Monday, May 23, 2011

चाहूल..!


दोन जीव होते तळमळलेले
वर्षांचे स्वप्न जे बघितलेले
आता पुरे ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!

काटेरी ते अवघड वळणे
टोचून टोचून असे बोलणे
आता बंद ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!

दगडांमध्ये भेटेल पारस
मिळेल आता गोड वारस
दु:ख दूर ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!

नात्यामधला मधुर बदल हा
ज्याची होती फार प्रतीक्षा
दुडू दुडू धावत येईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!

दयावंत तो परमेश्वर जो
आला धावून दुख बघून तो
असाच सोबत राहील...!!
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!

--स्नेहल

No comments:

Post a Comment