ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी
स्मरते क्षणोक्षणी का,, ती संपलेली कहाणी
तू मला दिलेले,, जे जीवनी संस्कार
दुख सोसुनी तू ,, दिली सुखाची चादर
ऋणी तुझा ग मी,, कशी फिटतील ती देणी
ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी
रोजची रात्र येई,, उद्विग्न तारकांची
रवी रोजचा देई,, तिरीप वेदनांची
संपली तुझ्या कंठीची,, मधु रसाळ गाणी
ते सूर संपले अन,, मागे उरे निशाणी
जनमानसात राहतो मी,, सारयासवे हसून
कंठीतो शांत रात्र मी,, तुज मानसी वसवून
रडतो उशीत मी का,, नयनी येई पाणी
राहिलो एकला मी,, कुशीत घेईल का कोणी
आता कुशीत घेईल का कोणी.....????
-- स्नेहल
No comments:
Post a Comment