काय वर्णावी माझी व्यथा
कोणा सांगावी हि कथा
दोन वळणावर आहे उभा
मी द्विधा मी द्विधा
भावनांचा झालाय गुंता
काय निवडावे हीच चिंता
निर्णय घेण्याची नाही मुभा
मी द्विधा मी द्विधा
एका वळणावर प्रेम खुणावी
एका वळणावर कर्तव्य बोलवी
अस्तित्वावरच आता आलीय गदा
मी द्विधा मी द्विधा
प्रेमावर आहे अति विश्वास
जीवनाचा हि होतोय ह्रास
अपेक्षा आवड कळून सुद्धा
मी द्विधा मी द्विधा
काय करावे काही कळेना
कुठे काहीच कसे सुचेना
नेमकी कशाची आहे हि क्षुधा
मी द्विधा मी द्विधा
No comments:
Post a Comment