Thursday, August 25, 2011
Tuesday, July 26, 2011
मी अन तू...!!
प्रेमापेक्षा मैत्री सुंदर.. मैत्री पेक्षा तू
नात अस अनमोल आपलं.. जे मनात जपतेस तू
शब्दापेक्षा भाव सुंदर.. भावनेत असतेस तू
मनातल्या हर छटेत.. हसताना दिसतेस तू
प्रत्येक क्षणी अन क्षणोक्षणी.. आठवणीत असतेस तू
क्षणा क्षणावर तुझच राज्य.. हर क्षण जगवतेस तू
कळत नकळत कळले नाही.. कशी जीवनात आलीस तू
नजरेतून उतरून कळले नाही.. कशी मनात उतरलीस तू
चूक भूल अन आशा अपेक्षा.. मनात ठेवतेस तू
क्षमा करून सारया चुकींवर.. पुन्हा सोबत असतेस तू
ना भासे साथ कुणाची जेव्हा.. समोर असतेस तू
मैत्री असावी अशीच अखंडित.. त्यात असावे फक्त मी अन तू
--स्नेहल
Monday, July 25, 2011
माझी नवग्रह शांती..!!
माझा जन्म नेमक्या कोणत्या मुहूर्तावर झाला आणि माझ्या जन्माच्या वेळी ग्रहांची दशा आणि दिशा इतकी का वाईट होती ह्याचा जाब मी एकदा त्या ग्रहांनाच विचारणार आहे.. वेळी अवेळी, नको त्या वेळी मी कुठल्या संकटात सापडेल किंवा कोणाला संकटात टाकेल हे कदाचित त्या ग्रहांना हि माहित नसते.. किंबहुना त्या ग्रहांनाच माझ्यामुळे साडेसाती लागत असावी असा कधी कधी माझ्या मनात विचार येतो.. आपल्या राशीत हा का येऊन बसलाय म्हणून ते हि चिंतेत असावेत आणि कदाचित ते त्यांच्या राशीतून मी जावे म्हणून माझी हि शांती करायचा विचार करत असावेत..
काही म्हणजे काही माझ्याबाबतीत व्यवस्थित घडत नाही.. पाणी तुंबलेल्या रस्त्यावर मी कपडे खराब होऊ नये म्हणून दुसरया गाड्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात जोरात गाडी घेऊन जातो आणि स्वताच्याच गाडीच पाणी स्वताच्या अंगावर उडवून होणार नसेल त्यापेक्षा जास्त खराब कपडे घेऊन घरी येतो.. एकदा घरी आल्यावर जे अकलेचे वाभाडे निघतात ते वेगळे.. एकदा सिग्नलवर पोलिसाने दुसरया कुणाला तरी पकडले, तिकडे पाहत पाहत मी दुसरया पोलिसाला जावून धडकलो आणि उगीचच्या उगीच शंभर रुपये देऊन बदल्यात दोन शिव्या घेऊन आलो.. गाडीवर जाता जाता माझ्यामागे असे कुत्रे लागतात कि मी ह्याचं काय घोड मारलंय ह्याचा मला प्रश्न पडतो.. बाकी कुणाच्या मागे लागत नाहीत पण माझ्याशी ते कुठल्या जन्माचं वैर काढतात ते काही मला कळत नाही..
दिवाळी मध्ये रस्त्यावरून जायची मला जाम भीती वाटते आणि सुतळी बॉम्ब नावाचा प्रकार तर माझ्यावर डाव ठेवूनच असतो.. मी जेव्हा त्याच्याकडे बघत असतो तेव्हा तो कधीच फुटत नाही.. पण त्याच्या जवळून जाताना तो इतक्या जोरात फुटतो कि माझ हृदय उडून खाली यायला बघत.. अहो, मी स्वतः त्याची वात पेटवतो तरी तो कधी फुटत नाही.. पण का फुटला नाही हे बघायला जवळ जातो तर तेव्हा मात्र तो नेमका फुटतो..
घरी कधीतरी रहस्यमय सिनेमा बघण्याची मला हौस येते.. पूर्ण सिनेमा बघतो आणि शेवटी एखादा श्वास रोखून धरणारा सीन सुरु असतो तितक्यात नेमके लाईट जातात आणि माझा श्वास रोखलेलाच राहतो.. बाहेर जाऊन सिनेमा बघायचं ठरवतो तर माझा नंबर येतो तेव्हाच बरोबर तिकीट संपतात.. तिकीट तर मिळत नाही पण पार्किंगवाल्याला पाच रुपये दिल्यामुळे त्याचा तेव्हढा चहा मोकळा होतो.. पावसाळ्यात हि रेनकोट घेऊन बाहेर पडल तेव्हा चुकून सुद्धा पाऊस येत नाही आणि कधी कधी कडक उन्हात तो धो धो कोसळून माझी तारांबळ उडवतो..
शाळा कॉलेजच्या परीक्षा म्हणजे तर जीवावरच संकटच असायचं.. सगळा अभ्यास करून जेव्हा मी पेपर द्यायला निघायचो तेव्हा खरच त्याच विषयाचा पेपर आहे ना ह्याची मला शंका यायची.. सगळा अभ्यास झाल्यावर घरून निघताना मी वेळापत्रक पुन्हा एकदा बघून घ्यायचो.. एक तर रात्री स्वप्नात हि मी न चुकता रोजचा पेपर द्यायचो कारण पास होण्याची खात्री मला फक्त स्वप्नातच वाटायची.. त्यात एकाच दिवशी आणि रात्री दोन दोन पेपर दिल्यावर दुसरया दिवशी नेमका कोणता पेपर आहे ह्यात मी नेहमी गोंधळून जायचो.. पण स्वप्नात हि मी पेपरला कधी वेळेवर पोहोचायचो नाही.. स्वप्नात एकतर माझी सायकल पंक्चर व्हायची नाहीतर घरातून निघायला उशीर व्ह्यायचा.. ह्यामुळेच मी दचकून उठायचो आणि अभ्यासाला लागायचो.. मात्र स्वप्नात मी रिझल्ट घ्यायला अगदी वेळेवर पोहोचायचो पण वेळेवर पोहोचून हि तो रिझल्ट हातात आलेला आणि पास झालेला मला कधीच दिसायचं नाही..
कुणाच्या लग्नाचं आमंत्रण असेल तर त्या वऱ्हाडा पेक्षा मला जास्त भीती वाटते कि ह्यांच्या लग्नाला कुणी येतील कि नाही.. हनिमूनला ते नवे नवरा बायको जातात आणि इथे मला त्या ठिकाणच्या हवामानाची काळजी वाटते.. ते तिकडे मजा करतात आणि टीवी वर मी त्या ठिकाणच्या हवामानाच्या बातम्या बघत असतो.. काही कारण नसताना दुसऱ्याचा विचार करायचा आणि स्वत: संकटात सापडायचे किंवा अजाणतेपणी दुसऱ्यावर संकट आणून टाकायचे हा माझा नित्यक्रम झालाय..
एकदा एका लग्नात गेलो होतो.. नवरदेवाच्या मिरवणुकी सोबत जाता जाता रस्त्यावर छोटा दगड दिसला.. सवयीप्रमाणे त्याला पायाने जोरात उडवला तसा तो नवरदेवाच्या घोड्याला जोरात जाऊन लागला.. तो घोडा उधळला आणि त्या नवरदेवाला घेऊन जवळच्या झाडामध्ये जाऊन घुसला.. सगळे त्याच्या मागे पळाले आणि नवरदेवाला कसे बसे खाली उतरवले.. नवरदेव खाली आणि त्याचा फेटा झाडावर लटकत होता.. त्याच्या मनात त्या घोड्याची अशी भीती बसली कि तो घोड्यावर बसायलाच तयार होईना.. शेवटी कुणाची तरी गाडी बोलावली आणि त्याला मंडपात पाठवलं.. नंतर झाडीत माझ लक्ष गेल तर घोडा हि माझ्याकडे रागाने बघत असल्याच मला जाणवलं.. उगीच वाद नको म्हणून मी हळूच मान फिरवून घेतली..
अश्या असंख्य गोष्टी आहेत... कधी कधी मला प्रश्न पडतो नेमक मला घडवताना देव झोपला होता कि मला बनलेला बघून त्याने डोळे लावून घेतले होते.. पण दोघांपैकी एक तर नक्की झाल असणार हे मात्र नक्की..
जी गोष्ट आताची तीच लहानपणाची .. पण तेव्हा माझे ग्रह दुसऱ्याना धोकेदायक ठरायचे आणि सगळे माझ्यापासून दोन हात दूरच राहायचे.. माझ्या मम्मीला माझी खूप काळजी असायची.. लहानपणी ह्या अश्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ती माऊली मला कुठल्या कुठल्या ब्राह्मणाकडे आणि ज्योतिष्याकडे घेऊन जात असे.. आता ग्रहांच्या राशीला ग्रहण म्हणून मीच लागलेला असताना, हा ब्राह्मण माझ काय भल करणार असा विचार मला नेहमी यायचा, तरी सुद्धा फक्त मम्मीच्या आग्रहाखातर मी त्यांच्याकडे जात असे..
एकदा मम्मीने मला गल्लीतल्या एका ब्राह्मणाकडे नेल होत.. मम्मीने माझ्या व्यथा त्याच्यासमोर मांडल्या.. एखाद्या कथेसारख्या त्याने रस घेऊन आणि दात विचकून त्या ऐकल्या.. माझ्या समस्या त्याला विनोद वाटत होत्या... काही काही वेळा तर तो इतका हसत होता कि मला आधी त्याची कुंडली बघून त्याच्या ग्रहांची दिशा बदलून टाकावी वाटत होती.. आमच्या गप्पा ऐकता ऐकता तो बाजूच्या पेटीत ठेवलेले काजू खात होता.. फुकटात मिळालेले असतील नाहीतर त्याने कधी काजू खाल्ला असेल अस मला कुणी छाती ठोकून सांगितलं असत तरी माझा विश्वास बसला नसता.. आणि त्याच तोंड बघून हि काजू खाण्यासारखी त्याची परिस्थिती असेल अस हि वाटत नव्हत.. मी मुद्दाम मधेच त्याला प्रश्न केला.. आजोबा, काय शेंगदाणे खाताय का..? हातात काजू असताना मी असा प्रश्न विचारल्यावर म्हाताऱ्याने माझ्याकडे इतक्या खुनशी नजरेने माझ्याकडे बघितलं कि मला वाटल हा आता माझा काटा काढण्यासाठी लगेच गाडी पकडून वर जाईल आणि माझ्या ग्रहांना माझ्या राशीतून काढून अस्त्यावस्त करून टाकेल.. तितक्यात मम्मी ओरडली, गप्प बस, हां तर गुरुजी, ह्याच काहीतरी करा हो.. आता हे गुरुजी माझ्या राशीतल्या ग्रहांना काय शिकवणार होते ते मी कान देऊन ऐकू लागलो.. थोडा वेळ पंचांगसारख कसल तरी पुस्तक उघडून बोटावर काहीतरी बेरीज वजाबाकी करत होते.. माझ्या मनात विचार आला, हा गुरुजी काही कधी शाळेत गेलेला दिसत नाही.. इनमिन नऊ ग्रहामध्ये काय इतकी बेरीज आणि वजाबाकी करायची..? मी म्हाताऱ्याला म्हंटल, गुरुजी घरून calculator घेऊन येऊ..?? तसा म्हातारा अजून संतापला पण मम्मीकडे बघत हसून म्हणाला, ह्याला कस सांभाळता हो तुम्ही..? ह्याचे ग्रह हि वैतागलेत ह्याला..?? मम्मी घाबरली आणि तिने विचारलं, म्हणजे..? म्हातारा म्हणाला, एक मिनिट, अस म्हणून पुन्हा बेरीज वजाबाकीच्या खेळात रंगला.. मी एकटक त्याच्याकडे बघत होतो आणि त्याने एकदम दचकून वर बघितलं.. मला वाटल ह्याला वर पाल दिसली असेल म्हणून मी घाबरून पटकन उभा राहिलो... आणि माझी उभ राहण्याची गती बघून म्हातारा स्वत: दचकला.. आणि काय झाल रे..? म्हणून माझ्यावर खेकसला.. म्हंटल, तुम्ही एकदम वर बघितलं, मला वाटल पाल आली.. तर म्हातारा म्हणाला, नाही रे मी ग्रहांची दिशा बघत होतो... म्हंटल, इथे बसून..?? इथून तर मला फक्त तुमच्या घराची दशा दिसतेय आणि तुमच्या राशीला माहित नाही पण घराला तर सगळे जाळेच जाळे लागले आहेत.. पण हे सगळ मी फक्त मनातल्या मनात बोललो... मम्मी म्हणाली, खाली बस.. गुरुजींनी सांगितलं ना, वर काही नाहीये.. आता माझा कधी शाळेतल्या गुरुजीवर विश्वास बसला नाही तर नऊ ग्रहाच्या बेरजेत अर्धा तास अडकलेल्या ह्या गुरुजीवर माझा काय विश्वास बसणार.. पण मम्मीवर विश्वास ठेऊन मी पुन्हा खाली बसलो.. म्हातारा परत माझ्या राशीच्या ग्रहामागे हात धुवून लागला.. माझ्या ग्रहांना आज हा चांगलाच ग्रहण लावणार हे आता मी ओळखून चुकलो होतो.. थोड्या वेळाने, म्हातारा म्हणाला, ह्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करावा लागेल.. मनात म्हंटल, अरे माझे ग्रह वर आहेत तू खोल कुठे चालला..? आता ग्रह पाताळात हि असतात अस मला वाटायला लागल होत.. एकतर म्हताऱ्याला बचाबचा काजू खाताना बघून आता मला हि भूक लागली होती.. पण म्हातारा मला एक काजू घे अस म्हणत हि नव्हता.. माझ्या कुंडलीचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हातारा माझी कुंडली बाजूला ठेऊन कुठल्यातरी पुस्तकात डोक घालून बसला होता.. मम्मी म्हणाली, बघ गुरुजी किती हुशार आहेत.. मनात आल गुरुजीच शाळेतल प्रगती पुस्तक मागवाव.. कारण प्रगती पुस्तकात जितके मार्क तितकी हुशारी इतकच आपल्याला माहिती आहे.. पण मी ते हि नाही मागवलं.. मी मनातल्या मनात ग्रहांना म्हणालो, अरे बाबानो, जिथे आहात तिथेच थांबा, हा म्हातारा येतोय तुम्हाला शोधायला.. अस म्हणून गुरुर्जीच्या शिकवणीची वाट बघत बसलो... थोडा वेळ झाल्यावर लक्षात आल.. आधी गुरुजीच तोंड पुस्तकात होत आता पुस्तक गुरुर्जीच्या तोंडावर होत.. माझ्या ग्रहांना शोधता शोधता म्हातारा चक्क झोपला होता.. मम्मीला म्हंटल, मम्मी हे गेले कि काय..?? मम्मी रागावली, गप्प बस.. काहीतरी काय..! पण मम्मीला हि तेच वाटत होत.. मी हळूच उठलो आणि गुरुजी जवळ गेलो.. आणि हळूच त्याच्या कानात म्हणालो.. गुरुजी,, ओ गुरुजी..! इतक्या प्रेमाने म्हातारा काही उठला नाही.. माझ्या ग्रहांना शांत करता करता हाच शांत झाला होता.. मम्मीला म्हंटल, चल घरी, हा गुरुजी काही कामाचा नाही.. मम्मी म्हणाली, अरे अस बोलू नये.. वयस्कर आहे ते.. मनात आल वयस्कर आहेत पण सगळ्यांना सोयीस्कर वेड बनवतोय.. मम्मीला म्हंटल, चल ना घरी, मम्मी म्हणाली, अरे अस चांगल दिसत का..? थोडा वेळ थांबू आणि जाऊ, गुरुजी उठतील इतक्यात.. मी म्हंटल आणि कायमचेच उठले असतील तर..? मम्मीला हि हसू आल.. पण म्हातारा काही उठत नव्हता.. आणि काय कराव काही कळत नव्हत तितक्यात मला आठवल, माझ्या खिशात खेळण्याची एक गोटी होती.. मनात आल, शाळेत हि बघितल्यावर गुरुजी वर्गात उभ करतात, आज ह्या गोटीने ह्या गुरुजीला उभ करू.. म्हणून मी ती गोटी उचलली आणि म्हाताऱ्यावर नेम धरून मारणार तेव्हढ्यात म्हाताऱ्याने मोठी जांभई दिली.. त्या आवाजाने घाबरून ती गोटी माझ्या हातातून सुटली आणि सरळ गुरुजीच्या पेटीत जाऊन पडली.. मी कपाळाला हात मारला.. गुरुजी उठले आणि बारीक डोळे करून माझ्याकडे बघितलं.. मी पूर्ण दात दाखवून गुरुजीकडे बघत होतो.. ते बघून गुरुजी हि ओशाळले... मी विचारलं, झाली झोप..? ते ऐकून नशीब गुरुजीने हातातलं पुस्तक मारून नाही फेकल.. त्याची इच्छा झाली होती ते मात्र त्यांच्या हावभावावरून मला चांगलच कळलं.. गुरुजी मम्मीला म्हणाले, हे बघा ताई.. ह्याची नवग्रह शांती करावी लागेल.. झोप काढून गुरुजी स्वत: तर चांगले शांत झाले होते आता मला शांत करण्यामागे लागले होते.. मम्मी म्हणाली, हो मला वाटलच होत..! मम्मीकडे बघून मनात विचार आला.. मम्मी तू पण.!! मी मम्मीला म्हंटल, अग तुला वाटतच होत तर इथे कशाला आणलस.. घरच्या घरीच करून घेतली असती ना.. म्हातारा गिर्हाईक हातच जात कि काय हे बघून म्हणाला, अरे ती काय घरी करता येते का..? मी वैतागून म्हंटल, मग काय वर जाऊन करणार आहात का..? म्हातारा वैतागून पण हसत हसत म्हणाला, कित्ती ती विनोद बुद्धी आहे रे तुझ्याकडे.. माझ्या लक्षात आले कि आता ह्या गुरुजी आता जाम पेटलाय .. म्हातारा म्हणाला, अरे ती महादेवाच्या मंदिरात करावी लागते.. आता महादेव नावाचा आमच्या गल्लीत एक माणूस होता, मला वाटल त्याच्या घरी जाऊन त्याच्या देवघरापुढे पूजा करायची.. मी म्हंटल महादेव काकाच्या घरी मी नाही जाणार.. करायची असेल तर माझ्या घरीच पूजा करा.. शेवटी मम्मी रागावली.. तू गप्प बस रे.. आधीच ग्रहांची वाट लावून ठेवली आहेस.. आता निदान गप्प तरी बस..! ते ऐकून मनात विचार आला.. मी.??? डोक खाजवत खाजवत मी विचार करत होतो.. ग्रहांची वाट मी कधी लावली..? नंतर मम्मीला विचारू अस म्हणून मी गप्प बसलो.. मम्मी म्हणाली, गुरुजी तुम्ही सांगा काय तयारी करायची.? कधी पूजा करायची आणि त्यासाठी काय काय वस्तू आणाव्या लागतील.. म्हातारा तर जाम खुश झाला होता आणि ब्राह्मण असून, सापडला एकदाचा बकरा अश्या दुष्ट नजरेने माझ्याकडे बघत होता.. म्हाताऱ्याने लिस्ट करायला सुरवात केली.. स्वताच्या घरातील काय काय वस्तू संपल्या आहेत ते आठवून आठवून म्हातारा लिस्ट करत होता आणि त्या सोबत एका मागे एक पेटीतील काजू दाबत होता.. लांबलचक लिस्ट तयार झाल्यावर मम्मीला म्हणाला, हे बघा ताई, ह्या वस्तू आणाव्या लागतील.. मम्मीने विचारलं, आणि गुरुजी तुमची दक्षिणा..? गुरुजी म्हणाले.. द्या काय द्यायची ते.. मम्मी म्हणाली.. अस नाही.. नक्की सांगा.. गुरुजी म्हणाले.. बघा तुम्हाला योग्य वाटेल ते द्या.. मी मम्मीला म्हंटल.. मम्मी दहा रुपये देऊन टाकू.. तसा म्हातारा जागेवरूनच उडाला आणि म्हणाला.. दहा रुपये.?? दहा रुपयात काय येत..? मी म्हंटल, गुरुजी दहा रुपयात कित्ती गोट्या येतात माहितीये का तुम्हाला..? आता हा म्हातारा दहा रुपयांच्या गोट्यांच काय करणार हा विचार तेव्हा मला आला नाही.. मम्मी म्हणाली, गुरुजी तुम्ही ह्याच नका ऐकू, तुम्ही सांगा किती दक्षिणा होईल ते.. गुरुजीनी सांगितलेला आकडा बघून आमचे हात पाय वाकडे व्हायची वेळ आली.. गुरुजीनी दोन हजार दक्षिणा सांगितली.. ग्रह माझे आणि ते फिरवण्यासाठी ह्याला आता दोन हजार मोजावे लागणार..?? इतक्या पैश्यात तर मी स्वत: जावून ग्रहांना जागेवर लाऊन आलो असतो.. शेवटी दीड हजारावर बोली ठरली आणि पूजा करण्याचा दिवस ठरला.. माझे ग्रह शांत होण्याची वेळ आली होती पण म्हातार्याची भूक काही शांत होत नव्हती.. त्याच काजू खाण सुरूच होत.. जाता जाता मम्मीने गुरुजींचा नमस्कार केला आणि मला म्हणाली, खाली वाक आणि गुरुजींचा नमस्कार कर.. इच्छा नव्हती पण मी खाली वाकलो आणि पायाला हात लावला तेव्हढ्यात मला आशीर्वाद द्यायचा सोडून गुरुजी जोरात ओरडले.. त्या आशीर्वादाने तर मी अक्षरशः भेदरलो.. वर बघितलं तर म्हाताऱ्याने तोंडातून काहीतरी बाहेर काढलं.. मला वाटल गुरुजींनी काहीतरी जादू केली असेल.. न जाणो एखादा वक्र ग्रह तर ह्या बाबाच्या तोंडातून बाहेर नाही आला.. हे बघण्याची आता मला हि उत्सुकता होती.. गुरुजींनी मुठ उघडली तर त्यात होता एक दात आणि त्यासोबत एक गोटी...! निरखून बघितलं तर ती तीच गोटी होती जी माझ्याकडून त्या पेटीत पडली होती.. काजू सोबत म्हाताऱ्याने गोटी हि खाण्याचा प्रयत्न केला होता.. मला तर हसूच आवरेना.. पण म्हाताऱ्याला अजून उकसावण्याची माझी इच्छा झाली नाही.. पण माझ्या गोटीने माझ्यातर्फे म्हातारयाचा बदला घेतला होता.. माझ भविष्य बदलवण्याच्या नादात म्हाताऱ्याला आता स्वताचा दात बदलवावा लागणार होता.. माझ्या ग्रहांच्या वक्रदृष्टीत आता म्हाताऱ्याच तोंड वक्र झाल होत.. माझी कुंडली खरच किती भयानक आहे हे बिचारया गुरुजीला कळून चुकल होत आणि आता माझ्यासाठी नाही तर स्वताच्या स्वास्थासाठी आणि हितासाठी त्याला माझे ग्रह शांत करणे भाग होते.. आणि पूजेचा दिवस आला..
रात्रीपासूनच घरात लगबग सुरु होती.. पहाटे सगळे लवकर उठले आणि तयारी करून मंदिरात पोहोचले तेव्हा लक्षात आल कि मी तर घरीच राहिलो.. मम्मी परत आली तेव्हा मी डाराडूर झोपलो होतो.. मम्मी जोरात ओरडली, अरे मेल्या उठ..! सगळे जण मंदिरात हि पोहोचले.. गुरुजी पण येतील इतक्यात.. शांतीच्या दिवशी सुध्दा माझी सकाळची शिवी टाळली नाही.. तरी मम्मीला म्हंटल, मी नाही येत, तुम्ही करून घ्या पूजा.. मम्मी तर भयानक खवळली.. तो रुद्रावतार बघून नेमक शांत करण्याची गरज कुणाला आहे ह्याची मला शंका आली.. शेवटी वैतागून उठलो आणि शांत होण्यासाठी मम्मी सोबत उड्या मारत मारत मंदिरात पोहोचलो.. मंदिराचं वातावरण अगदी प्रसन्न होत.. मंदिर छोटच होत.. महादेवाची पिंड आणि समोर रेखीव नंदी होता.. त्या वातावरणात शांती होण्या आधीच मी शांत बसलो होतो.. समोर मोकळ पटांगण होत.. मंदिरासमोर आंब्याच मोठ्ठ झाड होत, ज्याला खूप कैऱ्या लागल्या होत्या.. मैदानात मुल मनसोक्त खेळत होते आणि इथे सगळे मला खेळायला न सोडता शांत करण्यामागे लागले होते.. गुरुजींनी मला समोर बसायला सांगितलं आणि माझ्यावर जोरजोरात मंत्रोपचार सुरु केला..तो कर्कश्श आवाज ऐकून मंदिराच्या दारातून महादेवच तर बाहेर निघून नाही गेले हे मी उंचावून बघितलं.. पण नशीब महादेव तिथेच होते आणि ह्या गुरुजीचा प्रताप बघत होते.. स्वतावर बेतलेल्या अनुभवावरून गुरुजी मन लावून मंत्र म्हणत होते आणि कस हि करून माझे ग्रह शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.. मला वाटल होत पाच मिनिटात पूजा संपेल.. नंतर कळलं कि खरी पूजा तर पाच मिनिटानंतर सुरु झाली होती.. माझ सगळ लक्ष मैदानात खेळणाऱ्या मुलांवर आणि आंब्याच्या झाडावरच्या कैर्यां वर होत.. गुरुजी मला त्या होमात काय काय टाकायला सांगत होते आणि मी हातात येईल ते भसाभसा ओतून कधी एकदा हे सगळ संपेल ह्याची वाट बघत होतो.. नंतर गुरुजींनी मला होमात थोड तूप त्याला सांगितलं.. माझ लक्ष खेळणाऱ्या मुलांकडे होत.. मी चुकून तुपाच्या वाटी ऐवजी रॉकेलचा ग्लास उचलला आणि भसकन होमात ओतला.. असा भडका झाला कि गुरुजी धोतर सांभाळत पळत सुटले आणि थेट मंदिराच्या आवाराबाहेर जाऊन थांबले.. मी पण घाबरलो.. मग पुन्हा तिथेही माझ्या अकलेचे वाभाडे काढल्यावर पूजा सुरु झाली.. नंतर गुरुजींनी माझ्या हातात लांब पळी सारखा चमचा दिला आणि म्हणाले ह्याने होमात तूप टाक.. मी ते सांगतील ते फक्त ह्यासाठीच करत होतो कि मला एकदाच तिथून सुटायचं होत.. तेव्हड्यात आंब्याच्या झाडावर काही मुल चढली.. मी त्यांची गम्मत बघत होतो.. आणि होमात तूप टाकता टाकता ती लाकडी पळी मी चुकून होमातच धरून ठेवली होती.. होमासोबत ती पण पेटली.. परत शिव्यांचा वर्षाव झाल्यावर मी शुद्धीवर आलो.. तीन तास होऊन गेले होते.. आता पूजा हि संपायला आली होती आणि मी पण थकलो होतो.. तुपाचे शेवटचे काही थेंब होमात टाकल्यावर म्हातारा म्हणाला ती पळी बाजूला ठेव आणि माझ्या हातात फुल ठेव.. मी चुकून ती गरम पळीच गुरुजीच्या हातात ठेवली आणि चटका बसल्याने गुरुजी जोरात ओरडले.. त्यांच्या अचानक ओरडण्याने सगळे घाबरले आणि जो तो गुरुजीच्या हातावर फुंकर घालत सुटला.. मी म्हणालो, गुरुजी हे फुल..! राहू दे तिथेच, म्हणून ते जोरात खेकसले आणि झाली पूजा, म्हणून ताडकन उठले.. मला त्या गुरुजीला चटका बसायचं काही वाईट वाटल नाही.. ह्या संकटातून सुटलो म्हणून मी उठून नाचायला लागलो आणि गुरुजीला विचारलं, गुरुजी ग्रह झाले शांत? हो झाले..ते पुन्हा ओरडले.. मी म्हणालो, मग मला कसे कळेल ग्रह शांत झाले ते.. म्हातारा आता जाम वैतागला होता.. कळेल दोन दिवसात.. म्हणून पुन्हा खेकसला.. दीड हजार घेऊन तो हात चोळत निघून गेला.. नवग्रह शांती अश्या पद्धतीने पूर्ण झाली होती आणि ती ह्याच गुरुजींनी केली ह्याची गुरुजीच्या हातावर कायमची निशाणी राहणार होती..
मी एकदाच सगळ संपल म्हणून खुशीत होतो.. माझ लक्ष मम्मी कडे गेल.. मम्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.. आपल्या पोराच सगळ काही आता चांगल होईल ह्या वेड्या आशेत ती माऊली देवाचे आभार मानत होती.. ग्रह शांत झाले होते कि नाही ते मला कळले नाही पण त्या माऊलीच मन मात्र शांत झाल होत.. मला जवळ घेऊन म्हणाली होती.. माझ पोर आता नाव काढेल.. पण ग्रहांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याच वर्षी माझ नाव शाळेतून काढावं लागल.. काही दिवसानंतर कळल कि गुरुजी हि आमची गल्ली सोडून लांब राहायला जात आहेत.. त्यामागे कारण काय होत ते कळलं नाही पण माझे ग्रहच त्याला कारणीभूत असावेत अस मला अजूनही वाटत..
आज ह्या सगळ्या गोष्टीला इतके वर्ष झालेत तरी आजही ते सगळे क्षण डोळ्यासमोर दिसतात, जुन्या आठवणी जागवतात आणि त्या भूतकाळात आजचे कठीण क्षण विसरायला लावतात.. हजारदा पूजाअर्चना केली, मंत्रोपचार केले पण आजही ग्रहांनी त्यांची स्थिती बदललेली नाही आणि माझी मायमाऊलीने त्यांना शांत करण्याची आशा अजूनही सोडलेली नाही..
--स्नेहल
माझी मुंबई वारी.. सोबत गोदावरी..!!
लोक पंढरपूरची वारी करतात पण मला परवा मुंबईची वारी घडली... पूर्ण प्रवास उपाशी पोटी, उभ्याने आणि रिंगणात घडल्यावर त्याला वारी शिवाय दुसर काही नाव द्याव अस मला वाटल नाही.. तसा तो सफर म्हणता आला असता कारण एका प्रवासात इतक suffer होण नशिबानेच येत... प्रवास खरच बिकट होता पण तुमच्यासाठी हसण मात्र फुकट आहे...
बरयाच महिन्याने किंवा एखाद वर्षानेच म्हणा, मुंबईच्या प्रवासाचा योग आला... कामाच हि निमित्त होत आणि मुंबई हि खुणावत होत.. असे सगळे योग जुळून आले आणि आमची स्वारी मुंबईच्या दिशेने प्रयाण करण्यासाठी सकाळी ८:३० वाजेशी नाशिक रेल्वे स्टेशनवर आली... तिकीट काढून platform वर आलो.. गर्दी कमी होती.. मनात आल काय मस्त वेळ निवडलीय जाण्यासाठी.. घाई गडबड न करता गाडीत मस्त जागा मिळेल... सुरवातीला एक गाडी आली. लखनऊ मुंबई गाडी होती.. बघितलं तर गाडीतले सगळेच माझ्या ओळखीचे होते (म्हणजे सगळेच आपले "भैया" होते) पण जरा वाजवीपेक्षा जास्तच होते, त्यामुळे ती गाडी सोडावी लागली.. नंतर वाराणसीहून एक गाडी आली.. तिची हि तीच कथा.. ती सुद्धा गाडी सोडली... दोन तीन गाड्या सोडल्यावर अखेर सव्वा नऊच्या गोदावरी एक्स्प्रेसनेच जायचं ठरवलं.. लगेच जागा मिळेल ह्या आशेने निवांत होतो आणि अगदी खुशीत होतो..पण पुढ्यात काय मांडलं होत ते समजण अजून बाकी होत...
आणि गोदावरी आली... गोदावरीचा अवतार बघून तर कपाळालाच हात मारला.. हात मारण्याच्या नादात दाराजवळ अजून गर्दी झाली.. गाडीत पाय ठेवायला हि जागा नव्हती... सगळ्या लोकांना माझ्याच सोबत प्रवास करण्याची इच्छा त्या दिवशी जागृत झाली होती.. गर्दीत चढण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हढ्यात एका बाईने तिच्या नवरयाचा हात समजून माझाच हात धरला आणि अहो चला ना लवकर म्हणत तिच्या नवरयाऐवजी मलाच मध्ये खेचला... बिचारा तो नवरा..!! त्याची बायको आत.. मी तिच्या हातात आणि तो दारात, अशी केविलवाणी अवस्था त्याची झाली होती.. गर्दीला रेटत रेटत मध्ये घुसलो.. जागा शोधण्यासाठी आहे त्या जागेवरच दोन चार उड्या मारल्या आणि कशीबशी जागा मिळवली.. ती पण दाराजवळ फक्त उभ राहण्यासाठी..! फक्त दोन पाय टेकता येतील एवढी जागा होती.. देवाने चार पाय दिले नाहीत ह्याबद्दल त्याचे शतशः आभार मानायला मी विसरलो नाही.. माझ्या शेजारी दारामध्ये एक जोडप येऊन बसलं.. निरखून बघितलं तर ती तीच महामाया होती जिने मला हात धरून वर चढवल होत.. मी तिला ओळखल पण मी काही ओळख दिली नाही.. त्यांच्या हावभावाकडे बघून, आणि नवऱ्याच उगीचच लाजण आणि त्या बयेच भाव खाण बघून वाटत होत कि त्याचं नुकतच लग्न झाल असाव.. गाडी निघाल्यावर तो नवरोबा आपल्या नव्या बायकोला आपण काय चीज आहोत ते दाखवण्यासाठी दरवाज्यात करामती करत होता.. त्या बघून त्याच्या बायकोला आणि काही कारण नसताना मला हि घाम फुटत होता.. त्या करामती आहेत कि कुणी त्याच्यावर भानामती केलीय ह्याचा विचार करत करत इगतपुरी आल..
इगतपुरी स्टेशन आल तशी गर्दीत अजून भर पडली.. एक महाभाग तर चार पोते घेऊन वर चढला.. एकटा असून, चला उचला रे अस ओरडल्यावर, इच्छा नसताना हि आमचे हात त्याच्या ओझ्याजवळ गेले, आणि नाईलाजास्तव आम्हाला हात लावावा लागला.. इथे ठेवा इथे ठेवा करत लक्षात आल कि तो स्वत: दूर उभा होता आणि त्याच ओझ आम्ही वाहत होतो.. एक एक करत आमच्या डोक्यावरून ते नंतर कुठल्यातरी सीटखाली गेले आणि तो हि येऊन माझ्याजवळ येऊन उभा राहिला.. माझ्या राशीला हळू हळू ग्रहण लागत होत.. तो उभा राहत नाही कि त्याच्यामागे तरातरा दोन आजीबाई चढल्या.. ह्या वयात कशाला ह्यांनी घराबाहेर पडावं आणि पडलच तर माझ्या गाडीत का चढाव असा एक समंजस विचार माझ्या मनात आला... शेवटी विचार करण्यासारखं माझ्याजवळ हि काही नव्हत आणि त्यात गोदावरीला तर माझ काहीच सोयर सुतक नव्हत.. गाडीने वेग घेतला.. आता माझ्या एका बाजूला नवीन संसाराच्या चर्चेत मग्न असलेल जोडप आणि दुसरया बाजूला सगळा संसार आवरून उगीच कुठेतरी जायचं म्हणून निघालेल्या ह्या आजीबाई... हे काय कमी होत म्हणून ह्या भाऊगर्दीत अजून एक चहावाला कुठून तरी घुसला.. धक्के मारत जाता जाता माझ्या पाठीला चहाची किटली टेकून गेला.. आणि चहा न पिता हि तो खरच किती गरम होता ह्याचा मला चांगलाच अनुभव आला.. पाठ चोळायला हि हाथ मागे जाऊ शकत नव्हता... चहावाल्यावर ओरडलो तर म्हणतो, जाऊ द्या हो साहेब, फुकटात गरम झाले.. दोन चार जणांनी दात विचकले.. त्याच्या बोलण्याचा विचार करत, तो आघात कसा बसा सहन केला आणि तेव्हढ्यात समोर लक्ष गेल तर माझ्या समोरच्या सीटवरची बाई मी काहीतरी मागेल अश्या भीतीने काहीतरी लपवून लपवून खात होती.. तस म्हंटल तर माझ्याकडे फक्त बसायला जागा नव्हती पण ती जणू मी एकदम फाटका असल्यासारखी माझ्याकडे बघत होती.. ह्या प्रवासात माझी नेमकी लायकी काय हेच आता मी विसरत चाललो होतो..
धक्के खात खात कसाऱ्याला आलो... आणि चक्क गर्दी कमी झाली म्हणजे चार माणस उतरली आणि दोन चढली.. आणि ते हि पाचवीला पुजल्यासारखी माझ्याच शेजारी येऊन उभी राहिली.. एकाने त्याच्या पाठीवर लटकवण्याची bag काही कारण नसताना माझ्या पुढ्यात लटकवली आणि माझ्या मागे उभा राहिला.. दोन दोन मिनिटाला त्याला भुकेचे दौरे पडत होते आणि मला बाजूला सरकवून bag मधून काय काय काढून खात होता.. कुठल्या वर्षाच्या दुष्काळात हा जन्मलेला असेल असा एक पूर्व नैसर्गिक आपत्तीचा विचार मनात डोकावला.. हा विचार करतच होतो कि टाळ्या वाजवायचा आवाज आला.. तश्या मी गाडीत कुणाला माझ्या कविता ऐकवल्या नव्हत्या मग उगीच टाळ्या कोण वाजवतंय हे वळून बघितलं तर एक तृतीय पंथी टाळ्या वाजवत वाजवत माझ्याच जवळ आला.. मी लक्ष नाही अस दाखवलं तर मलाच म्हणाला, ए इधर देख ना..! आता त्याच्याकडे बघण्यासारखा तो काय देखणा हि नव्हता पण आज नशिबी तोच पडला होता.. अजून काही घडायचं बाकी असेल म्हणून मला छळायला त्या दिवशी त्याची हि नियुक्ती झाली होती.. मला म्हणाला, ए पैसे दे ना..! मी सहज म्हंटल, मुझे बैठ्ने को एक सीट दे ना..! तर नालायक म्हणाला, तू मुझे पैसे दे, तुझको गोदी मे बिठाता.. आता गोदावरीच्या ह्या गोदीमध्ये बसण्यापेक्षा गोदातीरी जाऊन उडी मारण जास्त सोप्प आहे अस मला वाटू लागल.. तितक्यात तो पुन्हा म्हणाला, ए दे ना.. सुंदर दिखता ही तो क्या भाव खा रहा है..? आता सुंदर दिसण्यामुळे अशी हि आपत्ती ओढवू शकते हे मला कळू लागल होत.. त्याच आपल सुरूच, पैसे दे नही तो तेरे गाल पकडुंगा.. मनात विचार आला अरे बाबा कि बाई, "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" असे जरी म्हणत असलो तरी तुझा पंथ कोणता..?? माझा पंथ कोणता..?? माझ्या गालावर एक तृतीय पंथ्याची नजर होती हे बघून "गाल कि खाल" काढायचा माझा विचार होत होता.. इतक्यात मला हळूहळू हसण्याचा आवाज आला.. डोकावून बघितलं तर माझ्या शेजारची आजीबाई माझ्यावर आलेल्या संकटावर खुदुखुदू हसत होती.. आता त्या तृतीय पंथ्यापेक्षा मला त्या आजीबाईचा जास्त राग येत होता.. आजीचा काटा काढायचा असे मी ठरवले पण सध्या पहिली priority माझा गाल वाचवण्याची होती ... माझे अनमोल गाल त्याच्या हातात देण्याऐवजी पाच रुपये देणे मला जास्त रास्त वाटले आणि मी एकदाचा त्या तृतीय पंथ्यापासून माझा गाल वाचवला.. सुटलो एकदाचा असा विचार केला आणि तितक्यात त्या तृतीय पंथ्याचा हात माझ्याजवळ आला.. घाबरून मी दूर होणार होतो.. पण जागा होती कुठे..? पण त्याने काही नाही केल.. पाच रुपये दिल्यावर त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला, खुश राहो असा आशीर्वाद दिला... त्या आशीर्वादाने लागलीच एक विषारी विचार माझ्या मनात डोकावला आणि मी त्याला म्हंटले, मुझे तो आशीर्वाद दे दिया अब इस दादी को भी आशीर्वाद दो..! हे ऐकल्याबरोबर आजीबाईच्या तोंडच हसणच पळाल.. माझ्या संकटावर हसणारी आजी आता स्वत: संकटात होती.. तो म्हणाला, ए दादी दस रुपये दे.. आजीची स्थिती आता जणू सगळी प्रोपर्टी त्याच्या नावावर करायची असल्यासारखी झाली... उगीच म्हातारीला हृदयावर झटका बसू नये म्हणून शेवटी मीच त्याला म्हंटल, जाने दो, बाद मे दे ना आशीर्वाद.. प्र याद से देणा हे सांगायला मी विसरलो नाही... पाच रुपयात मी त्याला इतक हक्काने सांगू शकत होतो.. ते एक संकट पाच रुपयावर टळल्यावर मी जरा निवांत होतो.. आणि पुढील संकटांची वाट बघत होतो.. आणि त्या दिवशी ते वाट न बघताच माझी वाट लावायला सारख सारख येत होत आणि तरी मी सर्व संकटाना मोठ्या हिमतीने तोंड देत होतो..
काहीवेळाने सगळ शांत झाल.. तितक्यात माझ्या बुटाखाली काहीतरी असल्याच जाणवलं.. एक तर हला-डूलायला जागा नव्हती.. बुटाने दाबून दाबून बघत होतो पण काय होत काही कळत नव्हत... आधीच त्या आजीचा मघासचा मनात राग होता.. वैतागत आजीबाईला ओरडून म्हंटल.. आजी ती पिशवी काढा ना पायाखालची, अस म्हणून अजून बूट जोरात दाबला.. आजीबाई बारीक आवाजात म्हणाली ती पिशवी नाहीये रे बाबा, माझा पाय आहे.. किती दाबशील..?? लाजिरवाणे होऊन मीच कसाबसा पाय सरकवला..
तेव्हड्यात शेजारच्या जोडप्यात कसली तरी पैज लावण्यावरून वादविवाद स्पर्धा चालू झाली.. नव्या नवेल्या बायकोला हि आता आवाज फुटला होता.. नवऱ्याला म्हणत होती तुम्ही नवरा आहे म्हणून तुम्हाला सोडून देते नाहीतर लावली असती पैज.. पैज कशावर लावणार होते ते काही कळलं नाही, मी पण विचारलं नाही.. पण लागली असती तर साक्षीदार म्हणून मलाच उभ रहाव लागल असत.. नेमके ते नवरा बायको होते कि सट्टेबाज होते ते काही मला कळले नाही.. पण एक कळलं कि ह्या बाबाचं उर्वरीत आयुष्य एक सट्टाच असणार आहे.. थोडा त्याच्या जीवनावर विचार केल्यावर मी स्वताचा विचार करायला लागलो..
एक एक स्टेशन जात होत तस ह्या भयंकर प्रवासाचं काय फलित निघणार ह्याचा विचार करत होतो.. एकाला विचारलं तेव्हा कळलं कि कल्याण अजून एक तासावर आहे.. जीव मुठीत घेऊन एक तास काढावा लागणार होता आणि मजल दरमजल करत अखेर माझी गोदामाई कल्याणला पोहोचली.. स्टेशनला उतरलो.. मागे वळून गोदामाई आहे कि गेली ते हि मी बघितलं नाही... मला कल्याण पूर्वला जायचं होत.. भाऊ स्टेशनवर घ्यायला येणार होता.. त्याने सांगितलं तस पूर्वेकडून बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो.. पण सगळ इतक सहज होईल अस त्या दिवशीच्या राशी मध्ये लिहिलच नव्हत.. नशिबाने तिथे हि साथ सोडली आणि चालत चालत मी दुसरया रस्त्याला लागलो आणि तो दुसरीकडूनच स्टेशनवर आला.. पण शेवटी मोबाईलच्या कृपेने राम -भरत भेट झाली आणि हि खडतर वारी पूर्ण झाली..
--स्नेहल
आमची मुंबई..!!
मुंबई...!! अथांग सागर.. माणसांचा.. भावनांचा.. अनुभवांचा..!! सगळीकडे घाणच घाण... लोकलमध्ये गळणारा घाम... रस्त्यावर ओथंबून वाहणारी वाहतूक तर मुंग्यांना हि हेवा वाटावा अशी लोकलला "लागलेली" माणस... पोटाला लागत म्हणून घाई घाईत खाणारी लोक तर पोटासाठी धाव धाव धावणारी लोक... पैश्यात लोळणारी आणि महागड्या गाडीतून "कुडकुडत"... जाणारी लोक तर कुठे रणरणत्या उन्हात घाणीत एक घास शोधणारी पोर... लाईन लावावी लागू नये म्हणून लोकलचा पास घेणारी लोक तर सकाळी शोच्यालायासाठी लाईनीत उभी राहणारी लोक.. बसमध्ये एका जागेसाठी लोटालोटी करणारी लोक तर चाळीतल्या लहानश्या घरात कोंबून कोंबून राहणारी लोक... कुठे श्रीमंतीची प्रदर्शन करणारी मुलं तर कुठे फाटक्या झोळीतून डोकावणारी पोर... पाईप लाईन मधून थेंब थेंब पाणी पिणारी लोक तर कुठे महागड्या दारूचे ग्लासच्या ग्लास रिते करणारी लोक... कुठे थांबण्यासाठी एक क्षण वेळ नसताना धावणारी लोक तर तर त्या क्षणात रस्त्यावर दोन क्षण चप्पल काढून गणपतीचा नमस्कार करणारी लोक... अत्यंत ऐशोआरामात जगणारी लोक तर मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहणारी लोक.. कुठे पूर्ण अंग झाकत रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुली तर कुठे किळसवाण्या कपड्यात वावरणाऱ्या उचाभ्रू मुली... एक शहर त्यात असंख्य गोष्टी.. काही शिकण्यासारख्या.. काही अनुभवण्यासारख्या.. काही बघून मान वळवण्यासारख्या तर काही वळून वळून बघण्यासारख्या.. काही बघून शुध्द हरप्न्यासारख्या तर काही बघून स्वताची जाणीव करून देण्यासारख्या... काही माणुसकी शिकण्यासारख्या तर काही माणूस असल्याची लाज वाटण्यासारख्या...
सगळ डोळ्याला दिसत... सगळ कानावर येत... काही क्षण उदास वाटत... ह्या सगळ्याचा कंटाळा येतो... ह्या धावपळीचा उबग येतो.. "गड्या आपलाच गाव बरा" असा विचार मनात येतो... मात्र दुसरया क्षणी ह्या धावपळीत माणूस म्हणून जगणारे लोक दिसतात... लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसताना स्वताच चांगल खिडकीच आसन सोडून परक्यांना बसू देणारे आणि स्वत: उभ राहणारे हि फक्त इथेच भेटतात... दुसरयांच्या खांद्यावरून आपल सामान डोलत डोलत जागेवर जाताना "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गाणं जणू लोकलवरच लिहील्याच वाटू लागत... आपल्याला सगळ जाणवत असत.. मात्र ते विश्व नुसत धावत असत... माणुसकी जपत असत आणि जीवन घडवत असत... जीवनाचं ध्येय लोकलच्या वेळेवर अवलंबून असत.. घराला आकार असो वा नसो पण चाकोरीबद्ध जीवनाला आकार लावण्याचा प्रयत्न सगळीकडे सुरु असतो... कुणाला कुणासाठी वेळ नसतो मात्र आयुष्य मात्र वेळेच्याच अधीन असत...
हे सगळ ऐकून, हे सगळ बघून कधीतरी मुंबईची कीव येते... पण हि कीव करणारी मुंबई सगळ्यांना जीव लावते.. भैया आणि भाऊ चा फरक ती मानत नाही.. जात पात कुठे दिसत नाही... सिद्धीविनायाका सोबत हाजीअलीच्या दर्शनालाहि रांगा लागतात.. अरबी समुद्र हि मुंबईच्या सर्व गोष्टीला साक्षी असतो आणि आकर्षणापोटी तोहि गेटवे च्या वेशीवर उचंबळून बाहेर येऊ बघतो आणि ह्या माणसाच्या समुद्रात स्वताची जागा दाखवण्याचा प्रयत्न करतो... इथे येऊन कुणी मोठा हिरो बनतो.. तर कुणी तिथे येऊन झिरो होतो.. पण तरी लोंढे येत राहतात.. अस्तित्व शोधत राहतात आणि दोन घासासाठी, चार भिंतीसाठी प्रत्येक क्षण धडपडत राहतात...
हे मात्र खर..! सारया महाराष्ट्राचं जीवन एकीकडे आणि मुंबईच जीवन एकीकडे... मुंबईत असताना तिथे फिरणं म्हणजे धावपळ वाटते पण ती धावपळ पुन्हा पुन्हा आकर्षित करते आणि परतल्यावर हि खुणावत राहते... सारया जगाची सफर थोड्या वेळात करायची असेल तर मुंबईला भेट द्यावी.. जगातील सर्व ऐशोआरामाच्या गोष्टी इथे सहज उपलब्ध होतात तर कधी इथे उपलब्ध असलेल्या शुल्लक गोष्टींची टंचाई हि इथे दिसते.. एकीकडे लुभावणारा सी लिंक दिसतो तर तिकडे बघता बघता गाडी खड्यात जाण्याची हि शक्यता असते.. गुन्हेगारापासून राजकारण्यांचा हाच आवडता अड्डा आहे आणि त्यांच्या धाकाने, साथीने हे शहर अंगावर घाव सोसतच राहत आणि काहीही झाल तरी धावतच राहत...
तरी मुंबई ती मुंबई...! तिला तोड नाही.. तिच्यासारख जगात दुसर कुणी नाही... मुंबई नुसत एक शहर नाही.. ते नेमक काय आहे ते सांगण हि कठीण आहे.. तिला अवर्णनीय म्हणता येत नाही पण कुठल्या शब्दात हि वर्णन करता येत नाही.. तो एक अनुभव आहे.. तो बोलून कळत नाही.. तो तिथे राहूनच जाणवतो... तिच्याविषयी बोलल्याशिवाय कुणी तिथून परतत नाही.. आणि तो अनुभव कुठल्या आवरणात हि ठेवता येत नाही... शहराला हि जीव असतो अस हे अदभुत शहर.. जो अनुभवतो तोच जाणतो कि इथे जीवाची मुंबई होत नाही तर "जीवा" ची मुंबई खरच जीव लावते... आणि नकळत सारया जणांची आपुलकीची "आमची मुंबई" होऊन जाते...
--स्नेहल
कातिल रात..!
संकटों से गुजरी है रात
फिर नयी सुबह आई है
कही खुशहाली का सुकून है
कहीं अपनों ने जान गवाई है
भगवान्, ये राक्षसों की सेना
क्यूँ यहाँ भिजवाई है
तेरे ही दामन के निचे
इन्होने की ये शैतानी है
चीख रहे है बूढ़े बच्चे
लाशों को भी ये तड्पाई है
एक इन्सान को देखो
आज टुकडो में गिनवाई है
सुबह की रौशनी में अब
लाशें अपनों की पहचानी है
अब तो जागो दुनियावालो
देखो ना ये कैसी हैवानी है
क्या थी हमारी गलती
क्यूँ हमने ये पाया है
घर का चिराग देखो आज
बुझकर घरपर आया है
कल खेल रहा था गोद में
आज लाश बनकर आया है
माँ को मिलने को बेटा आज
कफ़न में लिपट कर आया है
रोती बिलगती माएँ
बेटे के लिए तड़प रही है
उजड़ी हुई गोद को
न जाने कैसे समेट रही है
उजड़ी हुई गोद को
न जाने कैसे समेट रही है.....
--स्नेहल
देह...
झुंडीच्या झुंडी वेताळांच्या
झोंबल्याशिवाय सोडत नाही
दोन कवडीच्या बदल्यामध्ये
अब्रूला मोकळ सोडत नाही
रंगलेल्या चेहरयामागे
बेरंग आयुष्य कुणी बघत नाही
उत्तान शरीरा मागे
उध्वस्त मन कुणी शोधत नाही
प्रेमाचं कुणी भेटलं तरी
प्रेमाला इथे जागा नाही
मनात असली इच्छा तरी
इच्छेला इथे थारा नाही
नशिबी आले दुख
सोसण्याशिवाय पर्याय नाही
देवाने दिलाय देह
विकण्यावर काही उपाय नाही
वासनांध दुनियामध्ये
दिलदारांची तशी कमी नाही
चुकून कधी भेटले तरी
पुन्हा भेटीची मात्र हमी नाही
डोळे आपले असले तरी
स्वप्नावर नियंत्रण नाही
शरीराशिवाय निखळ प्रेमाचे
कुठलेही आमंत्रण नाही
आयुष्याचे फलित काय
ह्या जीवाला हि माहित नाही
देहाशिवाय ह्या जीवाला
कुणी कुठे विचारत नाही
आज आहे तारुण्य
भविष्याची चिंता नाही
देहाच्या बाजारामध्ये
भावनेचा गुंता नाही
देहाला लाख ओरबडणारे
कुरवाळणारे मात्र कुणी नाही
ह्या जगाच्या संसारात
संसारासाठी कुणी नाही
गिर्हाईक सुद्धा एक देह
त्याला काही भाव नाही
भाव असेल त्याला
ज्याला ह्या देहाची हाव नाही
--स्नेहल
Friday, July 1, 2011
अ - तूट नाते...
जोडले जे नाते
बोलुनी धादांत खोटे
शब्द ओघळती मोठे
मात्र भाव अप्पलपोटे
कठीण प्रसंगी समजे
कोण खरे अन खोटे
कोण असती आपले
कोण नुसतेच गोटे
प्रेम कमकुवत असता
नात्यांना फुटता फाटे
बंध हे क्षीण होता
नाते राहते वांझोटे
रेतीसम असते नाते
आवळता साथ सोडे
बंध खेचता जोरात
अश्रूचा बांध फोडे
--स्नेहल
आयुष्याची झाली माती..!!
आयुष्याची झाली माती,, भरकटली हि नाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
दुभंगले हे मन अन चित्त,, आपल्यांच्या पाती
भरडून गेले सारे जेव्हा,, फिरली नियतीची जाती
दोन क्षणाचे असे सोबती,, दोन क्षणाची प्रीती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
पेटलेला विरहाचा वणवा,, सर्वस्व गेले सती
विझला जेव्हा, झाली होती,, राख रांगोळी अति
दुख उरले जीवनी आता ,, झाली सुखांची क्षति
उरली काही आशा नाही,, उरली काही हाती
सुचेना आता काही अन,, भ्रष्ट झाली मति
गोठलेल्या आसवातून,, बरसून येई प्रीती
आठवणींच्या विळख्यात,, स्पंदन हि सोडी छाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
आयुष्याची झाली माती,, भरकटली हि नाती
उरली काही आशा नाही,, उरले काही हाती
--स्नेहल
मन चिंतीत जाहले
मन चिंतीत जाहले
आप्तांनी तया ना ओळखले
मन चिंतीत जाहले
अश्रुंचे झरे वाहुनी थिजले
विचारमंथनातून भाव निजले
मन आक्रांदुनी कन्हले.....
कुणी तयाला नाही पुसले
मन स्फुन्दित राहले....
युगांचे दु:ख पदरी थाटले
परीजनाना सुख वाटले
मन नात्यात फसले....
कुणी जाणेना तयाने काय भोगले
मन सोसत राहिले....
घर वरून दिसे सजवलेले
नाते आतील उसवलेले
यत्न करीत राहिले....
कुणी तयाला नाही भेटले
मन शोधीत राहिले....
मन चिंतीत जाहले
आप्तांनी तया ना ओळखले
मन चिंतीत जाहले
--स्नेहल
Wednesday, June 1, 2011
ये जिंदगी एक किताब है
ये जिंदगी एक किताब है
हर पन्ना पन्ना एक ख्वाब है
भगवन का दिया ये ख़िताब है
ये जिंदगी लाजवाब है
हर पन्ने पन्ने पे है लिखा
एक एक अक्षर जो प्यार से
संभालना इसे है ठीक से
ये ना मिटे किसी वजह से
भगवन का दिया ये ख़िताब है
ये जिंदगी लाजवाब है
..........ये जिंदगी एक किताब है
हर अक्षर अक्षर पे चढ़ाया है
भावों का रंग ये अनोखा है
हर रंग में दुवाओ का मिलाप है
आंसू के संग हसी का आधार है
भगवान का दिया ये ख़िताब है
ये जिंदगी लाजवाब है
...........ये जिंदगी एक किताब है
जैसे जैसे पन्ने ये पलटते है
जिंदगी का सफ़र समेटते है
यादों में सब बस जाता है
किताब को होता मिटाना है
भगवन का ये दिया ये ख़िताब है
ये जिंदगी लाजवाब है
.......... ये जिंदगी एक किताब है
आखरी पन्ना बड़ा कठिन है
किताब जो उसे अब लौटाना है
बस हरपल ध्यान में रखना है
इस किताब को पावन रखना है
भगवन का ये दिया ये ख़िताब है
ये जिंदगी लाजवाब है
.......... ये जिंदगी एक किताब है
--स्नेहल
Monday, May 30, 2011
गुमसुम बैठी हो क्यूँ...?? गुमसुम
पति ---
गुमसुम बैठी हो क्यूँ...?? गुमसुम
कुछ तो बताओ ना..... हमदम
गुमसुम बैठी हो क्यूँ...?? गुमसुम
एकबार मुझे तो देखो
एकबार तो मुस्काओ
क्या दिल में छुपा के बैठे
वोह हमको तो बतलाओ
हम तो संग है तेरे..... हरदम
गुमसुम बैठी हो क्यूँ ...?? गुमसुम
कुछ तो बताओ ना... हमदम
तेरी बात सुनसुन के तो
दिल को ख़ुशी मिलती है
तेरी आवाज से ही तो
जिंदगी हसीं लगती है
कुछ बात तो करो ना... ऐ सनम
गुमसुम बैठी हो क्यूँ ...?? गुमसुम
कुछ तो बताओ ना... हमदम
नाराज हो क्या किससे
गलती हुई क्या मुझसे
चलो माफ़ी भी मांगते है
अब भी रूठे क्यूँ ऐसे
अब छोडो ये गुस्सा... जानेमन
गुमसुम बैठी हो क्यूँ ...?? गुमसुम
कुछ तो बताओ ना... हमदम
पत्नी--
हफ्ते के बाद आते हो
एक दिन तो साथ रहते हो
जल्दी नहीं फिर भी क्यूँ
तुम नहीं आ सकते हो
गलती की है ये सजा... बेरहम
ताकि तुम भी जान सको... अकेलापन
पति--
माना हुई गलती मेरी
पर होगी ना मज़बूरी
जानती तो हो तुम
कितनी लम्बी है दुरी
ऐसे ना रूठो तुम.... ऐ सनम
गुमसुम ना तुम रहो... हमदम
यूँही पास ही तुम रहो.... जानेमन
--स्नेहल
सहज सुचलेल.....
ढग येतील वाजत गाजत
बरसत थेंबावर थेंब
हर्ष होईल मातीला
अन सृष्टी भिजेल चिंब....!!
--स्नेहल
सोडून ती गेली होती
मला कठीण आडवळणावर
विनवून पुन्हा आली
जेव्हा होतो मी सरणावर....
--स्नेहल
वेळ काळची तिला
नव्हतीच काही जाणीव
हीच तर होती
तिच्या प्रेमामध्ये उणीव....
--स्नेहल
शब्द थांबले तर
सांग भावना मोकळ्या कश्या होतील
आणि छान लिहिले नाही तर
तुला हसण्याच्या उकळ्या कश्या येतील...:)
--स्नेहल
प्रेम इतक अबोल होत
कि ते तीच तिला हि कळलं नाही
मी ओरडून बोलवत राहिलो
पण तीच पाऊल काही वळल नाही...
--स्नेहल
कान टोचून हि
ती काही बदलली नाही
मी खचून गेलो
पण ती काही सुधारली नाही...
--स्नेहल
जेव्हा झाली तिला प्रेमाची जाणीव
आणि आली होती थोडी कीव
हा देह होता सरणावर
अन उडून गेला होता जीव..!
...--स्नेहल
पण, कदाचित---
खोली असेल तिच्या प्रेमामध्ये
म्हणून वरून दिसायची शांत
हे सगळे हि कळले तेव्हा
जेव्हा झाला होता अंत...!
--स्नेहल
आता विचार करूच नये
एका ठिकाणी बसावे शांत
घेऊन टाकावा संन्यास
अन होऊन जावे संत....:):)
--स्नेहल
संन्यास घेऊन कुठे करू
नसता डोक्याला भार
बायको रात्री देणार नाही
जेवणात भातावर सार...:):)
--स्नेहल
बरसत थेंबावर थेंब
हर्ष होईल मातीला
अन सृष्टी भिजेल चिंब....!!
--स्नेहल
सोडून ती गेली होती
मला कठीण आडवळणावर
विनवून पुन्हा आली
जेव्हा होतो मी सरणावर....
--स्नेहल
वेळ काळची तिला
नव्हतीच काही जाणीव
हीच तर होती
तिच्या प्रेमामध्ये उणीव....
--स्नेहल
शब्द थांबले तर
सांग भावना मोकळ्या कश्या होतील
आणि छान लिहिले नाही तर
तुला हसण्याच्या उकळ्या कश्या येतील...:)
--स्नेहल
प्रेम इतक अबोल होत
कि ते तीच तिला हि कळलं नाही
मी ओरडून बोलवत राहिलो
पण तीच पाऊल काही वळल नाही...
--स्नेहल
कान टोचून हि
ती काही बदलली नाही
मी खचून गेलो
पण ती काही सुधारली नाही...
--स्नेहल
जेव्हा झाली तिला प्रेमाची जाणीव
आणि आली होती थोडी कीव
हा देह होता सरणावर
अन उडून गेला होता जीव..!
...--स्नेहल
पण, कदाचित---
खोली असेल तिच्या प्रेमामध्ये
म्हणून वरून दिसायची शांत
हे सगळे हि कळले तेव्हा
जेव्हा झाला होता अंत...!
--स्नेहल
आता विचार करूच नये
एका ठिकाणी बसावे शांत
घेऊन टाकावा संन्यास
अन होऊन जावे संत....:):)
--स्नेहल
संन्यास घेऊन कुठे करू
नसता डोक्याला भार
बायको रात्री देणार नाही
जेवणात भातावर सार...:):)
--स्नेहल
Thursday, May 26, 2011
वाट जीवघेणी..!
आठवणीचा वणवा पेटला होता
अश्रू हि काठावर टेकला होता
आज काही अघटीत होणार
मनात घेऊन बसला होता
मनात वारा वाहत होता
भावना अश्या बघत होता
वणवा जसा भडकला होता
विचार अचानक तडकला होता
.......आज काही अघटीत होणार
मनात घेऊन बसला होता
काटा जोरात फिरत होता
वेळ मात्र सरत नव्हता
वाट समोर असूनही
वाटेमध्ये अडकला होता
.......आज काही अघटीत होणार
मनात घेऊन बसला होता
दुष्ट चक्राच्या गर्तेत होता
नियतीच्या खेळात सापडला होता
वेळ आली होती मात्र
काळ आज आला नव्हता
........अस अघटीत नव्हतच होणार
म्हणून मनात खुदकन हसला होता
अश्रुने उडी मारून
आनंद व्यक्त केला होता
तो मग आपसूकच
तिच्या मिठीत सामावला होता
........तो मग आपसूकच
तिच्या मिठीत सामावला होता
--स्नेहल
भ्रष्ट - आचार...!!
बेईमानी से भरपूर है
स्वार्थ से ही बनता है
जोरशोर से हर जगह
बिकता भ्रष्ट - आचार है
देश की ना चिंता है
पैसों का बस विचार है
देश का हो कुछ भी
बेचना भ्रष्ट - आचार है
जनता तो भोली है
इनके सामने लाचार है
जहा जाओ वहां बस
मिलता भ्रष्ट - आचार है
अपनों के खयालो में
डूबा यहाँ संसार है
फिकर है किसकी बस
करना भ्रष्ट - आचार है
करना और खाना है
देश को दिखाना है
जेल में जाकर भी
भ्रष्ट - आचार का गुणगाना है
ना कोई सीमा है
ना किसीपे लगाम है
सालों से बन रहा
यहाँ भ्रष्ट - आचार है
कोई जानता नहीं
ना किसी को पता है
कब ख़राब होकर ये
फेकना भ्रष्ट -आचार है
--स्नेहल
Wednesday, May 25, 2011
सबका मलिक एक है..!!
भगवान हो या अल्लाह है
हम सारे तो उसीके रूप है
जीना है तो शान से जिओ
जीवन दिया जो हमें एक है
....सबका मालिक एक है
सबका मालिक एक है
धरम जाती में फरक है
खून का रंग तो एक है
रहन सहन में फरक है
पर दुःख दर्द तो एक है
....सबका मालिक एक है
सबका मालिक एक है
साथ साथ रहना है
हसी ख़ुशी जीना है
इन्सान के जनम में
जीना सभी को नेक है
....सबका मालिक एक है
सबका मालिक एक है
भगवान ने ना किया
हम में जो कोई भेद है
कोई लाख बढ़ाये दुरी
हम सब एक है
.....सबका मालिक एक है
सबका मालिक एक है
आरती हो या नमाज हो
पुकारते जिसे वोह एक है
मंदिर हो या मस्जिद हो
सबका मालिक एक है
.....सबका मालिक एक है
सबका मालिक एक है
--स्नेहल
सहज सुचलेलं...
आयुष्याच्या दिव्यामध्ये
तेल तुझ्या प्रीतीच
प्रतिक ते ह्या जिवाच्या
फडफडणारया ज्योतीच...:)
--स्नेहल
अबोल ती अबोल मी
कुणीकुणाशी बोलेना
प्रयत्न केला नजरेने
पण इशारे काही टळेना..:):)
--स्नेहल
आठवणी तळपू लागतात
जाणवू लागते धग
आसमंतात दाटतात जेव्हा
पहिल्या पावसाचे ढग
--स्नेहल
ढग आला सोबत घेऊन
पहिल्या पावसाचे दोन थेंब
आठवणी कडाडतील आता
भिजून जाईल मन हे चिंब
--स्नेहल
त्याच वागणच तसच असत
कुणाकुणाच्या आवारात बरसत असतो
आणि, स्वताच्या सरींसोबत
दुसऱ्यांच्या भावना हि सावरत असतो....
--स्नेहल
तो घालतो जेव्हा
हर दु:खावर फुंकर
कठीण वाट हि तेव्हा
वाटू लागते सुकर
--स्नेहल
निरव शांततेतच आपल
खर असणार अस्तित्व कळत
उजेडात रूप लपवण्याच
पितळ तिथेच तर उघड पडत...!!
--स्नेहल
बरसत असतात ना
जेव्हा सरी बेधुंद
त्यात असतात डोळ्यातल्या
अश्रुंचे दोन थेंब...
--स्नेहल
आसवांना बस हवा असतो
बरसण्याचा एक बहाणा
सरींसोबत बरोबर साधतात
मनावर अचूक निशाणा...
--स्नेहल
तेल तुझ्या प्रीतीच
प्रतिक ते ह्या जिवाच्या
फडफडणारया ज्योतीच...:)
--स्नेहल
अबोल ती अबोल मी
कुणीकुणाशी बोलेना
प्रयत्न केला नजरेने
पण इशारे काही टळेना..:):)
--स्नेहल
आठवणी तळपू लागतात
जाणवू लागते धग
आसमंतात दाटतात जेव्हा
पहिल्या पावसाचे ढग
--स्नेहल
ढग आला सोबत घेऊन
पहिल्या पावसाचे दोन थेंब
आठवणी कडाडतील आता
भिजून जाईल मन हे चिंब
--स्नेहल
त्याच वागणच तसच असत
कुणाकुणाच्या आवारात बरसत असतो
आणि, स्वताच्या सरींसोबत
दुसऱ्यांच्या भावना हि सावरत असतो....
--स्नेहल
तो घालतो जेव्हा
हर दु:खावर फुंकर
कठीण वाट हि तेव्हा
वाटू लागते सुकर
--स्नेहल
निरव शांततेतच आपल
खर असणार अस्तित्व कळत
उजेडात रूप लपवण्याच
पितळ तिथेच तर उघड पडत...!!
--स्नेहल
बरसत असतात ना
जेव्हा सरी बेधुंद
त्यात असतात डोळ्यातल्या
अश्रुंचे दोन थेंब...
--स्नेहल
आसवांना बस हवा असतो
बरसण्याचा एक बहाणा
सरींसोबत बरोबर साधतात
मनावर अचूक निशाणा...
--स्नेहल
Monday, May 23, 2011
चाहूल..!
दोन जीव होते तळमळलेले
वर्षांचे स्वप्न जे बघितलेले
आता पुरे ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!
काटेरी ते अवघड वळणे
टोचून टोचून असे बोलणे
आता बंद ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!
दगडांमध्ये भेटेल पारस
मिळेल आता गोड वारस
दु:ख दूर ते होईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!
नात्यामधला मधुर बदल हा
ज्याची होती फार प्रतीक्षा
दुडू दुडू धावत येईल....
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!
दयावंत तो परमेश्वर जो
आला धावून दुख बघून तो
असाच सोबत राहील...!!
आयुष्याच्या ह्या वळणावर
एक सोबती येईल..!!
--स्नेहल
असाच का असावा बाप..?
कधी काळजी करू नये
कधी जवळ घेऊ नये
द्यावा फक्त डोक्याला ताप
असाच का असावा बाप..???
कधी गोड बोलूच नये
कधी लाड करूच नये
बस दिसल्यावर फक्त झाप
असाच का असावा बाप...???
मुलं म्हणजे डोक्याला ताण
नसावी कुणाच्या मनाची जाण
पैश्याने संबंधाचे करावे मोजमाप
असाच का असावा बाप...???
प्रेम इतके जीर्ण असावे
नाते इतके क्षीण असावे
कधीच नसावी प्रेमाची थाप
असाच का असावा बाप...???
मुलांना तुछ्ह समजावे
कुणाला हि न जपावे
रागाचा नेहमी दाखवावा प्रताप
असाच का असावा बाप...???
दिवस दिवस संभाषण नसावे
"स्व" मधून कधी बाहेर न यावे
नेहमी करावा स्वत्वाचा आलाप
असाच का असावा बाप...???
घरात खूप दरारा असावा
समोरचा प्रत्येक जण भ्यावा
हाक ऐकून भीतीने लागावी धाप
असाच का असावा बाप...???
प्रश्न नेहमी सोबत राहतात
पण अश्रूंची साथ सुटत नाही
बाप समोर असतो मात्र
तो "बेटा" कधी म्हणत नाही
जन्म देऊन ह्या जीवाला फुलवले
दूर सारून असे मनाला तुडवले
प्रश्न पडतो नेहमी असा
ह्याने ह्या जीवाला तरी का घडवले...???
.......ह्याने ह्या जीवाला तरी का घडवले ...???
--स्नेहल
Saturday, May 21, 2011
यातना..!
अश्रूंनी काया भिजली होती
जागच्या जागी ती हि थिजली होती
काया थिजून मन का थिजणार होत
आठवणीत रोज ते तसंच भिजणार होत
नजर तिला शेवटच न्याहाळत होती
बघताना ती हि भान विसरली होती
मनातील रूप दिसण का थांबणार होत
मूकपणे ते समोर हरक्षण दिसणार होत
मनात जागत होत्या आठवणी गर्द
विचारात घालवलेल्या त्या राती सर्द
सार काही एका क्षणात का सुटणार होत
ती जाऊन खरच का प्रेम तुटणार होत
एक मूक आवाज दिला जेव्हा
वळून बघितलं होत तिने तेव्हा
आशेचे किरण तेव्हा का चमकणार होते
प्रेम माझे पुन्हा मागे का फिरकणार होते
यातनेत ह्या स्पंदन मागे पडत होते
मनातील उत्तुंग भाव कमी होत होते
हळूहळू स्पंदन का साथ सोडणार होते
आत्म्याविण शरीर जगून तरी काय करणार होते
आत्म्याविण शरीर जगून तरी काय करणार होते...
--स्नेहल
Thursday, May 19, 2011
सहज सुचलेलं...!
मी दिली होती अंधकारात
एक ज्योत नव्या आशेची
प्रकाशुनी तू टाकली ठिणगी
अन राख केली प्रीतीची....
--स्नेहल
एका नजरेत बघून तिला
चेहरा मनात झाला जप्त
हृदयात हि उमलू लागल्या
प्रेमाच्या इच्छा आता सुप्त....:)
--स्नेहल
बरोबर आहे सगळ तरी काहीतरी चुकतंय
सगळ काही जुळून हि काहीतरी सुटतंय
काळजीच्या ओझ्याने हे काळीज हि झुकतंय
वेदनेच्या लाटेत हळूहळू स्पंदन हि तुटतंय..........:(
--स्नेहल
एक ज्योत नव्या आशेची
प्रकाशुनी तू टाकली ठिणगी
अन राख केली प्रीतीची....
--स्नेहल
एका नजरेत बघून तिला
चेहरा मनात झाला जप्त
हृदयात हि उमलू लागल्या
प्रेमाच्या इच्छा आता सुप्त....:)
--स्नेहल
बरोबर आहे सगळ तरी काहीतरी चुकतंय
सगळ काही जुळून हि काहीतरी सुटतंय
काळजीच्या ओझ्याने हे काळीज हि झुकतंय
वेदनेच्या लाटेत हळूहळू स्पंदन हि तुटतंय..........:(
--स्नेहल
बट्याबोळ..!!
जमता जमता सारे विस्कटे
घडी बसता सारे फिसकटे
हर क्षणावर परक्याचा पहारा
कुणा कुणाचा नसे सहारा
नियती खेळती असा खेळ
जमू देईना काही मेळ
नशीब हि करती आता थट्टा
लावे ह्या जीवावर सट्टा
इच्छा असून परवानगी नाही
सुख असून आनंदी नाही
झालाय सारा असा घोळ
जीवनाचा झालाय बट्याबोळ
..........जीवनाचा झालाय बट्याबोळ
--स्नेहल
घडी बसता सारे फिसकटे
हर क्षणावर परक्याचा पहारा
कुणा कुणाचा नसे सहारा
नियती खेळती असा खेळ
जमू देईना काही मेळ
नशीब हि करती आता थट्टा
लावे ह्या जीवावर सट्टा
इच्छा असून परवानगी नाही
सुख असून आनंदी नाही
झालाय सारा असा घोळ
जीवनाचा झालाय बट्याबोळ
..........जीवनाचा झालाय बट्याबोळ
--स्नेहल
रुंदन..!!
प्रीतीत झाले जीव भग्न
ते करती आता रुंदन
सवे विरहाची झालर
पुसती आली का आंदन
नजरेला झाला भार
करी असीमित ते स्फुंदन
निघाले काटेरी झुडूप ते
ज्यासी समजले होते चंदन
नावी ज्याच्या केले होते
हे मन हे अन हे स्पंदन
आक्रांदिले तेच आज
गाई वेदनेचे गुंजन
--स्नेहल
ते करती आता रुंदन
सवे विरहाची झालर
पुसती आली का आंदन
नजरेला झाला भार
करी असीमित ते स्फुंदन
निघाले काटेरी झुडूप ते
ज्यासी समजले होते चंदन
नावी ज्याच्या केले होते
हे मन हे अन हे स्पंदन
आक्रांदिले तेच आज
गाई वेदनेचे गुंजन
--स्नेहल
वैरी..!!
दोन क्षण झाडल्या
प्रेमाच्या चार फैरी
देऊन दु:ख गेला
अन प्रीत झाली वैरी
उडून गेल्या क्षणात
घेतलेल्या आणाभाका
तोडून बंध गेला
दुष्ट हवेचा झोका
मनात रेखलेली
मी सुख स्वप्नाची नक्षी
त्याने पुसले सर्वकाही
अन ठेविले मलाच साक्षी
सत्य वदले मी पण
असत्याचा तो कैवारी
घेऊन मनात वैर
झाला तो हत्यारी
ते स्वप्न विरले
अन तोडले ते पाश
सात जन्माचा करवला
त्याने असा विनाश
सात जन्माचा करवला
........त्याने असा विनाश
---स्नेहल
प्रेमाच्या चार फैरी
देऊन दु:ख गेला
अन प्रीत झाली वैरी
उडून गेल्या क्षणात
घेतलेल्या आणाभाका
तोडून बंध गेला
दुष्ट हवेचा झोका
मनात रेखलेली
मी सुख स्वप्नाची नक्षी
त्याने पुसले सर्वकाही
अन ठेविले मलाच साक्षी
सत्य वदले मी पण
असत्याचा तो कैवारी
घेऊन मनात वैर
झाला तो हत्यारी
ते स्वप्न विरले
अन तोडले ते पाश
सात जन्माचा करवला
त्याने असा विनाश
सात जन्माचा करवला
........त्याने असा विनाश
---स्नेहल
Monday, May 16, 2011
एका शब्दाची कहाणी.....
एक शब्द पेटला होता
हातातून सुटला होता
राणीच्या मनाचा ठाव
त्याने घेतला होता
समज झाले गैर
राजा अति सैरभैर
त्याच शब्दाने तेव्हा
राजाशी केले बैर
शब्द येणे तो परत
शक्य नव्हते आता
माफीचा आता शब्द
राणीला विनवीत होता
राणीने केले माफ
राजाचे मन ते साफ
शब्दाने केला घोळ
मनात अति कल्लोळ
राजाने जाणिले तेव्हा
शब्दाचा खेळ हा दुष्ट
राणीला केले होते
एका क्षणात त्याने रुष्ट
राजाच्या डोळा पाणी
करी विनंती केविलवाणी
एकदा कवेत घे ग
माझ्या प्रेमळ राणी
एकदा कवेत घे ग
...... माझ्या प्रेमळ राणी
हातातून सुटला होता
राणीच्या मनाचा ठाव
त्याने घेतला होता
समज झाले गैर
राजा अति सैरभैर
त्याच शब्दाने तेव्हा
राजाशी केले बैर
शब्द येणे तो परत
शक्य नव्हते आता
माफीचा आता शब्द
राणीला विनवीत होता
राणीने केले माफ
राजाचे मन ते साफ
शब्दाने केला घोळ
मनात अति कल्लोळ
राजाने जाणिले तेव्हा
शब्दाचा खेळ हा दुष्ट
राणीला केले होते
एका क्षणात त्याने रुष्ट
राजाच्या डोळा पाणी
करी विनंती केविलवाणी
एकदा कवेत घे ग
माझ्या प्रेमळ राणी
एकदा कवेत घे ग
...... माझ्या प्रेमळ राणी
मी द्विधा.. मी द्विधा...
काय वर्णावी माझी व्यथा
कोणा सांगावी हि कथा
दोन वळणावर आहे उभा
मी द्विधा मी द्विधा
भावनांचा झालाय गुंता
काय निवडावे हीच चिंता
निर्णय घेण्याची नाही मुभा
मी द्विधा मी द्विधा
एका वळणावर प्रेम खुणावी
एका वळणावर कर्तव्य बोलवी
अस्तित्वावरच आता आलीय गदा
मी द्विधा मी द्विधा
प्रेमावर आहे अति विश्वास
जीवनाचा हि होतोय ह्रास
अपेक्षा आवड कळून सुद्धा
मी द्विधा मी द्विधा
काय करावे काही कळेना
कुठे काहीच कसे सुचेना
नेमकी कशाची आहे हि क्षुधा
मी द्विधा मी द्विधा
कोणा सांगावी हि कथा
दोन वळणावर आहे उभा
मी द्विधा मी द्विधा
भावनांचा झालाय गुंता
काय निवडावे हीच चिंता
निर्णय घेण्याची नाही मुभा
मी द्विधा मी द्विधा
एका वळणावर प्रेम खुणावी
एका वळणावर कर्तव्य बोलवी
अस्तित्वावरच आता आलीय गदा
मी द्विधा मी द्विधा
प्रेमावर आहे अति विश्वास
जीवनाचा हि होतोय ह्रास
अपेक्षा आवड कळून सुद्धा
मी द्विधा मी द्विधा
काय करावे काही कळेना
कुठे काहीच कसे सुचेना
नेमकी कशाची आहे हि क्षुधा
मी द्विधा मी द्विधा
Thursday, May 5, 2011
आयुष्याच्या ह्या वळणावर..!!
आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर
कुठे कुणी ना दिसे आपल
दृष्ट लागली का नात्यावर
काळाच्या तोडूनिया भिंती
आठवणी आदळती मनावर
क्षणभंगुर ती स्नेहाची प्रीती
नाही उरली आता इथवर
आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर...
एकट्या अश्या ह्या जगण्यावर
नाही भरवसा आता जन्मावर
प्रेम भावना सारे बेवारस
नाही कवडसा ह्या अंधारावर
आयुष्याच्या ह्या वळणावर
अश्रू दाटती ह्या नयनावर
कुठे कुणी ना दिसते आपल
दृष्ट लागली का नात्यावर....
--स्नेहल
तू यावे अन.....
जीवघेण्या ग्रीष्मात तू झुळूक बनून यावे
एकांताच्या रणात तू सर बनून बरसावे
दुष्ट जगाच्या चिखलात तू कमळ बनून फुलावे
मन पारंब्यावर तू एक पाखरू बनून झुलावे
कोरड्या न शुष्क मनी तू दव बनून यावे
काळजाच्या ढेकळास तू ओलावून जावे
पाषाण ह्या हृदयात तू झरा बनून यावे
मन पाषाणाला तू पाझर फोडून जावे
असह्य ह्या उन्हात तू सावली बनून यावे
शीतल जल पसरून तू मृदगंध पसरावे
शिडकावा प्रेमाचा तू हळुवार करून जावे
ह्या जीवन बागेला तू प्रेमाने फुलवावे
--स्नेहल
हरवलेले क्षण..!!
काळाच्या ओघात
माणस हरवतात
आठवणीच्या झरोक्यातून
हळूच डोकावतात
मनाच्या कप्प्यात
तीच वसतात
नजरेला दिसत नाहीत
पण अश्रुनी ओलावतात
क्षण हि त्यांच्याविना
युगांप्रमाणे भासतात
दु:ख अन वेदना
सोबतच चालतात
त्या जीवांना बिलगण्यासाठी
जीव कासावीस होतो
जुने क्षण ओंजळीत आणण्याचा
केविलवाणा प्रयत्न होतो
--स्नेहल
तिची आठवण..!!
आठवणीतून अशी
ती का डोकावतेय
वेदनेच्या झोकासोबत
ती का झोकावतेय
डोळ्यांच्या कडा
ती का ओलावतेय
अश्रुना लोटण्यास
ती का सोकावतेय
दूर असूनही
ती का सतावतेय
मनाने जवळ हि
तीच का वाटतेय
इतके छळून हि
तीच का आठवतेय
शुष्क ह्या मनाला
तिची आठवणच जगवतेय
--स्नेहल
सुखांत..!!
मन हे अशांत रे
शोधी क्षण निवांत रे
करती आकांत रे
शोधी सुखांत रे
मन एकटे.. मन बावरे
मारी कुणाही हाक रे
जीवघेणा एकांत रे
शोधी सुखांत रे...
मन हे अशांत रे
शोधी क्षण निवांत रे
मन आश्रित मन चिंतीत
सहे वेदना हे अखंडित
हि दु:ख अनंत रे
शोधी सुखांत रे....
मन हे अशांत रे
शोधी क्षण निवांत रे
मन तोडले मन छाटले
सुख जावून कुठे लोपले
फिरे भ्रांत भ्रांत रे
शोधी सुखांत रे....
मन हे अशांत रे
शोधी क्षण निवांत रे
मन भाबडे मन हळवे
वेडी आशा अजुनी बाळगे
सुख येतील शिंपित रे
क्षण येतील निवांत रे...
मन हे अशांत रे
शोधी क्षण निवांत रे
करती आकांत रे
शोधी सुखांत रे
.... शोधी सुखांत रे
-- स्नेहल
तुकारामाची माऊली...
भरला संसार सोडून
वेड भक्तीच पांघरून
विठू माऊलीच्या पायी
तुका जाई तो रंगून
ऐशोआरामाशी वंचित
विठायीला आयुष्य अर्पित
छळती जरी सारे
ध्येय ढळे ना किंचित
लेकरास तव घेण्यास
पुष्पक विमान अवतरती
भक्तीच्या रम्य रूपासी
अखेर माऊलीच कवटाळती...
--स्नेहल
फास..!!
कलेवर मी संचीले
मन चितेचे रचिले
अश्रुंचे होता फुले
सरणावर तेच वाहिले
वेदनेचे लचके तोडले
काळजाचे लक्तर लोम्बले
सुकर मार्गाचीया ठायी
काट्यांचे ठाव झोंबले
तव छंद मनी जपिले
मम आभासी भासले
तव रुष्ट होऊन बसिले
मन कळवळून आक्रांदिले
डाव घटीकेचा ठरीला
क्षणात ची फिस्कटला
तव प्रीत आज जैसे
फास गळीचा उरीला
--स्नेहल
अरे संसार संसार..!!
अरे संसार संसार
नाही घडीचा खेळ
सात जन्माचा बंध
नाही नात्यांचा घोळ
अरे संसार संसार
नाही शरीराचं मिलन
दोन जीवांचं प्रेम
अन सुखाचं नंदनवन
अरे संसार संसार
नाही अपेक्षा संपूर्ण
दोहोंची साथ असते
आत्मीयतेने परिपूर्ण
अरे संसार संसार
नाही झगडा, कटकट
स्वर्गातली गाठ
अशी सुटेना झटपट
अरे संसार संसार
नाही रहाट गाडगा
प्रेमाने करावे लागे
संकटांचा सामना
अरे संसार संसार
नाही क्षणाचा सांभाळ
जन्मोजन्मीच नात
देवाने बांधला मेळ
अरे संसार संसार
प्रेमाचे ते प्रतिक
आयुष्य सरे तरी
भासे ते आकर्षक
--स्नेहल
रासलीला...!!
सावळा तो कृष्ण मुरारी
रासक्रीडेचे राग आळवी
धून मधुर बासरीची ती ऐकुनी
स्तिमित होई राधा हि भोळी
रासलीला ती अति अदभूत
रंगमहाली राधेला अर्पित
प्रेमस्वरूप ते रूप मनोहर
बघून होई राधा हि स्तंभित
निधुवनात घुमे प्रीतीचे संगीत
गोपिका हि धरती ठेका रंगीत
विलोभनीय प्रेमाचे ते रूपक
सृष्टी बघे होऊनिया अचंभित
--स्नेहल
१४ ऑगस्ट... माझा वेलेनटाइन डे....!!
वेलेनटाइन डे आहे म्हणे आज
प्रेमात रंगून जायचं म्हणे आज
गुलाबच फुल द्यायचं, चोकोलेट द्यायचं
हातात हात घालून फिरायचं असत म्हणे आज
प्रेम मी हि केल होत
हृदय माझ हि अचानक धडकल होत
पण तो दिवस १४ ऑगस्ट होता
म्हणून काय त्या प्रेमाला अर्थ नव्हता..?
चोकोलेट नव्हत, गुलाब नव्हत
जवळ फुल दिसलं ते हि जास्वंदाच होत
गुलाब दिल नाही, चोकोलेट दिल नाही
म्हणून काय माझ प्रेम झाल नाही..?
हातात हात घेऊन प्रपोज करणं पटत नव्हत
अति जवळ जाणं तर चांगल हि वाटत नव्हत
हातात हात घेतला नाही, तेव्हा जवळ हि गेलो नाही
म्हणून माझ प्रेम काही कुठे अडलं नाही..
भावनांच्या कल्लोळात हा गोंधळ होता
कवितेने तेव्हा मला हळूच इशारा केला होता
समोरासमोर बोलण तर खूपच कठीण गेलं
म्हणून शब्दांनीच प्रितीच निमंत्रण द्यायचं ठरवलं
आणि मी कविता लिहिली,, हळूच तिला दिली
तिनेही चक्क वाचली,, खुदकन गालात हसली
वेलेनटाइन नसूनही,, मन मात्र लगेच जुळली
तारीख आडवी आली नाही,, प्रीत कुठे हि अडली नाही
वेलेनटाइनबाबा खुश झाला,, तारखेशिवाय प्रसाद दिला
प्रेम तेच श्रेष्ठ ठरले,, लालूच न दाखवता ते घडले
स्पर्शाची गरज लागली नाही,, अपेक्षा कुणीच ठेवली नाही
मनात मन अस काही गुंफल,, म्हणूनच प्रेमाचं ते फुल आजही नाही सुकलं
..................प्रेमाचं ते फुल आजही नाही सुकलं
----स्नेहल
ते प्रेम..!!
पाकळी त्या फुलाची
आजहि पुस्तकी खुलते
सुगंध त्या प्रीतीचा
आजही जीवनी दरवळे
आठवती ते दिन अन
स्वप्नांनी सजलेल्या राती
व्यतीत केलेले हरक्षण
होते जे तुझ्यासोबती
सांजवेळी माझ ते
रोज तुला भेटण
तुझ्या मनात माझ
ते अस्तित्व शोधण
आनंदाचे दिन सरले
तुजवीण न काही उरले
आज तुझ दिसन प्रिये
फक्त स्वप्नीच उरले
लक्ष येतात, लक्ष जातात
तूझी सर ना येई कोणा
आजही ह्या मनी, प्रिये
फक्त न फक्त तुझ्याच खुणा.........!!
--स्नेहल
माझ्या मनीच गाव..!!
माझ्या मनीच्या गावी,, चला जाऊया आपण
बघून तो प्रेमभाव,, दु:ख जाऊया विसरून
माझ्या मनीच्या गावी,, एक सुंदर मंदिर
सर्व धर्मियांसाठी,, तिथे सर्वांना आदर
माझ्या मनीच्या गावी,, सारे सारे हिरवेगार
शेत खळ्यात चाले,, गाई बैलांची रेलचेल
माझ्या मनीच्या गावी,, घरे अति टुमदार
बंगळी वर खेळ खेळी,, छोटी छोटी पोर
माझ्या मनीच्या गावी,, झुळझुळ वाहे नदी
पाणी भरण्या किनारी,, जमती बाया अन पोरी
माझ्या मनीच्या गावी,, सांजवेळ हि सोनेरी
गाई बैलांची जोडी,, येऊ लागतात घरी
माझ्या मनीच्या गावी,, पाखरांची चिवचिव
नसे भीती कुणाची,, मुक्त फिरती हे जीव
माझ्या मनीच्या गावी,, माणसांचे ताटवे
फुलापरी कोमल,, नसे काही ना नखरे
माझ्या मनाच्या गावी,, पैश्याची चणचण
पण मनाची श्रीमंती,, अशी कुठेही नसेन
-- स्नेहल
कोंलेज कट्टा २..!!
तोंडी परीक्षेला तर सरांच्याच तोंडाला फेस येई
नवनवीन चेहरे पाहून त्यांचीच तारांबळ होई
वर्षभर न पाहिलेली तोंड त्या परीक्षेला
तोंडवर करून उभी बघून त्यांची हि जीभ वळवळून येई
एकदा सरांनी मला विचारले होते, मुंबईच्या पोदार कॉलेजचे का तुम्ही
मी म्हणालो नाही तर,, सर ह्याच कॉलेजचे आहोत आम्ही
सर म्हणाले,, हो का.. मला वाटले मुंबईचे असाल म्हणून इथे कधी दिसत नसाल
सारया वर्गाने दात विचकले,, त्या तोंडी परीक्षेला मी मोठ्या धेर्याने तोंड दिले
वर्षभर गायब राहूनही जर्नल्स मात्र कम्प्लीट असायचे
जर्नल्सवर सही घेताना मात्र देवच आठवायचे
ज्यांची हवी सही ते सर हि तोंड फिरवायचे
अरे तो मी नव्हेच म्हणून थाटात सांगायचे
मग त्यांचीच ओळख त्यांना पटवून द्यावी लागे
वर्षभर हजर नसल्याचे काहीतरी कारण ठोकावे लागे
रडून बोंबलून सही तर मिळूनच जायची
ह्या प्रसंगाची सरांना हि भरपूर मजा यायची
अण्णाच्या टपरीवर मैफल जमायची
सुख दुखाच्या गप्पांची फैरी झडायची
सुख असायचं मुलींचे स्वप्न बघायचं
अन दुख फक्त एक, ती न पटल्याच
मुलींच्या मागे फिरणं तर कधी जमल नाही
खूप आवडेल अस नजेरेने कुणी हेरल नाही
जिला Heart दिल ती पण Art ला होती
मग मी Science सोबत थोडीशी "Art" हि शिकली होती
विज्ञानाच्या दुनियेत प्रेमाची कला जुळली
आयुष्यभराची अशी एक मैत्रीण मला भेटली
शिक्षण पूर्ण झाल,, कट्टा हळूहळू दूर गेला
जबाबदारीच्या ओझ्याखाली हा जीव मात्र दबत गेला
--स्नेहल
कॉलेज कट्टा...!!
कॉलेजचे ते दिन सुखाचे ,आनंदाचे, उत्साहाचे
भविष्याचा विचार करत लेक्चर बंक करण्याचे
मैत्रिणीमध्ये आपला जोडीदार शोधण्याचे
तर कधी रात्ररात्र जागून अभ्यास करण्याचे
सरांना प्रश्न विचारून हैराण करायचे
कधी खिडकीतून तारुण्य न्याहाळायचे
कुणाच आपल्याकडे लक्ष गेलच
तर मनातून हळूच ओशाळायचे
केमेस्ट्री ल्याब मध्ये केलेला घोळ
दुसरच केमिकल मिक्स केल्याने उठलेले धुराचे लोळ
आधी सरांनी केलेला पोबारा
ल्याब चा तर झालेला पुरता धुराडा
म्याथ तर काही जमेना
ती आकडेमोड जराही उमजेना
त्या आकड्यात कधी उत्साह वाटला नाही
पास होण्यापलीकडे त्यावर जीव कधी जडला नाही
लायब्ररी सारखी मात्र दुसरी जागा नाही
अभ्यासानंतर जी झोप लागते तिला कुठे तोड नाही
अभ्यासासोबत झोप इथल्याशिवाय कुठे जमत नाही
लायब्ररी शिवाय अभ्यासामध्ये म्हणून तर मन रमत नाही
एकदा कॉलेज मधून जाताना रस्त्यात सर दिसलेले
गाडीवरून होते निवांत चाललेले
सरांना जोरदार रामराम ठोकलेला रस्त्याने
प्रतिक्रियेत तोल गेल्याने सर पडले जावून उताणे
रागवण्यापेक्षा सर स्वता:च हसले होते
गाडीमध्ये त्याचं शर्ट अजूनही फसले होते
सर काही मदत करू का जेव्हा विचारले होते
परत रामराम नको करू बाबा एव्हढेच त्यांनी विनवले होते
कॉलेज चे दिन सरून गेले पण आठवणी मात्र सोडून गेले
सारे सुख मिळते आज पण ते दिन स्वप्नवत घडून गेले
आज हि मन ते दिन शोधते,, भविष्यासोबत भूतकाळ हि आठवते
पण खर सांगू मित्रानो,, भविष्यापेक्षा मन,, भूतकाळातच जास्त रमते
--स्नेहल
Tuesday, March 15, 2011
फोटो....!!
फोटो दिला तिने मला केस मोकळे सोडलेला
म्हणाली उवा झालेल्या रे हा फोटो काढताना
म्हंटल, अग दुसरा फोटो सापडलाच नाही का तुला
म्हणाली, होता ना पण त्यात होता तोंडाला रुमाल बांधलेला..
कर्म माझ.! म्हणून कपाळाला हाथ मारला
फोटो हातात घ्यायला हि माझा हात थांबला
तिच्या पेक्षा तिच्या केसातच रेंगाळलो
फोटो बघून मग स्वतावरच डाफरलो..
ती म्हणाली अरे तुझी जरा गम्मत केली
उगीच नजर लागू नये म्हणून हि युक्ती केली
म्हंटल अग नजर लागणारच काय.. टाकणार हि नाही
आता कधी फोटो तुझ्याकडे मागणार हि नाही....:)
पण.., आजही तो फोटो जवळ बाळगतो
पण तिच्यापेक्षा जास्त (नसलेल्या) उवा च आठवतो
फोटो मधून हि ती खुदकन हसते
आठवणीना पुन्हा उधान आणते...:)
--स्नेहल
म्हणाली उवा झालेल्या रे हा फोटो काढताना
म्हंटल, अग दुसरा फोटो सापडलाच नाही का तुला
म्हणाली, होता ना पण त्यात होता तोंडाला रुमाल बांधलेला..
कर्म माझ.! म्हणून कपाळाला हाथ मारला
फोटो हातात घ्यायला हि माझा हात थांबला
तिच्या पेक्षा तिच्या केसातच रेंगाळलो
फोटो बघून मग स्वतावरच डाफरलो..
ती म्हणाली अरे तुझी जरा गम्मत केली
उगीच नजर लागू नये म्हणून हि युक्ती केली
म्हंटल अग नजर लागणारच काय.. टाकणार हि नाही
आता कधी फोटो तुझ्याकडे मागणार हि नाही....:)
पण.., आजही तो फोटो जवळ बाळगतो
पण तिच्यापेक्षा जास्त (नसलेल्या) उवा च आठवतो
फोटो मधून हि ती खुदकन हसते
आठवणीना पुन्हा उधान आणते...:)
--स्नेहल
Tuesday, February 22, 2011
सहजच...
हाताची घडी गालावर बोट
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल
सांजवेळी चाले
वेदनांची रेलचेल
मनातुनी वाहे
आठवणी भळभळ....
--स्नेहल
काळाने करता घाव
मनाची होई तळमळ
आठवांच्या खपल्या उडती
अन जखम वाही भळभळ
--स्नेहल
हाताची घडी गालावर बोट
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल
पावसात भिजण्याचा
फक्त बहाणा असतो
खरा उद्देश तर
अश्रू लपवण्याचा असतो
--स्नेहल
प्रेमाची कक्षा
इतकी रुंद असावी
कुठे हि असलं तरी
मन त्यातच सामवावी...
--स्नेहल
परीस शोधण्यापेक्षा सखी
मी प्रेमाचं सोनच शोधतो
बाह्य स्पर्शाशिवाय ते
शुद्ध अन प्रिय भासत
--स्नेहल
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल
सांजवेळी चाले
वेदनांची रेलचेल
मनातुनी वाहे
आठवणी भळभळ....
--स्नेहल
काळाने करता घाव
मनाची होई तळमळ
आठवांच्या खपल्या उडती
अन जखम वाही भळभळ
--स्नेहल
हाताची घडी गालावर बोट
शांतता वाहते मुखातून
भावनांचा उद्रेक होई अंतरी
वादळ उठते मनातून
--स्नेहल
पावसात भिजण्याचा
फक्त बहाणा असतो
खरा उद्देश तर
अश्रू लपवण्याचा असतो
--स्नेहल
प्रेमाची कक्षा
इतकी रुंद असावी
कुठे हि असलं तरी
मन त्यातच सामवावी...
--स्नेहल
परीस शोधण्यापेक्षा सखी
मी प्रेमाचं सोनच शोधतो
बाह्य स्पर्शाशिवाय ते
शुद्ध अन प्रिय भासत
--स्नेहल
Thursday, February 10, 2011
मधुशालेचा राजा..!!
शालेत न जाऊन बी आवडे आपल्याला मधुशाला,,
आपल सगलं ऐकता तिथे काय बी बोला
रोज ठरवतो आपण दारूच्या नादी लागायचं नाय,,
लेका त्या वाटेला तर मुलि जायचंच नाय
रातीला येताना "जिवाभावाचा" तो गुत्ता दिसतो,,
मन म्हणत नाही पण साला हा पाय लगेच वलतो
गुत्त्यात मग मनापासून एक "प्रोमिष" घेतो,,
एकच पेग पिऊ हे मनापासून फिक्श ठरवतो
दर पेगला साला एक "प्रोमिष" घेतच रहतो,,
अन बाटली संपली तरी बी साला मी मांगतच राहतो
थाटात मंग आपुन भायेर पडतो,,
ताठ मानेने वाकडी तिरपी घरची वाट पकडतो
स्वतःला मंग मी समजाया लागतो राजा,,
रस्त्यात बगायचा मंग आपला गाजावाजा
अरे लोक बी आपल्या बाजूने जात नाय
बायांची तर ह्यो राजाकडे बगायची बी हिम्मत नाय
पण घरी येताच साली हि बायको करते दंगा,,,
ह्या राजावर साली उगारते हि डंडा..?
राजाचा करतीस का अपमान,,
मंग आपण हि विसरतो आपल भान
बायको खाई मंग जोरदार फटके,,
पोर तर भीतीने आधीच घराबाहेर सटके
अरे राजा हाये असा थोडी हरणार,,
मान हरवला पण ऐट थोडी सोडणार
आपल्याला कुणाची गरज न्ह्याय,,
गुत्त्यावर आपल बी एक "खात" हाय
बायको पोर गेले दोग बी उडत काय फरक पडत नाय,,
लेका आपल्याला त काय दारू सोडायची नाय,,
...............मधुशालेचा आपणच राजा हाय
--स्नेहल
Wednesday, February 9, 2011
माझ्या मना...!!!
माझ्या मना समजून घे रे,, ह्या व्यथा वेदना
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा
रेतीचे ते घर स्वप्नांचे,, एका वादळाने गेले उडून
आनंदाचा तो संसार,, सारे गेले आज तुटून
माझ्या मना विसरून जा रे,, त्या क्षणाच्या खुणा
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा
प्रीतच होती अशी रुसलेली,, तू उराशी पक्की जपलेली
हसुनी ती तर निघून गेली,, तू का अश्रु सवे बिलगती
माझ्या मना सोडून दे रे,, त्या प्रीतीच्या भावना
येणार ती नाही फिरुनी,, तुझ्या ठायी पुन्हा
ती होती श्वास ती होती प्राण,, प्रेमात गुंतलेलो विसरून भान
विसरुनी मजसी गेली निघून,, गोड हास्य मजपाशी सोडून
माझ्या मना खर सांगू का रे,, ती अजुनी आठवे मला
विसरणे तिला आहे कठीण,, सावरू कसा स्वताला
माझ्या मना सांग ना रे,, खरच नाही येणार का ती पुन्हा..??
