Monday, May 23, 2011
असाच का असावा बाप..?
कधी काळजी करू नये
कधी जवळ घेऊ नये
द्यावा फक्त डोक्याला ताप
असाच का असावा बाप..???
कधी गोड बोलूच नये
कधी लाड करूच नये
बस दिसल्यावर फक्त झाप
असाच का असावा बाप...???
मुलं म्हणजे डोक्याला ताण
नसावी कुणाच्या मनाची जाण
पैश्याने संबंधाचे करावे मोजमाप
असाच का असावा बाप...???
प्रेम इतके जीर्ण असावे
नाते इतके क्षीण असावे
कधीच नसावी प्रेमाची थाप
असाच का असावा बाप...???
मुलांना तुछ्ह समजावे
कुणाला हि न जपावे
रागाचा नेहमी दाखवावा प्रताप
असाच का असावा बाप...???
दिवस दिवस संभाषण नसावे
"स्व" मधून कधी बाहेर न यावे
नेहमी करावा स्वत्वाचा आलाप
असाच का असावा बाप...???
घरात खूप दरारा असावा
समोरचा प्रत्येक जण भ्यावा
हाक ऐकून भीतीने लागावी धाप
असाच का असावा बाप...???
प्रश्न नेहमी सोबत राहतात
पण अश्रूंची साथ सुटत नाही
बाप समोर असतो मात्र
तो "बेटा" कधी म्हणत नाही
जन्म देऊन ह्या जीवाला फुलवले
दूर सारून असे मनाला तुडवले
प्रश्न पडतो नेहमी असा
ह्याने ह्या जीवाला तरी का घडवले...???
.......ह्याने ह्या जीवाला तरी का घडवले ...???
--स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment