वातावरण कुंद कुंद
बेहोष मी का बेधुंद
मुग्ध अशा निसर्गामध्ये
जडला तव आठवांचा छंद
झुळूक येई मंद मंद
लेऊन तुझ्या प्रीतीचा गंध
मन फिरते तुझ्या भवती
जशी भ्रमराची फुलावर रुंज
प्रेमाची असावी कक्षा आपली
क्षितिजा परी रुंद रुंद
त्या कक्षे खाली आपण असावे
सुखा मध्ये कायम मग्न...!!
-- स्नेहल
No comments:
Post a Comment