Saturday, May 21, 2011

यातना..!


अश्रूंनी काया भिजली होती
जागच्या जागी ती हि थिजली होती
काया थिजून मन का थिजणार होत
आठवणीत रोज ते तसंच भिजणार होत

नजर तिला शेवटच न्याहाळत होती
बघताना ती हि भान विसरली होती
मनातील रूप दिसण का थांबणार होत
मूकपणे ते समोर हरक्षण दिसणार होत

मनात जागत होत्या आठवणी गर्द
विचारात घालवलेल्या त्या राती सर्द
सार काही एका क्षणात का सुटणार होत
ती जाऊन खरच का प्रेम तुटणार होत

एक मूक आवाज दिला जेव्हा
वळून बघितलं होत तिने तेव्हा
आशेचे किरण तेव्हा का चमकणार होते
प्रेम माझे पुन्हा मागे का फिरकणार होते

यातनेत ह्या स्पंदन मागे पडत होते
मनातील उत्तुंग भाव कमी होत होते
हळूहळू स्पंदन का साथ सोडणार होते
आत्म्याविण शरीर जगून तरी काय करणार होते

आत्म्याविण शरीर जगून तरी काय करणार होते...

--स्नेहल

No comments:

Post a Comment