Thursday, May 5, 2011
माझ्या मनीच गाव..!!
माझ्या मनीच्या गावी,, चला जाऊया आपण
बघून तो प्रेमभाव,, दु:ख जाऊया विसरून
माझ्या मनीच्या गावी,, एक सुंदर मंदिर
सर्व धर्मियांसाठी,, तिथे सर्वांना आदर
माझ्या मनीच्या गावी,, सारे सारे हिरवेगार
शेत खळ्यात चाले,, गाई बैलांची रेलचेल
माझ्या मनीच्या गावी,, घरे अति टुमदार
बंगळी वर खेळ खेळी,, छोटी छोटी पोर
माझ्या मनीच्या गावी,, झुळझुळ वाहे नदी
पाणी भरण्या किनारी,, जमती बाया अन पोरी
माझ्या मनीच्या गावी,, सांजवेळ हि सोनेरी
गाई बैलांची जोडी,, येऊ लागतात घरी
माझ्या मनीच्या गावी,, पाखरांची चिवचिव
नसे भीती कुणाची,, मुक्त फिरती हे जीव
माझ्या मनीच्या गावी,, माणसांचे ताटवे
फुलापरी कोमल,, नसे काही ना नखरे
माझ्या मनाच्या गावी,, पैश्याची चणचण
पण मनाची श्रीमंती,, अशी कुठेही नसेन
-- स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment