Thursday, May 5, 2011

१४ ऑगस्ट... माझा वेलेनटाइन डे....!!


वेलेनटाइन डे आहे म्हणे आज
प्रेमात रंगून जायचं म्हणे आज
गुलाबच फुल द्यायचं, चोकोलेट द्यायचं
हातात हात घालून फिरायचं असत म्हणे आज

प्रेम मी हि केल होत
हृदय माझ हि अचानक धडकल होत
पण तो दिवस १४ ऑगस्ट होता
म्हणून काय त्या प्रेमाला अर्थ नव्हता..?

चोकोलेट नव्हत, गुलाब नव्हत
जवळ फुल दिसलं ते हि जास्वंदाच होत
गुलाब दिल नाही, चोकोलेट दिल नाही
म्हणून काय माझ प्रेम झाल नाही..?

हातात हात घेऊन प्रपोज करणं पटत नव्हत
अति जवळ जाणं तर चांगल हि वाटत नव्हत
हातात हात घेतला नाही, तेव्हा जवळ हि गेलो नाही
म्हणून माझ प्रेम काही कुठे अडलं नाही..

भावनांच्या कल्लोळात हा गोंधळ होता
कवितेने तेव्हा मला हळूच इशारा केला होता
समोरासमोर बोलण तर खूपच कठीण गेलं
म्हणून शब्दांनीच प्रितीच निमंत्रण द्यायचं ठरवलं

आणि मी कविता लिहिली,, हळूच तिला दिली
तिनेही चक्क वाचली,, खुदकन गालात हसली
वेलेनटाइन नसूनही,, मन मात्र लगेच जुळली
तारीख आडवी आली नाही,, प्रीत कुठे हि अडली नाही

वेलेनटाइनबाबा खुश झाला,, तारखेशिवाय प्रसाद दिला
प्रेम तेच श्रेष्ठ ठरले,, लालूच न दाखवता ते घडले
स्पर्शाची गरज लागली नाही,, अपेक्षा कुणीच ठेवली नाही
मनात मन अस काही गुंफल,, म्हणूनच प्रेमाचं ते फुल आजही नाही सुकलं
..................प्रेमाचं ते फुल आजही नाही सुकलं

----स्नेहल

No comments:

Post a Comment