आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर
कुठे कुणी ना दिसे आपल
दृष्ट लागली का नात्यावर
काळाच्या तोडूनिया भिंती
आठवणी आदळती मनावर
क्षणभंगुर ती स्नेहाची प्रीती
नाही उरली आता इथवर
आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर...
एकट्या अश्या ह्या जगण्यावर
नाही भरवसा आता जन्मावर
प्रेम भावना सारे बेवारस
नाही कवडसा ह्या अंधारावर
आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर
कुठे कुणी ना दिसते आपल
दृष्ट लागली का नात्यावर....
--स्नेहल
No comments:
Post a Comment