादाने मिळतील
उद्दिष्ट पूर्ण करण्यात असतो खरचं असतो खूप मनस्ताप
पण अश्या वेळी हिम्मत देती फक्त न फक्त आई आणि बाप..!!!
.....................फक्त न फक्त आई आणि बाप..!!
No comments:
Post a Comment