Thursday, May 5, 2011
कॉलेज कट्टा...!!
कॉलेजचे ते दिन सुखाचे ,आनंदाचे, उत्साहाचे
भविष्याचा विचार करत लेक्चर बंक करण्याचे
मैत्रिणीमध्ये आपला जोडीदार शोधण्याचे
तर कधी रात्ररात्र जागून अभ्यास करण्याचे
सरांना प्रश्न विचारून हैराण करायचे
कधी खिडकीतून तारुण्य न्याहाळायचे
कुणाच आपल्याकडे लक्ष गेलच
तर मनातून हळूच ओशाळायचे
केमेस्ट्री ल्याब मध्ये केलेला घोळ
दुसरच केमिकल मिक्स केल्याने उठलेले धुराचे लोळ
आधी सरांनी केलेला पोबारा
ल्याब चा तर झालेला पुरता धुराडा
म्याथ तर काही जमेना
ती आकडेमोड जराही उमजेना
त्या आकड्यात कधी उत्साह वाटला नाही
पास होण्यापलीकडे त्यावर जीव कधी जडला नाही
लायब्ररी सारखी मात्र दुसरी जागा नाही
अभ्यासानंतर जी झोप लागते तिला कुठे तोड नाही
अभ्यासासोबत झोप इथल्याशिवाय कुठे जमत नाही
लायब्ररी शिवाय अभ्यासामध्ये म्हणून तर मन रमत नाही
एकदा कॉलेज मधून जाताना रस्त्यात सर दिसलेले
गाडीवरून होते निवांत चाललेले
सरांना जोरदार रामराम ठोकलेला रस्त्याने
प्रतिक्रियेत तोल गेल्याने सर पडले जावून उताणे
रागवण्यापेक्षा सर स्वता:च हसले होते
गाडीमध्ये त्याचं शर्ट अजूनही फसले होते
सर काही मदत करू का जेव्हा विचारले होते
परत रामराम नको करू बाबा एव्हढेच त्यांनी विनवले होते
कॉलेज चे दिन सरून गेले पण आठवणी मात्र सोडून गेले
सारे सुख मिळते आज पण ते दिन स्वप्नवत घडून गेले
आज हि मन ते दिन शोधते,, भविष्यासोबत भूतकाळ हि आठवते
पण खर सांगू मित्रानो,, भविष्यापेक्षा मन,, भूतकाळातच जास्त रमते
--स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment