Monday, January 31, 2011

तुझा रुसवा ...!!


माझ्या ग प्रिये,, ऐक ना जरा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा

मान्य आहे मला,, झाला उशीर जरा
होणार नाही ना,, अशी चूक पुन्हा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा

पकडतो कान मी,, का काढू उठाबशा
विनवतो तुला,, जवळ ये जरा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा

रात वाटे सुनी,, चंद्र वाटे सुना
गुलाबी रात हि,, करती खाणाखुणा
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा

मंद झुळूक हि,, बोलवी तुला
थंडी गोड हि,, आता सोड अबोला
सोड हा रुसवा,, ये मिठीत जरा

आणिला गजरा,, माळीतो तुला
बघ अंगणी हा,, रातराणी चा सडा
सोड हा रुसवा,, हट्ट नाही बरा

रात हि खुलली,, प्रीत झंकारली
प्रेमाची धुंदी,, मनी संचारली
सोडूनी रुसवा,, अंगी शहारली

माझ्या ग प्रिये,, ऐक ना जरा
तुझ प्रेम हे,, वेड लावी जीवा

-- स्नेहल

बालमजूर...!


बाल मजूर म्हणून सारे म्हणती
पण व्यथा कुणी न जाणून घेती
कीव तर सारेच आमची करती
पण दोन घास कुणी न भरवती

बालपण देगा देवा पण
कष्टांना काही तर अंत हवा
आम्ही उचलतो भारी ओझे
दुसरे त्यांच्याच दप्तरा खाली वाकता

नशिबी आल्या हालअपेष्टा
दैवाने केली अशी हि चेष्टा
बालपणीचा काळ सुखाचा
बोलून केली आमची थट्टा

शाळेत अन शाळेबाहेर हि
दिसती आम्ही सारेच मजूर
आम्हा दोन घासाकरिता कष्ट
काहींच बालपण अभ्यासातच नष्ट

-- स्नेहल

ते प्रेम...!!


पाकळी त्या फुलाची
आजहि पुस्तकी खुलते
सुगंध त्या प्रीतीचा
आजही जीवनी दरवळे

आठवती ते दिन अन
स्वप्नांनी सजलेल्या राती
व्यतीत केलेले हरक्षण
होते जे तुझ्यासोबती

सांजवेळी माझ ते
रोज तुला भेटण
तुझ्या मनात माझ
ते अस्तित्व शोधण

आनंदाचे दिन सरले
तुजवीण न काही उरले
आज तुझ दिसन प्रिये
फक्त स्वप्नीच उरले

लक्ष येतात, लक्ष जातात
तूझी सर ना येई कोणा
आजही ह्या मनी, प्रिये
फक्त न फक्त तुझ्याच खुणा.........!!

--स्नेहल

अपने भी फंडे होते है..!!


इनका पैसा हो स्विस में या ग्रीस में
हमारे तो खाने के वांदे होते है
इनके ऐसे फंडे होते है

नेकी सिखाते है भाषण भी देते है
पर काम इनके ही गंदे होते है
इनके ऐसे फंडे होते है

बंद बुलाये ये,, हड़ताल करते है ये
पर पड़ते सिर्फ हमें ही डंडे है
इनके ऐसे फंडे होते है

सिर्फ बाते रोजगार की करते है
पर हमें देने को नहीं धंदे है
इनके ऐसे फंडे होते है

खोल के रखो आँखे दोस्तों
बिछाए इनके कई फंदे होते है
इनके ऐसे फंडे होते है

ये जाके फिर दुसरे आते है
कोई ना इनमे इंसाफ के बन्दे होते है
इनके ऐसे फंडे होते है

ये ना डरते है, क्यूंकि हम सोचते है
वोह कुछ भी करे
अपने हात कहा गंदे होते है

अगले चुनाव फिर ये मिलेंगे
उतार दो जो इनके झंडे है
यारो, अपने भी तो कुछ फंडे होते है..?

-- स्नेहल

विरह...!!!


मंद झुळूक सवे येतो
रातराणी चा सुगंध
वेड्या मनाला मग छळतो
तुझ्या आठवांचा छंद

छंद हा दुष्ट
करे पार वेडापिसा
मनाला हि प्रश्न
क्षण जाईल तरी कसा..?

तुझ्याविना क्षणाला
विरहाची किनार
गुलाबी रातीला
कशी यावी तरी बहार..?

रातीने केला एक प्रश्न उभा
उत्तर शोधण्यात उगवली प्रभा
प्रश्न हि असा येई अवकाळी
अन पुसे, हरवली रे कुठे तुझी सोनकळी..?

--स्नेहल

गणतंत्र ,, प्रजासत्ताक,, गणराज्य,, रिपब्लिक डे कि २६ जानेवारी...??


देशाचे बिघडले ताळतंत्र
कामी येई ना काही मंत्र
अन थाटात मनवतील आता
पुन्हा देशाचा हा गणतंत्र

खाण्यास नसे दोन घास
जल हि ना मिळे पिण्यास
करून प्रजेकडे डोळेझाक
मनवतील असा हा प्रजासत्ताक

देश अखंड अन अविभाज्य
खूप प्रांत आणि खूप राज्य
दु:खाचे जरी असेल अधिराज्य
मनवायचा मात्र गणराज्य

सुट्टीच्या दिनाची तर मजाच न्यारी
नुसत झेंडे फडकावून तर यायचे घरी
देश प्रेम दाखवण्याची हि मोठी मजबुरी
मनवतील असा हा २६ जानेवारी

सत्तेची नशा अन स्विस चा पैसा
हेच राजकारणच ब्रीदवाक्य आहे
भ्रष्टाचार बोकाळला सगळी कडे
मनवायचा आहे मात्र रिपब्लिक डे

झेंडा फडकवायचा तेवढा आवेश
देशभक्तीचा नसे कुठे हि लवलेश
ह्या दिनाचे नाव असतील अनेक
पण ह्यादिवशी तरी जगा होवून एक..!

--- स्नेहल

मी अन मन..!!


मी असेन थंड
पण मन आहे तप्त
मी असेन निरस
पण मनात इच्छा सुप्त

मी असेन शांत
पण मनात आहे आवेग
मी असेन बंड
पण मनात आहे उद्वेग

मी असेन कठोर
पण मन आहे कोमल
मी असेन दुष्ट
पण मन आहे निर्मळ

मी असेन उद्विग्न
पण मन आहे स्पष्ट
मी असेन वाईट
पण मन आहे मस्त

मी असेन मर्त्य
पण मन आहे जिवंत
मी नसेन हयात
पण मन असेल तुम्हासवे सदैव..!

-- स्नेहल

आयुष्याची गिरणी..!!!


आज भोंग्यांची भणभण झाली बंद
अन देहाची सुरु झाली किणकिण
काल प्रकाशिले होते ज्यांनी सारयांना
आज त्या घरात जळे मेणबत्ती मिणमिण

आज हि ते भोंगे दिसती सारे
जुने दिवस पुन्हा आठवती
घरदार खिसे अन मन सारे रिते
साथ द्यायला भोंगेच उरती तिथे

साथ सोडून गेले सारे पण
बिच्चारे भोंगे मात्र राहिले टिकून
आम्ही तरी घातला हैदोस रडून
त्यांना तर कुणी वाली हि नसेन

गिरणी कामगार म्हणून जगलो सारे
जीवनाचे उरले तेच सार
काल होतो राजे जिथले, आज
त्याच गिरणीखाली पिसून गेलो पार

-- स्नेहल

Sunday, January 23, 2011

अंबामाई...!!


अंबा माई च्या कृपेने ,, होई साऱ्यांचा उद्धार
आई तुझ्याच ह्या भक्तीने,, होती दुख सारे ते पार

संसारी होतो रममाण,, झाले होते तुझ विस्मरण
चूकभूल माफ कर आता ,, आलो तुला मी शरण

संकटांचा होई फुत्कार,, आई दाखव तू चमत्कार
हिम्मत देऊन मजसी,, तू दूर कर अंध:कार

आई अखंड दे वरदान,, तुला भेटाया लांबून
आले हे लेकरू तुझ्याच,, पायी घालाया लोटांगण

अंबा माई च्या कपाळी,, कुंकू शोभून दिसतो लाल
हिरवा चुडा,, पानाचा विडा अन सोन्याच दागिन

रूप तुझे भासे अति छान,, विसरलो मी देह भान
आई भक्तीत तुझ्याच लीन,, मी होऊन झालो बेभान

आई आई ,, घे मला जवळ
जानी ना कोणी ,, ह्या जीवाची तळमळ

तुझ्या भेटीची होती ओढ,, ह्या जीवाला घे कवेत
सोडून सारे आई,, मी आलो तुझ्याच कुशीत

--स्नेहल

Wednesday, January 19, 2011

साकड़..!!


देवाच्या पाया वर घालू चला साकड
भोन्दुंच्या नावाने जमली सारी माकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड

हा बळी,, तो बळी,, नराचा बळी
प्राण झाले स्वस्त ह्या भोंदून मूळी-2
अंगारा,, शेंदूर,, फासला दगडावरी
देव झाला दुर्मिळ ह्या दगडामूळी -2

अश्या प्रथांच्या पाठीत घालू चला लाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड

वर्गणी,, देणगी,, मागती सारी
देवाच्या उरावर जमली खूळी -2
अडकला देव हि देवळा मधी
लुटारू च्या ताब्यात त्याची चावी-2

अश्या तुरुंगाला चला करू सारे वाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड

हा दादा,, हा बाबा,, अन हा बापू
भोंदू ची जमली जमात खूप -2
स्वताला म्हणवती हे देवाची रूप
आशीर्वादासाठी मोजती पैसे खूप -2

कथा सर्व आहे रे ह्या सारया भाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड

भोन्दुंच्या नावाने जमली सारी माकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड..
देवाची ची साथ रे, तर कोण करेल वाकड
देवाच्या पाया वर घालू चला साकड..

-- स्नेहल

राजा अन राणी..!!


संसाराच्या खेळा मधली
प्यादी उडाली दूर आकाशी
राजा राणी सवे उरली आता
अबोल शब्द अन अबोल प्रीती

राजा होता अति हुशार
संसाराचा ओढी भार
राणी होती जोडीला
भाग्याला तिचा हि उभार

सांजवेळी, राजा अन राणी
आठवती ती प्रेमकहाणी
प्रेमाचे ते क्षण सारे अन
लाडाची ती गोड गार्हाणी

आयुष्याच्या संध्याकाळी
करती दोन्ही हाच विचार
श्वास तुटता ह्या देहाचा
सरणावर हि देऊ आधार

-- स्नेहल

Tuesday, January 18, 2011

ये कैसा मंजर


मंजर है ये कैसा मंजर..?
हरतरफ है अश्को का समंदर
मंजर है ये कैसा मंजर..?

तुमने जो दिलसे वादा किया था
तुमसे ही दिल को सुकून वो मिला था
राहें कही खो गयी है अब वोह,
मिलते थे हम जहाँ पे अक्सर..
मंजर है ये कैसा मंजर..?
मंजर है ये कैसा मंजर..?

दिन वोह बड़े हसीं लगते थे
जब हम तुम यहाँ मिलते थे
प्रेम की गलियां खोयी हुई है,
खो गया है मेरा हमसफर..
मंजर है ये कैसा मंजर..?
मंजर है ये कैसा मंजर..?

बादल ऐसे गहराएं है
काले साये लहरायें है
तन्हाई में अब रुसवा होकर,
अश्क खड़े है आकर दरपर..
मंजर है या कैसा मंजर..?
मंजर है या कैसा मंजर..?

तेरे बिना ना कोई है मंजिल
आके लग जा गले से ऐ दिल
ढूंढ़ रही है तुझको नजरें
फैला दे खुशियाँ फिर आकर
मंजर है ये कैसा मंजर..?
मंजर है ये कैसा मंजर..?

हरतरफ है अश्को का समंदर
मंजर है ये कैसा मंजर..?

-- स्नेहल

फितूर..!




श्वास कोंडला तुझ्या विना
थांबले हृदयाचे हि स्पंदन
प्राण च रुसला, आता
देवा तूच दे आलिंगन..

प्रेमात बुडुनी आकंठ
आज तूची घोटला कंठ
अश्रू नि तरी करावा
आता किती तो आकांत..

ठाण मांडले मृत्यूने
कवेत घेण्या तो अति आतुर
ज्याला आपल मानले
तो मात्र आज झाला फितूर..

--स्नेहल

Monday, January 17, 2011

जीवनातली मिठास..!!


नात्यात रस असावा
त्याला प्रेमाचा स्वाद असावा
असा स्वादिष्ट ऋणानुबंध
आपण हि मनी जपावा...

एकमेकांनी मिळून हा
स्वाद चाखत राहावा
आयुष्यातला हा आस्वाद
असाच कायम रहावा...

अळणी क्षण आले काही
करू त्यावर मैत्रीचा शिडकावा
जीवनाच्या पानावर वाढलेला
भावनेचा पक्वान्न असावा...

--स्नेहल

तुझा छंद..!!!


वातावरण कुंद कुंद
बेहोष मी का बेधुंद
मुग्ध अशा निसर्गामध्ये
जडला तव आठवांचा छंद

झुळूक येई मंद मंद
लेऊन तुझ्या प्रीतीचा गंध
मन फिरते तुझ्या भवती
जशी भ्रमराची फुलावर रुंज

प्रेमाची असावी कक्षा आपली
क्षितिजा परी रुंद रुंद
त्या कक्षे खाली आपण असावे
सुखा मध्ये कायम मग्न...!!

-- स्नेहल

Sunday, January 16, 2011

तुज विन..?




तुज विन जगावे कसे
तुझ विन राहावे कसे
श्वास च हरवला जिथे
स्पंदन घेऊ तरी कसे

शब्द हे वाटे थिटे
भाव हि असे रिते
वर्णनावे तरी कसे
जीवनी महत्व तुझे

आधार तुझा जीवनाला
भाव तुझा ह्या शब्दाला
देशील का रे परत
प्राण ह्या शरीराला...

-- स्नेहल

तुज विन..?

तुज विन जगावे कसे
तुझ विन राहावे कसे
श्वास च हरवला जिथे
स्पंदन घेऊ तरी कसे

...शब्द हे वाटे थिटे
भाव हि असे रिते
वर्णनावे तरी कसे
जीवनी महत्व तुझे

आधार तुझा जीवनाला
भाव तुझा ह्या शब्दाला
देशील का रे परत
प्राण ह्या शरीराला...

-- स्नेहल

स्वामी तेरे बिन..!!


अँधेरे को तुने उजाला था
राह भी तुने दिखाई थी

हिंदुत्व की कडवी सच्चाई

तुने ही तो सिखाई थी


धर्म तेरा जीवन था

कर्म तेरा पावन था

तेरे विचारो से हुआ

हिंदुत्व बड़ा मनभावन था


आज फिर तेरी जरुरत है

हिंदुत्व पे आया आतंक का साया है

देख स्वामी तेरी राह छोड़ के

आज हमने ये क्या पाया है...??


-- स्नेहल

Tuesday, January 11, 2011

रिते मन...!!


मनात होत खूप काही
मिळाले मात्र काही नाही
एक दिवस होत सगळ
आज हाती हि काही नाही

वाटता वाटता प्रेम वाटल
थोड परत द्याव हे कुणा वाटल नाही
वाटल घडेल खूप काही
पण अस होईल कधी वाटल नाही

देता देता देत गेलो
घेता घेता सगळ राहिलं
नाती सावरता सावरता
आज सगळच निसटून गेलं..

-- स्नेहल

Monday, January 10, 2011

सूड..!!


षंढ षंढ समजुनी,, अन्याय अति शोषूनी
थंड थंड मन प्रचंड,, उठू दे आता पेटुनी


कुंड कुंड गेले भरुनी,, आप्ताच्या त्या रक्तानी

मुंड मुंड भूतांचे,, दिसती धरती अस्मानी


बंड बंड आता करुनी,, धोका तो पत्करुनी

भांड भांड भांडूनी,, शांतता आणा कुठूनी

चंड चंड चंडीकेला,, चित्ती मनी स्मरूनी
खंड खंड खांडोळी,, करा दुष्मनाची अस्त्रांनी

दंड दंड थोपटुनी,, निघा घरटी सोडूनी
खिंड खिंड लढवुनी,, परता सूड घेवूनी


-- स्नेहल

Saturday, January 8, 2011

हास्य माझ्या फुलराणीसाठी ..!!


रुक्ष अश्या ह्या कातरवेळी
उदासीनता हि अति जीवघेणी
अश्रुना रोकण्याची करी हिम्मत
डोळे अति ती केविलवाणी

कोणी अशी हि थट्टा केली
उदास झाली माझी फुलराणी
हास्य तिचे जे अति निर्मळ
आज कसे गेले कुठे मावळूनी

प्रेमात तिच्या धुंद सारे
गाती सारे तिचीच गाणी
ह्या राणी वर जीव उधळला
राज्य हीच च असते ह्या मनी

आज हरवले सुख थोडेसे
दु:ख डोकावले अचानक कुठूनी
हास्य माझे पाठवत आहे
घे त्याला आपले मानुनी

रुसवा सोड ग राणी आता
सुखद हे हास्य बघुनी
पूस ते डोळे अन
दे बघू आता गोड हसुनी

-- स्नेहल 

प्यार इश्क और मुहोब्बत..!!


फूल के बदले में दिल देने का फसाना हुआ अब पुराना
जेब में नोट और दिल में खोट.., ऐसा है आजका जमाना

प्यार की कदर करने की आदत हो गयी अब पुरानी
न देखे दिल कोई सिर्फ बदन और स्पर्श की बाते है जुबानी

प्यार करो तो ऐसा करो की सारा चमन झुमने लगे
फिर दर्द का भी ना एहसास हो जब काटा भी कोई चुभने लगे

प्यार इश्क मुहोब्बत ये तो शब्द है दिल को लुभाने के
तरीके है ये,, रिश्ते अपनों से अपनों को जोड़ने के..!!

-- स्नेहल

एकटे ध्येय

स्वप्नाचे ध्येय गाठता गाठता
सत्याला मात्र विसरत गेलो
यशाच्या शिखरावर आहे उभा एकटा
पायथ्याशी सगळ्यांना सोडून आलो

हव्यास पायी ना कोणते मी नाते जपले
प्रेमाची लोक तर दूर कुठच्या कुठे सोडले
आज सर्व असून काही कमी वाटत
खिसे गच्च असून हृदयाला मात्र भोक वाटत

ध्येय आणि नात...!!

सगळ काही करायचं सगळ काही मिळवायचं
आयुष्याच्या ध्येयपूर्तीसाठी आपल्यांना मात्र विसरायचं

नाही मानायची का नाती गोती, घेतला जन्म ज्यांच्यापोटी
दोन क्षण हि नाहीत का त्यांचा भेटीच्या काकूळतीसाठी
...
सारे सुख लोळण घेत असेल पायाशी
पण बायको आणि बाळ घरी बसले प्रेमाचे उपाशी

भरमसाठ पैसा पण प्रेमाची झोळी असेल फाटकी
जग सारे आहे मुठीत पण रिकामी प्रेमाची घरटी

दोन क्षण विसाव्याला आईची कुशी समोर असून
पण दोन पैश्यासमोर तीची किंमत जरा कमीच जाते वाटून

सर्व सुख मिळतील पण आई बाप परत कुठे मिळतील
आणि सुख हि तर सारी त्यांच्याच आशीर्वादाने मिळतील

उद्दिष्ट पूर्ण करण्यात असतो खरचं असतो खूप मनस्ताप
पण अश्या वेळी हिम्मत देती फक्त न फक्त आई आणि बाप..!!!
.....................फक्त न फक्त आई आणि बाप..!!

.........>>मन<<.......


मन चंचल,, मन शीतल
मन निर्मल,, मन कोमल

मन गहरी,, मन लहरी
मन सुंदर,, मन जहरी

मन क्रोध,, मन द्वेष
मन राग,, मन रोष

मन अथांग,, मन अकुंचीत
मन वादळ,, मन अंकुरित

मन संस्कार,, मन संवेदना
मन भाव,, मन वेदना

मन आदर,, मन भक्ती
मन प्रेम,, मन शक्ती

मन असे,, मन तसे
कोण सांगेल नेमके कसे..??

-- स्नेहल

Sunday, January 2, 2011

चारोळ्या..!!!


सर्वस्व घेऊन प्रिया
प्रीत मागू नको रे
प्राण हि तुझी अमानत
प्रेम मागू नको रे..!!
-- स्नेहल

बघुनी तुला सखे ग
काही सुचेना कशात
मन वेडावले असे हे
जीव गुंतला तुझ्यात..!!
-- स्नेहल

हास्य माझ्या मनीचे
तुझ्या मुखी उमलावे
अश्रू तुझ्या नयनीचे
माझ्यात सामवावे...!!
-- स्नेहल


प्रेम भाव संवेदना संस्कार
ह्याच मूर्तिमंत तू रूप आहेस
धन्य आहे मी प्रिये
कि तू माझी मैत्रीण आहेस..!!
--
स्नेहल

नाज असे मला जीच्यावारी
जमिनीवर आली ती हुस्न परी
माझ्या मनावर तिचेच राज्य
जीव जडला ह्या सुंदरी वरी...!
--स्नेहल

नया साल... पुराना रिश्ता..!!


ये साल यूँही चला जायेगा
नया साल बड़े शानसे आएगा
वादा है आपसे ये हमारा
ये दोस्ती का हसीं सफ़र यूँही चलता रहेगा ..!!

न कभी कोई काम हो बिगड़ा
न कभी हो किसीसे झगडा
ये साल आये खुशिया लेकर
हर दिन हो जश्न बड़ा तगड़ा

आपकी दोस्ती को दिल से निभाया
अपनों से ज्यादा करीब आपको पाया
अपना हर राज आपको बताया
हर दोस्त से आपको ऊपर है पाया

नए साल में ये रिश्ता ऐसे ही बना रहेगा
दूर होकर भी दिल में प्यार भरा रहेगा
ये साल क्या अगले सो साल भी गए
तो आपसे दोस्ती ये दिल निभाता रहेगा

-- स्नेहल

नववर्ष...!!!


गत वर्षाची सरली रात
नव वर्षाची झाली प्रभात
जुन्या आठवणी घेऊन सोबत
पुन्हा नव्याने करा सुरुवात

झाले गेले विसरून जावे
नव वर्षी नवे बंध जुळावे
सुखाचे झुले अंगणी झुलावे
नाते असेच वृद्धींगत व्हावे

दु:खाला नसावा कुठे सहारा
वेदनेला जीवनात थारा नसावा
नात्याची गुंफून वेली व्हावी
त्यावर प्रेमाची कळी खुलावी

संकल्प नसावा फक्त वर्षापुरता
विरून जो जाई वर्ष सरता सरता
नसावा संकल्प नुसता स्वार्थाचा
करा संकल्प मैत्री अन प्रेमाचा

गत वर्षाला पुन्हा आठवावे
नव वर्षाला नमन करावे
हर क्षण तुमचा आनंदाने जावे
हे नव वर्ष तुम्हाला सुखात जावे

--- स्नेहल

थर्टी फर्स्ट ब्राईट अन जगण्याची फाईट ...!!!


31st ची हि नाईट
दिसते एकदम ब्राईट
पण नाही दिसत कुणाला
चाललेली जगण्याची फाईट

हवी कुणाला दारू
अन कुणाला बोटी
तर कुणाला भुलवी
फक्त एक रोटी

व्हिस्की अन रम
विसरवी काहींचा गम
कुठे सुखाची झोप
करून मणभर श्रम

नववर्षाची हि संपेल रात
बाटल्या हि ओसंड्तील अमाप
काही पडतील नशेत उद्या
कुठे उष्ट्यावर हि पडतील उड्या

नको असावा असा विरोधाभास
नको घडो कधी कुणाला उपास..

-- स्नेहल