अश्रूना आवरण्या झाले,, आता कठीण मला....
अश्रूना आवरण्या झाले,, आता कठीण मला....
--स्नेहल
खेळ असा हा मोडलेला.....
खेळ असा हा मोडलेला,, दोन घडीतच विस्कटलेला
खेळ असा हा मोडलेला...........
नियतीचा हा छंद निराळा,, दोन जीवांना करून वेगळा
अश्रुना देऊन या माथी,, देव असा का रुसलेला
खेळ असा हा मोडलेला (२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला.............
सारे जण हे मज विचारी,, दूर ती जावून का बसली
शब्द हरवले प्रीत हि रुसली,, भाव असा हा हरवलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला............
प्राण नको अन नको हे जीवन,, बंध तुटता तिळतिळ तुटले मन
स्पंदनानी केले बंड,, श्वास असा हा घुसमटलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला.........
विरहाचे हे क्षण निखारी,, कारुण्याने मन तुज पुकारी
काळीज हे पण ठसठसलेलं,, तुजवीण मी हा बावरलेला
खेळ असा हा मोडलेला(२),, दोन घडीतच विस्कटलेला.....
खेळ असा हा मोडलेला........
खेळ असा हा मोडलेला.............................
--स्नेहल
आदर्श....
"आदर्श" म्हणवता म्हणवता चांगलेच "आदर्श" घडवले
"आदर्श" शब्दाचे इतके वाभाडे कुणी कधीच नाही काढले
कुणाचा "आदर्श" घेण्याची हि आता भीती वाटतेय
कुणासमोर आदर्श म्हणवायची तर खूपच लाज वाटतेय
कल (माडी), आज बंगला आणि गाडी आहे
घोटाळ्यांच्या मोहिमेत ह्यांची तर आघाडी आहे
कलम लावून हि ह्यांना काही फरक पडत नाही
डोळे अन दाढी ह्यांची कधी पांढरी पडत नाही
घोटाळ्यांचा राजा ,, भ्रष्टाचाराचा शेहेनशहा
CBI ची याला भीती नाही,, कारण सोबत आहे गॉगलवाला (DMK)
सरकार मध्ये होता आज त्यांचाच पाहुणा झालाय
२ जी राजाचा थाट काही कमी नाही झालाय
"वाटले" तर खूप ह्यांनी,, पण आता ह्यांचीच "वाट" लागलीय
पैश्याची "वाट" शोधता आता CBI ची "वाट" दिसू लागलीय
स्व कर्माचे "आदर्श" फळ ह्यांच्या "वाटी" आलय,
आपल्याच कर्माची (मतदान) फळ अस "वाटू" लागलय
--स्नेहल
प्रितीच फुलपाखरू..!!
प्रीतीच्या फुलपाखरू
हळूच अवतरत
निरस जीवनात
रंगत भरत...
प्रितीच फुलपाखरू
भुरकन हि उडत
भावनेचा खेळ
मनसोक्त खेळत...
प्रितीच फुलपाखरू
हास्य फुलवत
कधी विरहात
अश्रुनी ओलावत...
---स्नेहल
चारोळ्या..!!
तुज विसरण
मुळी शक्यच नाही
मनावर तुजवीण
कुणाच राज्य नाही...
--स्नेहल
प्यार वोह नहीं की करके छोड़ दिया
प्यार वोह नहीं जो छू के निकल लिया
प्यार तो नाम है खुशियाँ और त्याग का
ये नहीं की एकदूसरे को पा लिया तो हो गया...
--स्नेहल
दु:खाचे ढग सारून
सुखाचा वर्षाव होईल
जीवनाच्या आसमंतात
हर्षाचा पाऊस होईल..
--स्नेहल
सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित..:)
--स्नेहल
दोन जीवांचा खेळ
नियतीने क्षणात जिंकला
राजा राणीच्या सुखात
विरहाचा एक्का सोडला...
--स्नेहल
नियतीने जुळवले
नियतीने खेळवले
अन आज नियतीने
मनसोक्त रडवले !!
--स्नेहल
मोडलेला डाव आज
मला रडवत नाही
तो सावरण्याचा प्रयत्न
मी अजूनही सोडत नाही..
--स्नेहल
प्रेम मागून हि मिळत नाही
कळून हि काही वळत नाही
वेडा मजनू म्हणते ती पण
वेड प्रेम काही तिला कळत नाही...
--स्नेहल
दगड टाकूनच
तरंग उठतात
प्रेम केल्यावरच
भावना कळतात
--स्नेहल
आज मी तिच्याकडे
मागणार आहे प्रेम
बघू तिच्याहि भावना
आहेत का सेम....:):)
--स्नेहल
जीवनच कोर झालय
मोह तरी कसला करू
जगणच झालय मुश्कील
वेगळ अजून काय मरू....
--स्नेहल
भाव तिचेच झळकती
माझ्या ह्या मुखातून
तिचाच आवाज येई
ह्या हृदयाच्या स्पंदनातून...:)
--स्नेहल
मुळी शक्यच नाही
मनावर तुजवीण
कुणाच राज्य नाही...
--स्नेहल
प्यार वोह नहीं की करके छोड़ दिया
प्यार वोह नहीं जो छू के निकल लिया
प्यार तो नाम है खुशियाँ और त्याग का
ये नहीं की एकदूसरे को पा लिया तो हो गया...
--स्नेहल
दु:खाचे ढग सारून
सुखाचा वर्षाव होईल
जीवनाच्या आसमंतात
हर्षाचा पाऊस होईल..
--स्नेहल
सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित..:)
--स्नेहल
दोन जीवांचा खेळ
नियतीने क्षणात जिंकला
राजा राणीच्या सुखात
विरहाचा एक्का सोडला...
--स्नेहल
नियतीने जुळवले
नियतीने खेळवले
अन आज नियतीने
मनसोक्त रडवले !!
--स्नेहल
मोडलेला डाव आज
मला रडवत नाही
तो सावरण्याचा प्रयत्न
मी अजूनही सोडत नाही..
--स्नेहल
प्रेम मागून हि मिळत नाही
कळून हि काही वळत नाही
वेडा मजनू म्हणते ती पण
वेड प्रेम काही तिला कळत नाही...
--स्नेहल
दगड टाकूनच
तरंग उठतात
प्रेम केल्यावरच
भावना कळतात
--स्नेहल
आज मी तिच्याकडे
मागणार आहे प्रेम
बघू तिच्याहि भावना
आहेत का सेम....:):)
--स्नेहल
जीवनच कोर झालय
मोह तरी कसला करू
जगणच झालय मुश्कील
वेगळ अजून काय मरू....
--स्नेहल
भाव तिचेच झळकती
माझ्या ह्या मुखातून
तिचाच आवाज येई
ह्या हृदयाच्या स्पंदनातून...:)
--स्नेहल
मजेशीर चारोळ्या... आभार मित्र मंडळी..!
अरविंद मोरे-:
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास
मी-:
नको भेटूस बाबा
राहा तुझ्या घरी
श्वास बंद पडल्यावर
येईन तुझ्या दारी...:)
--स्नेहल
संतोष -:
गाव सोडतेय म्हणे,
असं ऐकलंय तर खरं........
जाण्यापुर्वी विकुन जातेय,
तीनेच बांधलेली घरं.......
स्नेहल-:
जाऊ दे तिला लवकर
तेच आहे बर..
विकता विकता एक दिवस
विकेल तुझीच घर..:):):)
संतोष -:
अरे
माझं घर तिनं विकावं,
हीच तर माझी आशा होती......
तीच्या वेड्या प्रेमात तर,
माझी ही दुर्दशा होती......
स्नेहल -:
वेड्यांशी प्रेम करून
असच काहीस होत
विकल सार जात अन
इथच घोड पेंड खात....:)
संतोष -:
तीला वेडं कसं म्हणु रे,
मीच गाढव असेल ना.....
न वाचता मन तीचे,
प्रीत केली खुप मीच ना....
स्नेहल-:
तिने मनसोक्त लाथाडायच
अन गाढव तू का व्हायचं..?
जिला तुझ्या प्रेमाची किंमत नाय
त्या गाढवीला गुळाची चव काय..:):)
संतोष-:
अरे
तीने लाथाडले तरी माझी,
प्रीत थोडीच संपणार आहे....
एकदिवस तीच माझी,
प्रीत पाहुन रडणार आहे...
स्नेहल-:
प्रीत पाहून ती
रडणार आहे पण
मगरीच्या आसुने
थोडी कुणी भुलणार आहे..??
बायकांचं अस असत
स्वताचा स्वभाव दाखवायचा
लाजरा अन बुजरा
आणि मुठ उघडली कि
आत सापडतो नवरा.......:):)
--स्नेहल
जन्मोजन्मी तूच तू भेटावी
साथ कायम तुझीच लाभावी
फक्त...
कडकलक्ष्मी म्हणून न होता
तू भाग्यलक्ष्मी म्हणून भेटावी...:):)
--स्नेहल
Saturday, February 5, 2011
सहज सुचलेलं..!
काळ्याभोर आकाशात
चांदण्यांनी केली गर्दी
ऐकव तुझ्या चारोळ्या
जमले सारे दर्दी...!!!
--स्नेहल
तुझ वेगळेपणच
मनाला भावते
लाखांमध्ये हि मला
तेच खुणावते..!!
--स्नेहल
सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित...!!
--स्नेहल
तिच्या हास्याच्या
दोन घटका
करती दु:खातून
तात्काळ सुटका..!!
--स्नेहल
ह्या दुष्टांच्या पापांनी
झालाय देश हि भग्न
घोटाळ्यात झालाय
जो तो मग्न...!!
--स्नेहल
ह्यांच्या घोटाळ्यांचा
पडे जनतेला भुर्दंड
जनाची ह्यांना ना लाज
मन हि ह्यांचे षंढ...!!
--स्नेहल
राजकारणी...??
ह्यांची ना कोणती जात
ह्याचं ना कोणत कुळ
काय कोणास ठाऊक
कुठून उपटल हे मूळ..?
--स्नेहल
तुज विण होई
ना कशाचा हर्ष
हर क्षण घेऊन येई
तुझी आठवण प्रकर्ष
--स्नेहल
क्षणाप्रमाणे मुखवटे बदलत गेलो
होतो एक, मी दुसराच बनत गेलो
वेगवेगळ्या मुखवट्यांच्या जगात
मी स्वतःला हि विसरत गेलो
--स्नेहल
नियती ने वापरले
दुष्ट हत्यारांचे भांडार
दणकट प्रीतीला हि
पडले विरहाचे खिंडार
--स्नेहल
चांदण्यांनी केली गर्दी
ऐकव तुझ्या चारोळ्या
जमले सारे दर्दी...!!!
--स्नेहल
तुझ वेगळेपणच
मनाला भावते
लाखांमध्ये हि मला
तेच खुणावते..!!
--स्नेहल
सात जन्मीचे भासे जैसे
तुझ न माझ नात
नसे स्वार्थ अन नसे अपेक्षा
फक्त प्रेमाचं हित...!!
--स्नेहल
तिच्या हास्याच्या
दोन घटका
करती दु:खातून
तात्काळ सुटका..!!
--स्नेहल
ह्या दुष्टांच्या पापांनी
झालाय देश हि भग्न
घोटाळ्यात झालाय
जो तो मग्न...!!
--स्नेहल
ह्यांच्या घोटाळ्यांचा
पडे जनतेला भुर्दंड
जनाची ह्यांना ना लाज
मन हि ह्यांचे षंढ...!!
--स्नेहल
राजकारणी...??
ह्यांची ना कोणती जात
ह्याचं ना कोणत कुळ
काय कोणास ठाऊक
कुठून उपटल हे मूळ..?
--स्नेहल
तुज विण होई
ना कशाचा हर्ष
हर क्षण घेऊन येई
तुझी आठवण प्रकर्ष
--स्नेहल
क्षणाप्रमाणे मुखवटे बदलत गेलो
होतो एक, मी दुसराच बनत गेलो
वेगवेगळ्या मुखवट्यांच्या जगात
मी स्वतःला हि विसरत गेलो
--स्नेहल
नियती ने वापरले
दुष्ट हत्यारांचे भांडार
दणकट प्रीतीला हि
पडले विरहाचे खिंडार
--स्नेहल
Friday, February 4, 2011
माझ्या मनीचा पाऊस..!!
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
ती सांजवेळ,, ढगांनी हि साधला मेळ
वीजेच ते कडकडण,, हृदयाचं अति फडफडण
पानांची सळसळ,, मनाची तळमळ
सार कस अचानक दाटून आल होत..,,
पावसाप्रमाणे प्रेम माझ हि ताटकळलं होत
आजही तो क्षण तसाच आठवतोय....
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
भिजलेल ते तन,, सैरभैर झालेलं मन
अवघडलेले शब्द,, दोघे अति स्तब्ध
प्रीतीचा बहार,, ढगांचा प्रहार
सार काही अति सहज मिळून आल होत..,,
पावसाप्रमाणे मन माझ हि अवघडल होत
आज हि तो भाव मनी जागतोय...
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
मातीचा सुंगध,, प्रीतीचा गंध
अंतरीची इच्छा,, दोहोंची स्वेच्छा
प्रीतीची साद,, प्रेमाचा प्रतिसाद
सार काही अवचित घडून गेल होत..,,
प्रेमच ते फुल आज हळूच उमलल होत
आज हि तोच क्षण मनोमन जगतोय...
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
--स्नेहल
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
ती सांजवेळ,, ढगांनी हि साधला मेळ
वीजेच ते कडकडण,, हृदयाचं अति फडफडण
पानांची सळसळ,, मनाची तळमळ
सार कस अचानक दाटून आल होत..,,
पावसाप्रमाणे प्रेम माझ हि ताटकळलं होत
आजही तो क्षण तसाच आठवतोय....
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
भिजलेल ते तन,, सैरभैर झालेलं मन
अवघडलेले शब्द,, दोघे अति स्तब्ध
प्रीतीचा बहार,, ढगांचा प्रहार
सार काही अति सहज मिळून आल होत..,,
पावसाप्रमाणे मन माझ हि अवघडल होत
आज हि तो भाव मनी जागतोय...
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
मातीचा सुंगध,, प्रीतीचा गंध
अंतरीची इच्छा,, दोहोंची स्वेच्छा
प्रीतीची साद,, प्रेमाचा प्रतिसाद
सार काही अवचित घडून गेल होत..,,
प्रेमच ते फुल आज हळूच उमलल होत
आज हि तोच क्षण मनोमन जगतोय...
आज माझ्या हि अंगणात पाऊस पडतोय
आठवणींची पान अलगद उलगडतोय..
--स्नेहल
Subscribe to:
Posts (Atom)