दोन क्षण झाडल्या
प्रेमाच्या चार फैरी
देऊन दु:ख गेला
अन प्रीत झाली वैरी
उडून गेल्या क्षणात
घेतलेल्या आणाभाका
तोडून बंध गेला
दुष्ट हवेचा झोका
मनात रेखलेली
मी सुख स्वप्नाची नक्षी
त्याने पुसले सर्वकाही
अन ठेविले मलाच साक्षी
सत्य वदले मी पण
असत्याचा तो कैवारी
घेऊन मनात वैर
झाला तो हत्यारी
ते स्वप्न विरले
अन तोडले ते पाश
सात जन्माचा करवला
त्याने असा विनाश
सात जन्माचा करवला
........त्याने असा विनाश
---स्नेहल
No comments:
Post a Comment