Thursday, May 5, 2011

अरे संसार संसार..!!


अरे संसार संसार
नाही घडीचा खेळ
सात जन्माचा बंध
नाही नात्यांचा घोळ

अरे संसार संसार
नाही शरीराचं मिलन
दोन जीवांचं प्रेम
अन सुखाचं नंदनवन

अरे संसार संसार
नाही अपेक्षा संपूर्ण
दोहोंची साथ असते
आत्मीयतेने परिपूर्ण

अरे संसार संसार
नाही झगडा, कटकट
स्वर्गातली गाठ
अशी सुटेना झटपट

अरे संसार संसार
नाही रहाट गाडगा
प्रेमाने करावे लागे
संकटांचा सामना

अरे संसार संसार
नाही क्षणाचा सांभाळ
जन्मोजन्मीच नात
देवाने बांधला मेळ

अरे संसार संसार
प्रेमाचे ते प्रतिक
आयुष्य सरे तरी
भासे ते आकर्षक

--स्नेहल

No comments:

Post a Comment