Monday, May 16, 2011

एका शब्दाची कहाणी.....

एक शब्द पेटला होता
हातातून सुटला होता
राणीच्या मनाचा ठाव
त्याने घेतला होता

समज झाले गैर
राजा अति सैरभैर
त्याच शब्दाने तेव्हा
राजाशी केले बैर

शब्द येणे तो परत
शक्य नव्हते आता
माफीचा आता शब्द
राणीला विनवीत होता

राणीने केले माफ
राजाचे मन ते साफ
शब्दाने केला घोळ
मनात अति कल्लोळ

राजाने जाणिले तेव्हा
शब्दाचा खेळ हा दुष्ट
राणीला केले होते
एका क्षणात त्याने रुष्ट

राजाच्या डोळा पाणी
करी विनंती केविलवाणी
एकदा कवेत घे ग
माझ्या प्रेमळ राणी


एकदा कवेत घे ग
...... माझ्या प्रेमळ राणी

No comments:

Post a Comment