Thursday, May 5, 2011

तू यावे अन.....


जीवघेण्या ग्रीष्मात तू झुळूक बनून यावे

एकांताच्या रणात तू सर बनून बरसावे

दुष्ट जगाच्या चिखलात तू कमळ बनून फुलावे

मन पारंब्यावर तू एक पाखरू बनून झुलावे

कोरड्या न शुष्क मनी तू दव बनून यावे

काळजाच्या ढेकळास तू ओलावून जावे

पाषाण ह्या हृदयात तू झरा बनून यावे

मन पाषाणाला तू पाझर फोडून जावे


असह्य
ह्या उन्हात तू सावली बनून यावे

शीतल जल पसरून तू मृदगंध पसरावे

शिडकावा प्रेमाचा तू हळुवार करून जावे

ह्या जीवन बागेला तू प्रेमाने फुलवावे

--स्नेहल

No comments:

Post a Comment